< स्तोत्रसंहिता 111 >

1 परमेश्वराची स्तुती करा. सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी परमेश्वरास अगदी मनापासून धन्यवाद देईल.
主をほめたたえよ。わたしは正しい者のつどい、および公会で、心をつくして主に感謝する。
2 परमेश्वराचे कार्य महान आहेत, जे सर्व त्याची आवड धरतात ते उत्सुकतेने त्याची प्रतीक्षा करतात.
主のみわざは偉大である。すべてそのみわざを喜ぶ者によって尋ね窮められる。
3 त्याचे कार्य ऐश्वर्यशाली आणि वैभवशाली आहे, आणि त्याचे न्यायीपण सर्वकाळ टिकून राहते.
そのみわざは栄光と威厳とに満ち、その義はとこしえに、うせることがない。
4 त्याच्या आश्चर्यकारक गोष्टी आठवणीत राहतील असे त्याने केले; परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे.
主はそのくすしきみわざを記念させられた。主は恵みふかく、あわれみに満ちていられる。
5 तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्यांना अन्न देतो. तो आपला करार नेहमी आठवतो.
主はおのれを恐れる者に食物を与え、その契約をとこしえに心にとめられる。
6 त्याने आपल्या लोकांस राष्ट्रांचे वतन देऊन, आपली सामर्थ्याची कार्ये दाखवली आहेत.
主はもろもろの国民の所領をその民に与えて、みわざの力をこれにあらわされた。
7 त्याच्या हातचे कार्य सत्य व न्याय्य आहे; त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत.
そのみ手のわざは真実かつ公正であり、すべてのさとしは確かである。
8 ते प्रामाणिकपणाने आणि योग्य रीतीने नेमिलेले आहेत, ते सर्वकाळासाठी स्थापिले आहेत.
これらは世々かぎりなく堅く立ち、真実と正直とをもってなされた。
9 त्याने आपल्या लोकांस विजय दिला आहे; त्याने आपला करार सर्वकाळासाठी ठरवला आहे, देवाचे नाव पवित्र व भितीदायक आहे.
主はその民にあがないを施し、その契約をとこしえに立てられた。そのみ名は聖にして、おそれおおい。
10 १० परमेश्वराचे भय शहाणपणाची सुरुवात आहे; जे त्याप्रमाणे वागतात त्यास सुबुद्धी प्राप्त होते. त्याची स्तुती सर्वकाळ टिकून राहील.
主を恐れることは知恵のはじめである。これを行う者はみな良き悟りを得る。主の誉は、とこしえに、うせることはない。

< स्तोत्रसंहिता 111 >