< स्तोत्रसंहिता 119 >

1 ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते आशीर्वादित आहेत.
Alleluia. ALEPH. Beati immaculati in via: qui ambulant in lege Domini.
2 जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात ते आशीर्वादित आहेत.
Beati, qui scrutantur testimonia eius: in toto corde exquirunt eum.
3 ते चुकीचे करीत नाहीत; ते त्याच्या मार्गात चालतात.
Non enim qui operantur iniquitatem, in viis eius ambulaverunt.
4 तुझे विधी आम्ही काळजीपूर्वक पाळावे म्हणून तू आम्हास आज्ञा दिल्या आहेत.
Tu mandasti mandata tua custodiri nimis.
5 मी नेहमी तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे.
Utinam dirigantur viae meae, ad custodiendas iustificationes tuas.
6 मी जेव्हा तुझ्या सर्व आज्ञांचा विचार करीन तेव्हा मी कधीही लाजणार नाही.
Tunc non confundar, cum perspexero in omnibus mandatis tuis.
7 मी जेव्हा तुझे न्याय्य निर्णय शिकेन, तेव्हा मी मनःपूर्वक तुला धन्यवाद देईन.
Confitebor tibi in directione cordis: in eo quod didici iudicia iustitiae tuae.
8 मी तुझे नियम पाळीन; मला एकट्याला सोडू नकोस.
Iustificationes tuas custodiam: non me derelinquas usquequaque.
9 तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील? तुझ्या वचनाचे पालन करण्याने.
BETH. In quo corrigit adolescentior viam suam? in custodiendo sermones tuos.
10 १० मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
In toto corde meo exquisivi te: ne repellas me a mandatis tuis.
11 ११ मी तुझ्याविरुध्द पाप करू नये म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.
In corde meo abscondi eloquia tua: ut non peccem tibi.
12 १२ हे परमेश्वरा, तू धन्य आहेस; मला तुझे नियम शिकव.
Benedictus es Domine: doce me iustificationes tuas.
13 १३ मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे सर्व योग्य निर्णय जे तू प्रकट केले ते जाहीर करीन.
In labiis meis, pronunciavi omnia iudicia oris tui.
14 १४ तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो.
In via testimoniorum tuorum delectatus sum, sicut in omnibus divitiis.
15 १५ मी तुझ्या नियमांचे मनन करीन, आणि तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन.
In mandatis tuis exercebor: et considerabo vias tuas.
16 १६ मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन; मी तुझे वचन विसरणार नाही.
In iustificationibus tuis meditabor: non obliviscar sermones tuos.
17 १७ आपल्या सेवकावर दया कर याकरिता की; मी जिवंत रहावे, आणि तुझे वचन पाळावे.
GHIMEL. Retribue servo tuo, vivifica me: et custodiam sermones tuos.
18 १८ माझे डोळे उघड म्हणजे तुझ्या नियमशास्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
Revela oculos meos: et considerabo mirabilia de lege tua.
19 १९ मी या देशात परका आहे; तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवू नकोस.
Incola ego sum in terra: non abscondas a me mandata tua.
20 २० तुझ्या योग्य निर्णयांची सतत उत्कंठा धरल्यामुळे माझा जीव चिरडून गेला आहे.
Concupivit anima mea desiderare iustificationes tuas, in omni tempore.
21 २१ तू गर्विष्ठांना रागावतोस, तुझ्या आज्ञापासून भरकटतात ते शापित आहेत.
Increpasti superbos: maledicti qui declinant a mandatis tuis.
22 २२ माझ्यापासून लाज आणि मानहानी दूर कर, कारण मी तुझ्या कराराची आज्ञा पाळली आहे.
Aufer a me opprobrium, et contemptum: quia testimonia tua exquisivi.
23 २३ अधिपतीही माझ्याविरूद्ध कट रचतात आणि निंदा करतात, तुझा सेवक तुझ्या नियमांचे मनन करतो.
Etenim sederunt principes, et adversum me loquebantur: servus autem tuus exercebatur in iustificationibus tuis.
24 २४ तुझ्या कराराची आज्ञा मला आनंददायी आहे, आणि ते माझे सल्लागार आहेत.
Nam et testimonia tua meditatio mea est: et consilium meum iustificationes tuae.
25 २५ माझा जीव धुळीस चिकटून आहे; आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
DALETH. Adhaesit pavimento anima mea: vivifica me secundum verbum tuum.
