< स्तोत्रसंहिता 121 >

1 मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल?
都もうでの歌 わたしは山にむかって目をあげる。わが助けは、どこから来るであろうか。
2 परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते.
わが助けは、天と地を造られた主から来る。
3 तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही.
主はあなたの足の動かされるのをゆるされない。あなたを守る者はまどろむことがない。
4 पाहा, इस्राएलाचा रक्षणकर्ता कधीच झोपत नाही किंवा तो डुलकीही घेत नाही.
見よ、イスラエルを守る者はまどろむこともなく、眠ることもない。
5 परमेश्वर तुझा रक्षणकर्ता आहे; परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला सावली आहे.
主はあなたを守る者、主はあなたの右の手をおおう陰である。
6 दिवसा तुला सूर्य किंवा रात्री चंद्र तुला नुकसान करणार नाही.
昼は太陽があなたを撃つことなく、夜は月があなたを撃つことはない。
7 परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.
主はあなたを守って、すべての災を免れさせ、またあなたの命を守られる。
8 परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील, त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.
主は今からとこしえに至るまで、あなたの出ると入るとを守られるであろう。

< स्तोत्रसंहिता 121 >