< स्तोत्रसंहिता 121 >
1 १ मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल?
Pieśń stopni. Oczy moje podnoszę na góry, skądby mi pomoc przyszła.
2 २ परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते.
Pomoc moja jest od Pana, który stworzył niebo i ziemię.
3 ३ तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही.
Nie dopuści, aby się zachwiać miała noga twoja; nie drzemieć stróż twój.
4 ४ पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही.
Oto nie drzemie ani śpi ten, który strzeże Izraela.
5 ५ परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे.
Pan jest stróżem twoim; Pan jest cieniem twoim po prawej ręce twojej.
6 ६ दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही.
We dnie słońce nie uderzy na cię, ani miesiąc w nocy.
7 ७ परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.
Pan cię strzec będzie od wszystkiego złego; on duszy twojej strzec będzie.
8 ८ परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील, त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.
Pan strzec będzie wyjścia twego i wejścia twego, odtąd aż na wieki.