26 २६ मी तुला आपले मार्ग सांगितले आणि तू मला उत्तर दिलेस; तू मला आपले नियम शिकव.
Vias meas enunciavi, et exaudisti me: doce me iustificationes tuas.
27 २७ मला तुझ्या विधींचा मार्ग समजावून दे. यासाठी की, मी तुझ्या आश्चर्यकारक शिक्षणाचे मनन करावे.
Viam iustificationum tuarum instrue me: et exercebor in mirabilibus tuis.
28 २८ माझा जीव दुःखाने गळून जातो; आपल्या वचनाने मला उचलून धर.
Dormitavit anima mea prae taedio: confirma me in verbis tuis.
29 २९ असत्याचा मार्ग माझ्यापासून दूर कर; कृपाकरून तुझे नियमशास्त्र मला शिकीव.
Viam iniquitatis amove a me: et de lege tua miserere mei.
30 ३० मी विश्वासाचा मार्ग निवडला आहे; मी तुझे योग्य निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत.
Viam veritatis elegi: iudicia tua non sum oblitus.
31 ३१ मी तुझ्या कराराच्या निर्बंधास चिकटून राहिलो आहे; हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस.
Adhaesi testimoniis tuis Domine: noli me confundere.
32 ३२ मी तुझ्या आज्ञांच्या मार्गात धावेन, कारण तू ते करण्यास माझे हृदय विस्तारित करतोस.
Viam mandatorum tuorum cucurri, cum dilatasti cor meum.
33 ३३ हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन.
HE. Legem pone mihi Domine viam iustificationum tuarum: et exquiram eam semper.
34 ३४ मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन.
Da mihi intellectum, et scrutabor legem tuam: et custodiam illam in toto corde meo.
35 ३५ तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे.
Deduc me in semitam mandatorum tuorum: quia ipsam volui.
36 ३६ माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर.
Inclina cor meum in testimonia tua: et non in avaritiam.
37 ३७ निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझे डोळे वळीव. मला तुझ्या मार्गात पुर्नजीवीत कर.
Averte oculos meos ne videant vanitatem: in via tua vivifica me.
38 ३८ तुझा सन्मान करणाऱ्यांना दिलेले वचन, आपल्या सेवकासंबंधाने खरे कर.
Statue servo tuo eloquium tuum, in timore tuo.
39 ३९ ज्या अपमानाची मला धास्ती वाटते ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.
Amputa opprobrium meum, quod suspicatus sum: quia iudicia tua iucunda.
40 ४० पाहा, मला तुझ्या विधींची उत्कंठा लागली आहे. तू मला आपल्या न्यायत्वाने मला नवजीवन दे.
Ecce concupivi mandata tua: in aequitate tua vivifica me.
41 ४१ हे परमेश्वरा, मला तुझे अचल प्रेम दे. तुझ्या वचनाप्रमाणे मला तुझे तारण प्राप्त होवो.
VAU. Et veniat super me misericordia tua Domine: salutare tuum secundum eloquium tuum.
42 ४२ जो माझी थट्टा करतो त्यास मला उत्तर देता येईल, कारण मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला आहे.
Et respondebo exprobrantibus mihi verbum: quia speravi in sermonibus tuis.
43 ४३ तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको, कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो.
Et ne auferas de ore meo verbum veritatis usquequaque: quia in iudiciis tuis supersperavi.
44 ४४ मी सदैव तुझे नियमशास्त्र, सदासर्वकाळ आणि कायम पाळीन.
Et custodiam legem tuam semper: in saeculum et in saeculum saeculi.
45 ४५ मी सुरक्षितपणे चालेन, कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
Et ambulabam in latitudine: quia mandata tua exquisivi.
46 ४६ मी तुझ्या विधीवत आज्ञेबद्दल राजांसमोर बोलेन, आणि मी लज्जित होणार नाही.
Et loquebar in testimoniis tuis in conspectu regum: et non confundebar.
47 ४७ मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन, ज्या मला अतिशय प्रिय आहेत.
Et meditabar in mandatis tuis, quae dilexi.
48 ४८ ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन; मी तुझ्या नियमांचे मनन करीन.
Et levavi manus meas ad mandata tua, quae dilexi: et exercebor in iustificationibus tuis.
49 ४९ तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनाची आठवण ठेव. कारण तू मला आशा दिली आहेस.
ZAIN. Memor esto verbi tui servo tuo, in quo mihi spem dedisti.
50 ५० माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते;
Haec me consolata est in humilitate mea: quia eloquium tuum vivificavit me.
