< स्तोत्रसंहिता 124 >
1 १ दाविदाचे स्तोत्र आता इस्राएलाने म्हणावे, जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता,
Cántico gradual: de David. A NO haber estado Jehová por nosotros, diga ahora Israel;
2 २ जेव्हा लोक आमच्याविरूद्ध उठले, तेव्हा जर परमेश्वर आमच्या बाजूला नसता तर आमच्या बाजूला कोण असते,
A no haber estado Jehová por nosotros, cuando se levantaron contra nosotros los hombres,
3 ३ जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला, त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते.
Vivos nos habrían entonces tragado, cuando se encendió su furor en nosotros.
4 ४ जलांनी आम्हास धुवून दूर नेले असते; प्रवाहाने आम्हास पूर्ण झाकले असते.
Entonces nos habrían inundado las aguas; sobre nuestra alma hubiera pasado el torrente:
5 ५ मग खवळलेल्या जलांनी आम्हास बुडवले असते.
Hubieran entonces pasado sobre nuestra alma las aguas soberbias.
6 ६ परमेश्वराचा धन्यवाद होवो, त्याने आम्हास त्याच्या दातांनी फाडू दिले नाही.
Bendito Jehová, que no nos dió por presa á sus dientes.
7 ७ पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.
Nuestra alma escapó cual ave del lazo de los cazadores: quebróse el lazo, y escapamos nosotros.
8 ८ पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण करणारा परमेश्वर त्याच्या नावामुळे आम्हास मदत मिळते.
Nuestro socorro es en el nombre de Jehová, que hizo el cielo y la tierra.