< स्तोत्रसंहिता 115 >
1 १ हे परमेश्वरा, आमचे नको. आमचे नको, तर आपल्या नावाचा सन्मान कर, कारण तू दयाळू आणि सत्य आहेस.
耶和华啊,荣耀不要归与我们, 不要归与我们; 要因你的慈爱和诚实归在你的名下!
2 २ ह्यांचा देव कोठे आहे, असे राष्ट्रांनी का म्हणावे?
为何容外邦人说: 他们的 神在哪里呢?
3 ३ आमचा देव स्वर्गात आहे; त्यास जे आवडते ते तो करतो.
然而,我们的 神在天上, 都随自己的意旨行事。
4 ४ राष्ट्रांच्या मूर्ती सोन्याच्या व रुप्याच्या आहेत. त्या मनुष्यांच्या हातचे काम आहेत.
他们的偶像是金的,银的, 是人手所造的,
5 ५ त्या मूर्त्यांना तोंड आहे, पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत, पण त्यांना बघता येत नाही.
有口却不能言, 有眼却不能看,
6 ६ त्यांना कान आहेत, पण त्यांना ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे, पण त्यांना वास घेता येत नाही.
有耳却不能听, 有鼻却不能闻,
7 ७ त्यांना हात आहेत, पण त्यांना स्पर्श करता येत नाही. त्यांना पाय आहेत पण त्या चालू शकत नाही; किंवा त्यांच्या मुखाने त्यांना बोलता येत नाही.
有手却不能摸, 有脚却不能走, 有喉咙也不能出声。
8 ८ जे त्यांना बनवितात त्यांच्याप्रमाणेच, त्यांच्यावर भरवसा ठेवणारा प्रत्येकजन आहे.
造他的要和他一样; 凡靠他的也要如此。
9 ९ हे इस्राएला, परमेश्वरावर विश्वास ठेव. तो त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.
以色列啊,你要倚靠耶和华! 他是你的帮助和你的盾牌。
10 १० हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर विश्वास ठेव; तोच त्याचे सहाय्य आणि ढाल आहे.
亚伦家啊,你们要倚靠耶和华! 他是你们的帮助和你们的盾牌。
11 ११ अहो परमेश्वराचा आदर करणाऱ्यांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा; तोच त्यांचे सहाय्य आणि ढाल आहे.
你们敬畏耶和华的,要倚靠耶和华! 他是你们的帮助和你们的盾牌。
12 १२ परमेश्वराने आमची दखल घेतली आहे आणि आम्हास आशीर्वाद देईल. तो इस्राएलाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. तो अहरोनाच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल.
耶和华向来眷念我们; 他还要赐福给我们: 要赐福给以色列的家, 赐福给亚伦的家。
13 १३ जे परमेश्वराचा आदर करतात, त्या तरुण आणि वृद्ध या दोघांना तो आशीर्वाद देईल.
凡敬畏耶和华的,无论大小, 主必赐福给他。
14 १४ परमेश्वर तुम्हास अधिकाधिक वाढवो, तो तुमची आणि तुमच्या वंशजांची वाढ करो.
愿耶和华叫你们 和你们的子孙日见加增。
15 १५ आकाश व पृथ्वी ही निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा तुम्हास आशीर्वाद असो.
你们蒙了造天地之耶和华的福!
16 १६ स्वर्ग तर परमेश्वराचा आहे; पण त्यांने मानवजातीला पृथ्वी दिली आहे.
天,是耶和华的天; 地,他却给了世人。
17 १७ मरण पावलेले म्हणजे निवांतस्थानी उतरलेले कोणीहि परमेश्वराची स्तुती करीत नाहीत.
死人不能赞美耶和华; 下到寂静中的也都不能。
18 १८ पण आम्ही आता आणि सदासर्वकाळ परमेश्वरास धन्यवाद देत राहू. परमेश्वराची स्तुती करा.
但我们要称颂耶和华, 从今时直到永远。 你们要赞美耶和华!