51 ५१ गर्विष्ठांनी माझी टवाळी केली आहे, तरी मी तुझ्या नियमशास्रापासून भरकटलो नाही.
Superbi inique agebant usquequaque: a lege autem tua non declinavi.
52 ५२ हे परमेश्वरा, प्राचीन काळच्या तुझ्या निर्णयाविषयी मी विचार करतो, आणि मी आपले समाधान करतो.
Memor fui iudiciorum tuorum a saeculo Domine: et consolatus sum.
53 ५३ दुष्ट तुझे नियमशास्त्र नाकारतात, म्हणून संताप माझा ताबा घेतो.
Defectio tenuit me, pro peccatoribus derelinquentibus legem tuam.
54 ५४ ज्या घरात मी तात्पुरता राहतो; तुझे नियम मला माझे गीत झाले आहेत.
Cantabiles mihi erant iustificationes tuae, in loco peregrinationis meae.
55 ५५ हे परमेश्वरा, रात्रीत मी तुझ्या नावाची आठवण करतो, आणि मी तुझे नियमशास्त्र पाळतो.
Memor fui nocte nominis tui Domine: et custodivi legem tuam.
56 ५६ हे मी आचरिले आहे, कारण मी तुझे विधी पाळले आहेत.
Haec facta est mihi: quia iustificationes tuas exquisivi.
57 ५७ परमेश्वर माझा वाटा आहे; तुझे वचन पाळण्याचा मी निश्चय केला आहे.
HETH. Portio mea Domine, dixi custodire legem tuam.
58 ५८ मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझ्या अनुग्रहासाठी कळकळीची विनंती करतो; तुझ्या वचनाप्रमाणे माझ्यावर कृपा कर;
Deprecatus sum faciem tuam in toto corde meo: miserere mei secundum eloquium tuum.
59 ५९ मी आपल्या मार्गाचे परीक्षण केले, आणि तुझ्या कराराकडे आपले पावली वळवीली.
Cogitavi vias meas: et converti pedes meos in testimonia tua.
60 ६० मी तुझ्या आज्ञा पाळण्याची घाई केली, आणि मी उशीर केला नाही.
Paratus sum, et non sum turbatus: ut custodiam mandata tua.
61 ६१ दुष्टाच्या दोऱ्यांनी मला जाळ्यात पकडले आहे; तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
Funes peccatorum circumplexi sunt me: et legem tuam non sum oblitus.
62 ६२ मी मध्यरात्री तुझ्या न्याय्य निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
Media nocte surgebam ad confitendum tibi, super iudicia iustificationis tuae.
63 ६३ तुझे भय धरणाऱ्या सर्वांचा, तुझे विधी पाळणाऱ्यांचा, मी साथीदार आहे.
Particeps ego sum omnium timentium te: et custodientium mandata tua.
64 ६४ हे परमेश्वरा, तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने सर्व पृथ्वी भरली आहे. तू आपले नियम मला शिकव.
Misericordia tua Domine plena est terra: iustificationes tuas doce me.
65 ६५ हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे, आपल्या सेवकाचे चांगले केले आहेस.
TETH. Bonitatem fecisti cum servo tuo Domine, secundum verbum tuum.
66 ६६ योग्य निर्णय घेण्याविषयीचे ज्ञान आणि बुद्धी तू मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझा विश्वास आहे.
Bonitatem, et disciplinam, et scientiam doce me: quia mandatis tuis credidi.
67 ६७ पीडित होण्यापूर्वी मी बहकलो होतो, परंतु आता मी तुझे वचन पाळीत आहे.
Priusquam humiliarer ego deliqui: propterea eloquium tuum custodivi.
68 ६८ तू चांगला आहेस आणि तू चांगले करतोस. मला तुझे नियम शिकव.
Bonus es tu: et in bonitate tua doce me iustificationes tuas.
69 ६९ गर्विष्ठांनी माझ्यावर लबाडीने चिखलफेक केली आहे, पण मी तुझे विधी अगदी मनापासून पाळीन.
Multiplicata est super me iniquitas superborum: ego autem in toto corde scrutabor mandata tua.
70 ७० त्यांचे हृदय कठीण झाले आहे, पण मला तुझ्या नियमशास्त्रात आनंद आहे.
Coagulatum est sicut lac cor eorum: ego vero legem tuam meditatus sum.
71 ७१ मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले; त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो.
Bonum mihi quia humiliasti me: ut discam iustificationes tuas.
