< स्तोत्रसंहिता 116 >
1 १ मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो.
Milo mi je što Gospod usliši molitveni glas moj;
2 २ कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन.
Što prignu k meni uho svoje; i zato æu ga u sve dane svoje prizivati.
3 ३ मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, संकट व क्लेश मला झाले. (Sheol )
Opkoliše me bolesti smrtne, i jadi pakleni zadesiše me, naiðoh na tugu i muku; (Sheol )
4 ४ नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.”
Ali prizvah ime Gospodnje: Gospode! izbavi dušu moju!
5 ५ परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे.
Dobar je Gospod i pravedan, i Bog je naš milostiv;
6 ६ परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले.
Èuva proste Gospod; bijah u nevolji, i pomože mi.
7 ७ हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये; कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत.
Vrati se, dušo moja, u mir svoj! jer je Gospod dobrotvor tvoj!
8 ८ तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून, आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत.
Ti si izbavio dušu moju od smrti, oko moje od suza, nogu moju od spoticanja.
9 ९ जीवंताच्या भूमित परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन.
Hodiæu pred licem Gospodnjim po zemlji živijeh.
10 १० मी फार पीडित आहे असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे.
Vjerovah kad govorih: u ljutoj sam nevolji.
11 ११ मी अविचाराने म्हणालो की, सगळे माणसे खोटारडे आहेत.
Rekoh u smetnji svojoj: svaki je èovjek laža.
12 १२ परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू?
Šta æu vratiti Gospodu za sva dobra što mi je uèinio?
13 १३ मी तारणाचा प्याला उंचावून परमेश्वराच्या नावाने हाक मारीन.
Uzeæu èašu spasenja, i prizvaæu ime Gospodnje.
14 १४ त्याच्या सर्व लोकांसमोर, मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
Izvršiæu obeæanja svoja Gospodu pred svijem narodom njegovijem.
15 १५ परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे.
Skupa je pred Gospodom smrt svetaca njegovijeh.
16 १६ हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे; मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे; माझी बंधने तू सोडली आहेस.
O Gospode! ja sam sluga tvoj, ja sam sluga tvoj, sin sluškinje tvoje; raskovao si s mene okove moje.
17 १७ मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
Žrtvu za hvalu prinijeæu tebi, i ime Gospodnje prizvaæu.
18 १८ मी त्याच्या सर्व लोकांसमोर परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
Izvršiæu obeæanja svoja Gospodu pred svijem narodom njegovijem,
19 १९ परमेश्वराच्या घराच्या अंगणात, यरूशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेश्वराची स्तुती करा.
U dvoru doma Gospodnjega, usred tebe, Jerusalime. Aliluja!