< स्तोत्रसंहिता 114 >
1 १ जेव्हा इस्राएल मिसरातून, याकोबाचे घराणे त्या परकी लोकांतून निघाले,
Halleluja! Da Israel drog fra Ægypten, Jakobs Hus fra det stammende Folk,
2 २ तेव्हा यहूदा त्याचे पवित्रस्थान झाला, इस्राएल त्याचे राज्य झाले.
da blev Juda hans Helligdom, Israel blev hans Rige.
3 ३ समुद्राने पाहिले आणि पळाला; यार्देन मागे हटली.
Havet saa det og flyede, Jordan trak sig tilbage,
4 ४ पर्वतांनी मेंढ्यांसारख्या, टेकड्यांनी कोकरासारख्या उड्या मारल्या.
Bjergene sprang som Vædre, Højene hopped som Lam.
5 ५ हे समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देने तू का मागे हटलीस?
Hvad fejler du, Hav, at du flyr, Jordan, hvi gaar du tilbage,
6 ६ पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांसारख्या का उड्या मारता? लहान टेकड्यांनो, तुम्ही कोकरासारख्या का उड्या मारता?
hvi springer I Bjerge som Vædre, hvi hopper I Høje som Lam?
7 ७ हे पृथ्वी, तू प्रभूसमोर, याकोबाच्या देवासमोर थरथर काप.
Skælv, Jord, for HERRENS Aasyn, for Jakobs Guds Aasyn,
8 ८ तो खडक पाण्याच्या तळ्यात, कठीण खडक पाण्याच्या झऱ्यात बदलतो.
han, som gør Klipper til Vanddrag, til Kildevæld haarden Flint!