72 ७२ सोने आणि रुपे ह्यांच्या हजारो तुकड्यापेक्षा, मला तुझ्या तोंडचे नियमशास्त्र अधिक मोलवान आहेत.
Bonum mihi lex oris tui, super millia auri, et argenti.
73 ७३ तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला; मला बुद्धी दे म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेन.
IOD. Manus tuae fecerunt me, et plasmaverunt me: da mihi intellectum, ut discam mandata tua.
74 ७४ तुझा सन्मान करणारे मला पाहून हर्ष करतील, कारण मला तुझ्या वचनात आशा सापडली आहे.
Qui timent te videbunt me, et laetabuntur: quia in verba tua supersperavi.
75 ७५ हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत हे मला माहित आहेत, आणि तुझ्या सत्यतेने मला पीडिले आहे.
Cognovi Domine quia aequitas iudicia tua: et in veritate tua humiliasti me.
76 ७६ तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार, आपल्या कराराच्या विश्वसनीयतेने सांत्वन कर.
Fiat misericordia tua ut consoletur me, secundum eloquium tuum servo tuo.
77 ७७ मला कळवळा दाखव यासाठी की, मी जिवंत राहीन, कारण तुझे नियमशास्त्र माझा आनंद आहे.
Veniant mihi miserationes tuae, et vivam: quia lex tua meditatio mea est.
78 ७८ गर्विष्ठ लज्जित होवोत, कारण त्यांनी माझी निंदानालस्ती केली आहे; पण मी तुझ्या विधींचे मनन करीन;
Confundantur superbi, quia iniuste iniquitatem fecerunt in me: ego autem exercebor in mandatis tuis.
79 ७९ तुझा सन्मान करणारे माझ्याकडे वळोत, म्हणजे त्यांना तुझे निर्बंध कळतील.
Convertantur mihi timentes te: et qui noverunt testimonia tua.
80 ८० मी लज्जित होऊ नये याकरिता माझे हृदय आदराने, तुझ्या निर्दोष नियमाकडे लागू दे.
Fiat cor meum immaculatum in iustificationibus tuis, ut non confundar.
81 ८१ मी तुझ्या विजयासाठी उत्कंठा धरतो; मी तुझ्या वचनावर आशा ठेवली आहे.
CAPH. Defecit in salutare tuum anima mea: et in verbum tuum supersperavi.
82 ८२ माझे डोळे तुझे वचन पाहण्यास आसुसले आहेत; तू माझे सांत्वन कधी करशील?
Defecerunt oculi mei in eloquium tuum, dicentes: Quando consolaberis me?
83 ८३ कारण मी धुरात ठेविलेल्या बुधलीसारखा झालो आहे; तरी मी तुझे नियम विसरलो नाही.
Quia factus sum sicut uter in pruina: iustificationes tuas non sum oblitus.
84 ८४ तुझ्या सेवकाचे किती वेळ वाट पाहावी लागणार आहे? जे माझा छळ करतात. त्यांचा न्याय तू कधी करशील?
Quot sunt dies servi tui: quando facies de persequentibus me iudicium?
85 ८५ गार्विष्ठांनी माझ्यासाठी खाचा खणून ठेविल्या आहेत, तुझे नियमशास्त्र झुगारले आहे.
Narraverunt mihi iniqui fabulationes: sed non ut lex tua.
86 ८६ तुझ्या सर्व आज्ञा विश्वसनीय आहेत; ते लोक माझा छळ अनुचितपणे करत आहेत; मला मदत कर.
Omnia mandata tua veritas: iniqui persecuti sunt me, adiuva me.
87 ८७ त्यांनी पृथ्वीवरून माझा जवळजवळ सर्वनाश केला; पण मी तुझे विधी नाकारले नाहीत.
Paulominus consummaverunt me in terra: ego autem non dereliqui mandata tua.
88 ८८ तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने वचन दिल्याप्रमाणे मला नवजीवन दे, याकरिता की, मी तुझ्या तोंडचे निर्बंध पाळीन.
Secundum misericordiam tuam vivifica me: et custodiam testimonia oris tui.
89 ८९ हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे; तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे.
LAMED. In aeternum Domine, verbum tuum permanet in caelo.
90 ९० तुझी सत्यता सदासर्वदा सर्व पिढ्यानपिढ्यासाठी आहे; तू पृथ्वीची स्थापना केलीस आणि म्हणून ती टिकून राहते.
In generatione et generationem veritas tua: fundasti terram, et permanet.
