< स्तोत्रसंहिता 118 >
1 १ परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
Аллилуия. Славьте Господа, ибо Он благ, ибо вовек милость Его.
2 २ इस्राएलाने आता म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
Да скажет ныне дом Израилев: Он благ, ибо вовек милость Его.
3 ३ अहरोनाच्या घराण्याने म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
Да скажет ныне дом Ааронов: Он благ, ибо вовек милость Его.
4 ४ परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”
Да скажут ныне боящиеся Господа: Он благ, ибо вовек милость Его.
5 ५ मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
Из тесноты воззвал я к Господу, - и услышал меня, и на пространное место вывел меня Господь.
6 ६ परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही; मनुष्य माझे काय करू शकेल?
Господь за меня - не устрашусь: что сделает мне человек?
7 ७ माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे; माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन.
Господь мне помощник: буду смотреть на врагов моих.
8 ८ मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे.
Лучше уповать на Господа, нежели надеяться на человека.
9 ९ मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे.
Лучше уповать на Господа, нежели надеяться на князей.
10 १० सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन.
Все народы окружили меня, но именем Господним я низложил их;
11 ११ त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
обступили меня, окружили меня, но именем Господним я низложил их;
12 १२ त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.
окружили меня, как пчелы сот, и угасли, как огонь в терне: именем Господним я низложил их.
13 १३ मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, परंतु परमेश्वराने मला मदत केली.
Сильно толкнули меня, чтобы я упал, но Господь поддержал меня.
14 १४ परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. आणि तो माझे तारण झाला आहे.
Господь - сила моя и песнь; Он соделался моим спасением.
15 १५ उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
Глас радости и спасения в жилищах праведников: десница Господня творит силу!
16 १६ परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.
Десница Господня высока, десница Господня творит силу!
17 १७ मी मरणार नाही, पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन.
Не умру, но буду жить и возвещать дела Господни.
18 १८ परमेश्वराने मला जबर शिक्षा केली; परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही.
Строго наказал меня Господь, но смерти не предал меня.
19 १९ माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा; मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन.
Отворите мне врата правды; войду в них, прославлю Господа.
20 २० हे परमेश्वराचे दार आहे; नितीमान त्यातून प्रवेश करतील.
Вот врата Господа; праведные войдут в них.
21 २१ मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे आणि तू माझे तारण झाला आहेस.
Славлю Тебя, что Ты услышал меня и соделался моим спасением.
22 २२ इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता, तोच कोनाशिला झाला आहे.
Камень, который отвергли строители, соделался главою угла:
23 २३ परमेश्वराने हे केले आहे; आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे.
это - от Господа, и есть дивно в очах наших.
24 २४ परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे; ह्यात आपण आनंद व उल्लास करू.
Сей день сотворил Господь: возрадуемся и возвеселимся в оный!
25 २५ हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर; हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर.
О, Господи, спаси же! О, Господи, споспешествуй же!
26 २६ परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो; परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो.
Благословен грядущий во имя Господне! Благословляем вас из дома Господня.
27 २७ परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे; यज्ञाचा पशू वेदीच्या शिंगास दोरीने बांधा.
Бог - Господь, и осиял нас; вяжите вервями жертву, ведите к рогам жертвенника.
28 २८ तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन. तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन.
Ты Бог мой: буду славить Тебя; Ты Бог мой: буду превозносить Тебя, буду славить Тебя, ибо Ты услышал меня и соделался моим спасением.
29 २९ अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.
Славьте Господа, ибо Он благ, ибо вовек милость Его.