< स्तोत्रसंहिता 12 >
1 १ मुख्य गायकासाठी; शमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, साहाय्य कर! कारण भक्तिमान नाहीसा झाला आहे. विश्वासू गायब झाला आहे.
大卫的诗,交与伶长。调用第八。 耶和华啊,求你帮助,因虔诚人断绝了; 世人中间的忠信人没有了。
2 २ प्रत्येक जन आपल्या शेजाऱ्यास पोकळ शब्द बोलतो, प्रत्येक खुशामती करणाऱ्या ओठांनी आणि दुटप्पी हृदयाने बोलतो.
人人向邻舍说谎; 他们说话,是嘴唇油滑,心口不一。
3 ३ परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको.
凡油滑的嘴唇和夸大的舌头, 耶和华必要剪除。
4 ४ हे ते आहेत जे असे म्हणतात, “आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ, जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?”
他们曾说:我们必能以舌头得胜; 我们的嘴唇是我们自己的, 谁能作我们的主呢?
5 ५ परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो; ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.”
耶和华说:因为困苦人的冤屈 和贫穷人的叹息, 我现在要起来, 把他安置在他所切慕的稳妥之地。
6 ६ परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत, पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत.
耶和华的言语是纯净的言语, 如同银子在泥炉中炼过七次。
7 ७ हे परमेश्वरा, तुच त्यांना सांभाळशील, या पिढीपासून तू त्यांना सर्वकाळ राखशील.
耶和华啊,你必保护他们; 你必保佑他们永远脱离这世代的人。
8 ८ मनुष्यांच्या संतानांमध्ये निचपणाला थोरवी मिळते तेव्हा दुष्ट चोहोंकडे हिंडत राहतात.
下流人在世人中升高, 就有恶人到处游行。