< स्तोत्रसंहिता 113 >
1 १ परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा.
Halelujah. Chvalte služebníci Hospodinovi, chvalte jméno Hospodinovo.
2 २ आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो.
Budiž jméno Hospodinovo požehnáno od tohoto času až na věky.
3 ३ सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो.
Od východu slunce až do západu jeho chváleno buď jméno Hospodinovo.
4 ४ परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो.
Vyvýšenť jest nade všecky národy Hospodin, a nad nebesa sláva jeho.
5 ५ आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे,
Kdo jest rovný Hospodinu Bohu našemu, kterýž vysoko bydlí?
6 ६ जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो,
Kterýž snižuje se, aby všecko spatřoval, což jest na nebi i na zemi.
7 ७ तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो.
Vyzdvihuje z prachu nuzného, a z hnoje vyvyšuje chudého,
8 ८ अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे.
Aby jej posadil s knížaty, s knížaty lidu svého.
9 ९ अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा.
Kterýž vzdělává neplodnou v čeled, a matku veselící se z dítek. Halelujah.