< स्तोत्रसंहिता 120 >
1 १ माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, आणि त्याने मला उत्तर दिले.
我受難時一呼求上主,祂就俯聽了我的呼求。
2 २ हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.
上主,求您救我脫離說謊者的口脣,上主,求您救我擺脫詭詐的舌根。
3 ३ हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?
您這詭詐的口舌,究竟怎樣對待付您?究竟怎樣懲治您?
4 ४ तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.
只有勇士的矢箭,還有杜松的火炭!
5 ५ मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.
我真不幸! 因為要在默舍客居住,要在刻達爾的帳幕寄宿。
6 ६ शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.
因與憎惡和平的人相處,我的靈魂已經感到太久。
7 ७ मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.
我言談無非和平,他們卻鼓勵戰爭。