< स्तोत्रसंहिता 122 >
1 १ दाविदाचे स्तोत्र आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
En sang ved festreisene; av David. Jeg gleder mig ved dem som sier til mig: Vi vil gå til Herrens hus.
2 २ हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.
Våre føtter står i dine porter, Jerusalem!
3 ३ हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
Jerusalem, du velbyggede, lik en by som er tett sammenføiet,
4 ४ इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
hvor stammene drar op, Herrens stammer, efter en lov for Israel, for å prise Herrens navn!
5 ५ कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.
For der er stoler satt til dom, stoler for Davids hus.
6 ६ यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.
Bed om fred for Jerusalem! La det gå dem vel som elsker dig!
7 ७ तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.
Der være fred innen din voll, ro i dine saler!
8 ८ माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.
For mine brødres og mine venners skyld vil jeg si: Fred være i dig!
9 ९ परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.
For Herrens, vår Guds huses skyld vil jeg søke ditt beste.