91 ९१ त्या सर्व गोष्टी आजपर्यंत, तुझ्या निर्णयात म्हटल्याप्रमाणे राहिली आहेत, कारण सर्व गोष्टी तुझी सेवा करतात.
Ordinatione tua perseverat dies: quoniam omnia serviunt tibi.
92 ९२ जर तुझे नियमशास्त्र माझा आनंद नसता, तर माझ्या दुःखात माझा नाश झाला असता.
Nisi quod lex tua meditatio mea est: tunc forte periissem in humilitate mea.
93 ९३ मी तुझे निर्बंध कधीच विसरणार नाही, कारण त्याद्वारे तू मला सजीव ठेवले आहे.
In aeternum non obliviscar iustificationes tuas: quia in ipsis vivificasti me.
94 ९४ मी तुझाच आहे; माझा उध्दार कर. कारण मी तुझे निर्बंध शोधले आहेत.
Tuus sum ego, salvum me fac: quoniam iustificationes tuas exquisivi.
95 ९५ दुष्टांनी माझा नाश करायची तयारी केली आहे, पण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचा शोध घेईन.
Me expectaverunt peccatores ut perderent me: testimonia tua intellexi.
96 ९६ प्रत्येकगोष्टीला त्याची मर्यादा असते हे मी पाहिले आहे, पण तुझ्या आज्ञा व्यापक, मर्यादे पलीकडे आहेत.
Omnis consummationis vidi finem: latum mandatum tuum nimis.
97 ९७ अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.
MEM. Quomodo dilexi legem tuam Domine? tota die meditatio mea est.
98 ९८ तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात, कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत.
Super inimicos meos prudentem me fecisti mandato tuo: quia in aeternum mihi est.
99 ९९ माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे. कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो.
Super omnes docentes me intellexi: quia testimonia tua meditatio mea est.
100 १०० वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते; कारण मी तुझे विधी पाळतो.
Super senes intellexi: quia mandata tua quaesivi.
101 १०१ तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून दूर ठेवतो. या करता, मी तुझे वचन पाळावे.
Ab omni via mala prohibui pedes meos: ut custodiam verba tua.
102 १०२ मी तुझ्या निर्णयापासून दुसऱ्याबाजूला वळलो नाही, कारण तू मला शिकविले आहे.
A iudiciis tuis non declinavi: quia tu legem posuisti mihi.
103 १०३ तुझे वचन माझ्या चवीला कितीतरी गोड आहेत, होय माझ्या मुखाला मधापेक्षा गोड आहेत.
Quam dulcia faucibus meis eloquia tua, super mel ori meo!
104 १०४ तुझ्या विधींच्याद्वारे मला बुद्धी प्राप्त होते; यास्तव मी प्रत्येक खोट्या मार्गाचा द्वेष करतो.
A mandatis tuis intellexi: propterea odivi omnem viam iniquitatis.
105 १०५ तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.
NUN. Lucerna pedibus meis verbum tuum, et lumen semitis meis.
106 १०६ तुझे निर्णय पाळण्याची मी शपथ वाहिली आहे, व ती पक्की केली आहे.
Iuravi, et statui custodire iudicia iustitiae tuae.
107 १०७ मी फार पीडित आहे; हे परमेश्वरा तुझ्या वचनात वचन दिल्याप्रमाणे मला जिवीत ठेव.
Humiliatus sum usquequaque Domine: vivifica me secundum verbum tuum.
108 १०८ हे परमेश्वरा, माझ्या मुखातील वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून स्वीकार कर, आणि मला तुझे निर्णय शिकव.
Voluntaria oris mei beneplacita fac Domine: et iudicia tua doce me.
109 १०९ माझे जीवन नेहमीच धोक्यात असते, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
Anima mea in manibus meis semper: et legem tuam non sum oblitus.
110 ११० दुष्टांनी माझ्यासाठी पाश रचला आहे, पण मी तुझ्या विधीपासून भरकटलो नाही.
Posuerunt peccatores laqueum mihi: et de mandatis tuis non erravi.
111 १११ तुझे निर्बंध माझे सर्वकाळचे वतन म्हणून मी स्वीकारले आहे, कारण त्याच्या योगे माझ्या मनाला आनंद होतो.
Hereditate acquisivi testimonia tua in aeternum: quia exultatio cordis mei sunt.
112 ११२ तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविले आहे.
Inclinavi cor meum ad faciendas iustificationes tuas in aeternum, propter retributionem.
113 ११३ परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.
