< स्तोत्रसंहिता 11 >

1 मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो; पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा, असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता?
聖歌隊の指揮者によってうたわせたダビデの歌 わたしは主に寄り頼む。なにゆえ、あなたがたはわたしにむかって言うのか、「鳥のように山にのがれよ。
2 कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात.
見よ、悪しき者は、暗やみで、心の直き者を射ようと弓を張り、弦に矢をつがえている。
3 कारण जर पायेच नष्ट केले, तर न्यायी काय करणार?
基が取りこわされるならば、正しい者は何をなし得ようか」と。
4 परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे; त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात.
主はその聖なる宮にいまし、主のみくらは天にあり、その目は人の子らをみそなわし、そのまぶたは人の子らを調べられる。
5 परमेश्वर नितीमानाची पारख करतो. परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो.
主は正しき者をも、悪しき者をも調べ、そのみ心は乱暴を好む者を憎まれる。
6 तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील, दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल.
主は悪しき者の上に炭火と硫黄とを降らせられる。燃える風は彼らがその杯にうくべきものである。
7 कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे. सरळ असलेले त्याचे मुख पाहतील.
主は正しくいまして、正しい事を愛されるからである。直き者は主のみ顔を仰ぎ見るであろう。

< स्तोत्रसंहिता 11 >