< स्तोत्रसंहिता 11 >
1 १ मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो; पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा, असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता?
Svoje trdno upanje polagam v Gospoda. Kako pravite moji duši: »Béži kakor ptica k svoji gori?«
2 २ कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात.
Kajti glej, zlobni upogibajo svoj lok, svojo puščico pripravljajo na tetivo, da bi lahko na skrivaj streljali na iskrenega v srcu.
3 ३ कारण जर पायेच नष्ट केले, तर न्यायी काय करणार?
Če so temelji razrušeni, kaj lahko stori pravični?
4 ४ परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे; त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात.
Gospod je v svojem svetem templju, Gospodov prestol je na nebu. Njegove oči gledajo, njegove veke preizkušajo človeške otroke.
5 ५ परमेश्वर नितीमानाची पारख करतो. परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो.
Gospod preizkuša pravičnega. Toda zlobnega in tistega, ki ljubi nasilje, sovraži njegova duša.
6 ६ तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील, दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल.
Na zlobne bo deževal pasti, ogenj, žveplo in strašen vihar. To bo delež njihove skodelice.
7 ७ कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे. सरळ असलेले त्याचे मुख पाहतील.
Kajti pravičen Gospod ljubi pravičnost, njegovo obličje gleda iskrenega.