SAMECH. Iniquos odio habui: et legem tuam dilexi.
114 ११४ मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
Adiutor, et susceptor meus es tu: et in verbum tuum supersperavi.
115 ११५ वाईट करणाऱ्यांनो माझ्यापासून दूर जा, यासाठी की, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन.
Declinate a me maligni: et scrutabor mandata Dei mei.
116 ११६ तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन, आणि माझ्या आशा लज्जित होऊ देऊ नकोस.
Suscipe me secundum eloquium tuum, et vivam: et non confundas me ab expectatione mea.
117 ११७ मला आधार दे म्हणजे मी सुरक्षित राहीन; मी नेहमीच तुझ्या नियमांवर मनन करीन.
Adiuva me, et salvus ero: et meditabor in iustificationibus tuis semper.
118 ११८ तुझ्या नियमापासून बहकले आहेत त्यांना तू नाकारतोस, कारण हे लोक फसवणारे आणि अविश्वसनीय आहेत.
Sprevisti omnes discedentes a iudiciis tuis: quia iniusta cogitatio eorum.
119 ११९ पृथ्वीवरील सर्व दुष्टांना तू गाळाप्रमाणे दूर करतो; म्हणून मी तुझ्या विधीवत करारावर प्रेम करतो.
Praevaricantes reputavi omnes peccatores terrae: ideo dilexi testimonia tua.
120 १२० तुझ्या भितीने माझे शरीर थरथरते, आणि तुझ्या न्याय्य निर्णयाची भिती वाटते.
Confige timore tuo carnes meas: a iudiciis enim tuis timui.
121 १२१ मी जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच करतो; माझा छळ करणाऱ्याकडे मला सोडून देऊ नको.
AIN. Feci iudicium et iustitiam: non tradas me calumniantibus me.
122 १२२ तू आपल्या सेवकाच्या कल्याणार्थ जामीन हो. गर्विष्ठांना मला जाचू देऊ नकोस.
Suscipe servum tuum in bonum: non calumnientur me superbi.
123 १२३ तू सिद्ध केलेल्या तारणाची व तुझ्या न्याय्य वचनाची प्रतिक्षा करून माझे डोळे थकले आहेत.
Oculi mei defecerunt in salutare tuum: et in eloquium iustitiae tuae.
124 १२४ तुझ्या सेवकाला कराराची विश्वसनियता दाखव आणि मला तुझे नियम शिकव.
Fac cum servo tuo secundum misericordiam tuam: et iustificationes tuas doce me.
125 १२५ मी तुझा सेवक आहे, मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे.
Servus tuus sum ego: da mihi intellectum, ut sciam testimonia tua.
126 १२६ ही वेळ परमेश्वराच्या कार्याची आहे, कारण लोकांनी तुझे नियमशास्त्र मोडले आहे.
Tempus faciendi Domine: dissipaverunt legem tuam.
127 १२७ खरोखर मी तुझ्या आज्ञा सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्यापेक्षा प्रिय मानतो.
Ideo dilexi mandata tua, super aurum et topazion.
128 १२८ यास्तव मी काळजी पूर्वक तुझे सर्व विधी पाळतो, आणि प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो.
Propterea ad omnia mandata tua dirigebar: omnem viam iniquam odio habui.
129 १२९ तुझे कराराचे निर्बंध आश्चर्यकारक आहेत; म्हणूनच मी ते पाळतो.
PHE. Mirabilia testimonia tua: ideo scrutata est ea anima mea.
130 १३० तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते.
Declaratio sermonum tuorum illuminat: et intellectum dat parvulis.
131 १३१ मी आपले तोंड उघडले आणि धापा टाकल्या, कारण मी तुझ्या आज्ञेची उत्कंठा धरली.
Os meum aperui, et attraxi spiritum: quia mandata tua desiderabam.
132 १३२ तू माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, जशी तुझ्या नावावर प्रीती करणाऱ्यावर तू दया करतोस.
Aspice in me, et miserere mei, secundum iudicium diligentium nomen tuum.
133 १३३ तुझ्या वचनाप्रमाणे मला मार्गदर्शन कर; माझ्यावर कोणत्याही पापाची सत्ता चालू देऊ नको.
Gressus meos dirige secundum eloquium tuum: et non dominetur mei omnis iniustitia.
134 १३४ मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर याकरिता की, मी तुझे विधी पाळीन.
Redime me a calumniis hominum: ut custodiam mandata tua.
135 १३५ तू आपला मुखप्रकाश आपल्या सेवकावर पाड, आणि तुझे नियम मला शिकव.
