< स्तोत्रसंहिता 111 >
1 १ परमेश्वराची स्तुती करा. सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल.
할렐루야! 내가 정직한 자의 회와 공회 중에서 전심으로 여호와께 감사하리로다
2 २ परमेश्वराचे कार्य महान आहेत, जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात.
여호와의 행사가 크시니 이를 즐거워하는 자가 다 연구하는도다
3 ३ त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे, आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते.
그 행사가 존귀하고 엄위하며 그 의가 영원히 있도다
4 ४ त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले; परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे.
그 기이한 일을 사람으로 기억케 하셨으니 여호와는 은혜로우시고 자비하시도다
5 ५ तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो. तो आपला करार नेहमी आठवतो.
여호와께서 자기를 경외하는 자에게 양식을 주시며 그 언약을 영원히 기억하시리로다
6 ६ त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन, आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत.
저가 자기 백성에게 열방을 기업으로 주사 그 행사의 능을 저희에게 보이셨도다
7 ७ त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे; त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत.
그 손의 행사는 진실과 공의며 그 법도는 다 확실하니
8 ८ ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत, ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
영원 무궁히 정하신 바요 진실과 정의로 행하신 바로다
9 ९ त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे; त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे, देवाचे नाव पवित्र व भितीदायक आहे.
여호와께서 그 백성에게 구속을 베푸시며 그 언약을 영원히 세우셨으니 그 이름이 거룩하고 지존하시도다
10 १० परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील.
여호와를 경외함이 곧 지혜의 근본이라 그 계명을 지키는 자는 다 좋은 지각이 있나니 여호와를 찬송함이 영원히 있으리로다