1१स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो.
שיר המעלות אליך נשאתי את-עיני-- הישבי בשמים
2२पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात.
הנה כעיני עבדים אל-יד אדוניהם-- כעיני שפחה אל-יד גברתה כן עינינו אל-יהוה אלהינו-- עד שיחננו
3३हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत.
חננו יהוה חננו כי-רב שבענו בוז
4४सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.