Faciem tuam illumina super servum tuum: et doce me iustificationes tuas.
136 १३६ माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात; कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत.
Exitus aquarum deduxerunt oculi mei: quia non custodierunt legem tuam.
137 १३७ हे परमेश्वरा, तू न्यायी आहेस, आणि तुझे निर्णय योग्य आहेत.
SADE. Iustus es Domine: et rectum iudicium tuum.
138 १३८ तू आपले निर्बंध न्याय्य व पूर्ण विश्वसनीय असे लावून दिले आहेत.
Mandasti iustitiam testimonia tua: et veritatem tuam nimis.
139 १३९ रागाने माझा नाश केला आहे, कारण माझे शत्रू तुझे वचन विसरले आहेत.
Tabescere me fecit zelus meus: quia obliti sunt verba tua inimici mei.
140 १४० तुझ्या वचनाची खूपच पारख झाली आहे, आणि ते तुझ्या सेवकाला प्रिय आहे.
Ignitum eloquium tuum vehementer: et servus tuus dilexit illud.
141 १४१ मी उपेक्षणीय आणि तुच्छ मानलेला आहे, तरी मी तुझे विधी विसरत नाही.
Adolescentulus sum ego, et contemptus: iustificationes tuas non sum oblitus.
142 १४२ तुझे न्याय्यत्व हे सर्वकाळ योग्य आहे, आणि नियमशास्त्र सत्य आहे.
Iustitia tua, iustitia in aeternum: et lex tua veritas.
143 १४३ मला खूप संकट आणि क्लेशांनी घेरिले आहे, तरी तुझ्या आज्ञांत मला आनंद आहे.
Tribulatio, et angustia invenerunt me: mandata tua meditatio mea est.
144 १४४ तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.
Aequitas testimonia tua in aeternum: intellectum da mihi, et vivam.
145 १४५ मी संपूर्ण मनापासून तुला हाक मारतो, हे परमेश्वरा, मला उत्तर दे, मी तुझे नियम पाळीन.
COPH. Clamavi in toto corde meo, exaudi me Domine: iustificationes tuas requiram.
146 १४६ मी तुला हाक मारतो; तू मला तार आणि मी तुझे कराराचे नियम पाळीन.
Clamavi ad te, salvum me fac: ut custodiam mandata tua.
147 १४७ मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो. तुझ्या वचनात माझी आशा आहे.
Praeveni in maturitate, et clamavi: quia in verba tua supersperavi.
148 १४८ तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.
Praevenerunt oculi mei ad te diluculo: ut meditarer eloquia tua.
149 १४९ तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक; हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव.
Vocem meam audi secundum misericordiam tuam Domine: et secundum iudicium tuum vivifica me.
150 १५० जे माझा छळ करतात ते माझ्याजवळ येत आहेत, पण ते तुझ्या नियमशास्रापासून फार दूर आहेत.
Appropinquaverunt persequentes me iniquitati: a lege autem tua longe facti sunt.
151 १५१ हे परमेश्वरा, तू जवळ आहेस आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.
Prope es tu Domine: et omnes viae tuae veritas.
152 १५२ तुझ्या कराराच्या निर्बंधावरून मला पूर्वीपासून माहित आहे की, ते तू सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
Initio cognovi de testimoniis tuis: quia in aeternum fundasti ea.
153 १५३ माझे दु: ख पाहा आणि मला मदत कर, कारण मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही.
RES. Vide humilitatem meam, et eripe me: quia legem tuam non sum oblitus.
154 १५४ तू माझा वाद चालव आणि माझा उद्धार कर. तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे.
Iudica iudicium meum, et redime me: propter eloquium tuum vivifica me.
155 १५५ दुष्टपासून तारण फार दूर आहे, कारण त्यांना तुझे नियम प्रिय नाहीत.
Longe a peccatoribus salus: quia iustificationes tuas non exquisierunt.
156 १५६ हे परमेश्वरा, तुझी करुणा थोर आहे, तू आपल्या निर्णयास अनुसरुन मला नवजीवन दे.
Misericordiae tuae multae Domine: secundum iudicium tuum vivifica me.
157 १५७ मला छळणारे माझे शत्रू पुष्कळ आहेत, तरी मी तुझ्या कराराच्या निर्बंधापासून मागे वळलो नाही.
Multi qui persequuntur me, et tribulant me: a testimoniis tuis non declinavi.
