< स्तोत्रसंहिता 110 >
1 १ दाविदाचे स्तोत्र माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.”
यहोवा ने मेरे ख़ुदावन्द से कहा, “जब तक कि मैं तेरे दुश्मनों को तेरे पाँव की चौकी न कर दूँ।”
2 २ परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील.
ख़ुदावन्द तेरे ज़ोर का 'असा सिय्यून से भेजेगा। तू अपने दुश्मनों में हुक्मरानी कर।
3 ३ तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत.
लश्करकशी के दिन तेरे लोग ख़ुशी से अपने आप को पेश करते हैं; तेरे जवान पाक आराइश में हैं, और सुबह के बत्न से शबनम की तरह।
4 ४ परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही, “तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे तू सर्वकाळ याजक आहेस.”
ख़ुदावन्द ने क़सम खाई है और फिरेगा नहीं, “तू मलिक — ए — सिद्क के तौर पर हमेशा तक काहिन है।”
5 ५ प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे. तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील.
ख़ुदावन्द तेरे दहने हाथ पर अपने कहर के दिन बादशाहों को छेद डालेगा।
6 ६ तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील; तो प्रेतांनी दऱ्या भरील; तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील.
वह क़ौमों में 'अदालत करेगा, वह लाशों के ढेर लगा देगा; और बहुत से मुल्कों में सिरों को कुचलेगा।
7 ७ तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल, आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल.
वह राह में नदी का पानी पिएगा; इसलिए वह सिर को बुलन्द करेगा।