< स्तोत्रसंहिता 114 >

1 जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले,
Ko je izhajal Izrael iz Egipta, družina Jakobova izmed ljudstva tujega jezika:
2 तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाले.
Bil je Juda svetišče njegovo, Izrael gospostvo njegovo.
3 समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली.
Morje samo je videlo in bežalo, Jordan sam se je obrnil nazaj.
4 पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या.
Sami hribi so poskakovali kakor ovni, kakor mlada jagnjeta griči.
5 हे समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देने तू का मागे हटलीस?
Kaj ti je bilo, morje, da si bežalo? o Jordan, da si se obrnil nazaj?
6 पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता?
O hribi, zakaj bi poskakovali kakor ovni? griči kakor jagnjeta mlada?
7 हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर थरथर काप.
Pred obličjem Gospodovim potresi se zemlja; pred obličjem Boga Jakobovega,
8 तो खडक पाण्याच्या तळ्यात, कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.
Kateri izpremeni samo skalo v stoječo vodo; kremenje v studenec vodâ.

< स्तोत्रसंहिता 114 >