158 १५८ विश्वासघातक्यांना पाहून मला वीट आला आहे. कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत.
Vidi praevaricantes, et tabescebam: quia eloquia tua non custodierunt.
159 १५९ तुझ्या विधींना मी किती प्रिय मानितो ते पाहा; हे परमेश्वरा, तुझ्या वचनाप्रमाणे कराराच्या विश्वसनीयतेने मला जिवंत ठेव.
Vide quoniam mandata tua dilexi Domine: in misericordia tua vivifica me.
160 १६० तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे; तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.
Principium verborum tuorum, veritas: in aeternum omnia iudicia iustitiae tuae.
161 १६१ अधिपती विनाकारण माझ्या पाठीस लागले आहेत; तुझे वचन न पाळल्यामुळे माझे हृदय भितीने कापते.
SIN. Principes persecuti sunt me gratis: et a verbis tuis formidavit cor meum.
162 १६२ ज्याला मोठी लूट सापडली त्याच्यासारखा मला तुझ्या वचनाविषयी आनंद होतो.
Laetabor ego super eloquia tua: sicut qui invenit spolia multa.
163 १६३ मी असत्याचा द्वेष आणि तिरस्कार करतो, पण मला तुझे नियमशास्त्र प्रिय आहे.
Iniquitatem odio habui, et abominatus sum: legem autem tuam dilexi.
164 १६४ मी दिवसातून सात वेळा तुझ्या न्याय्य, निर्णयांसाठी तुझी स्तुती करतो.
Septies in die laudem dixi tibi, super iudicia iustitiae tuae.
165 १६५ तुझ्या नियमशास्त्रावर प्रेम करणाऱ्यास मोठी शांती असते, त्यास कसलेच अडखळण नसते.
Pax multa diligentibus legem tuam: et non est illis scandalum.
166 १६६ हे परमेश्वरा, मी तुझ्या उध्दाराची वाट पाहत आहे आणि तुझ्या आज्ञा मी पाळल्या आहेत.
Expectabam salutare tuum Domine: et mandata tua dilexi.
167 १६७ मी तुझ्या विधीवत आज्ञांप्रमाणे वागलो, आणि मला ते अत्यंत प्रिय आहेत.
Custodivit anima mea testimonia tua: et dilexit ea vehementer.
168 १६८ मी तुझे निर्बंध आणि तुझे विधीवत आज्ञा पाळल्या आहेत, कारण मी जी प्रत्येकगोष्ट केली ते सर्व तुला माहित आहे.
Servavi mandata tua, et testimonia tua: quia omnes viae meae in conspectu tuo.
169 १६९ हे परमेश्वरा, माझी मदतीसाठीची आरोळी ऐक. तू आपल्या वचनाप्रमाणे मला बुद्धी दे.
TAU. Appropinquet deprecatio mea in conspectu tuo Domine: iuxta eloquium tuum da mihi intellectum.
170 १७० माझी विनंती तुझ्यासमोर येवो; तू वचन दिल्याप्रमाणे मला मदत कर.
Intret postulatio mea in conspectu tuo: secundum eloquium tuum eripe me.
171 १७१ तू मला आपले नियम शिकवितोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो.
Eructabunt labia mea hymnum, cum docueris me iustificationes tuas.
172 १७२ माझी जीभ तुझ्या वचनाची स्तुती गावो; कारण तुझ्या सर्व आज्ञा न्याय्य आहेत.
Pronunciabit lingua mea eloquium tuum: quia omnia mandata tua aequitas.
173 १७३ तुझा हात माझे साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण तुझे निर्बंध मी निवडले आहेत.
Fiat manus tua ut salvet me: quoniam mandata tua elegi.
174 १७४ हे परमेश्वरा, मी तुझ्या तारणाची उत्कंठा धरली आहे आणि तुझ्या नियमशास्त्रत मला आनंद आहे.
Concupivi salutare tuum Domine: et lex tua meditatio mea est.
175 १७५ माझा जीव वाचो म्हणजे तो तुझी स्तुती करील; तुझे निर्णय मला मदत करो.
Vivet anima mea, et laudabit te: et iudicia tua adiuvabunt me.
176 १७६ मी हरवलेल्या मेंढराप्रमाणे भरकटलो आहे; तू आपल्या सेवकाचा शोध कर, कारण मी तुझ्या आज्ञा विसरलो नाही.
Erravi, sicut ovis, quae periit: quaere servum tuum, quia mandata tua non sum oblitus.

< स्तोत्रसंहिता 119 >