< स्तोत्रसंहिता 108 >

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन.
שִׁיר מִזְמוֹר לְדָוִֽד׃ נָכוֹן לִבִּי אֱלֹהִים אָשִׁירָה וַאֲזַמְּרָה אַף־כְּבוֹדִֽי׃
2 हे सतार आणि वीणे, तुम्ही जागृत व्हा. मी पहाटेला जागे करीन.
עוּרָֽה הַנֵּבֶל וְכִנּוֹר אָעִירָה שָּֽׁחַר׃
3 हे परमेश्वरा, मी तुला लोकांमध्ये धन्यवाद देईन; मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुतीगान गाईन.
אוֹדְךָ בָעַמִּים ׀ יְהֹוָה וַאֲזַמֶּרְךָ בַּלְאֻמִּֽים׃
4 कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे; आणि तुझी सत्यता आकाशाला पोहचली आहे.
כִּי־גָדוֹל מֵעַל־שָׁמַיִם חַסְדֶּךָ וְֽעַד־שְׁחָקִים אֲמִתֶּֽךָ׃
5 हे देवा, तू आकांशाच्यावर उंचावलेला आहे. आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर होवो.
רוּמָה עַל־שָׁמַיִם אֱלֹהִים וְעַל כׇּל־הָאָרֶץ כְּבוֹדֶֽךָ׃
6 म्हणून ज्यांना तू प्रेम करतो त्यांनी वाचावे, तुझ्या उजव्या हाताने आम्हास वाचव आणि मला उत्तर दे.
לְמַעַן יֵחָלְצוּן יְדִידֶיךָ הוֹשִׁיעָה יְמִֽינְךָ וַעֲנֵֽנִי׃
7 देव आपल्या पवित्रतेत म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
אֱלֹהִים ׀ דִּבֶּר בְּקׇדְשׁוֹ אֶעְלֹזָה אֲחַלְּקָה שְׁכֶם וְעֵמֶק סֻכּוֹת אֲמַדֵּֽד׃
8 गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे. एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे. यहूदा माझा राजदंड आहे.
לִי גִלְעָד ׀ לִי מְנַשֶּׁה וְאֶפְרַיִם מָעוֹז רֹאשִׁי יְהוּדָה מְחֹקְקִֽי׃
9 मवाब माझे स्नानाचे पात्र आहे. अदोमावर मी आपले पादत्राण फेकीन. मी पलिष्टीया विषयी विजयाने आरोळी करीन.”
מוֹאָב ׀ סִיר רַחְצִי עַל־אֱדוֹם אַשְׁלִיךְ נַעֲלִי עֲלֵי־פְלֶשֶׁת אֶתְרוֹעָֽע׃
10 १० तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल? मला अदोमात कोण नेईल?
מִי יֹבִלֵנִי עִיר מִבְצָר מִי נָחַנִי עַד־אֱדֽוֹם׃
11 ११ हे देवा, तू आम्हास नाकारले नाही का? तू आमच्या सैन्याबरोबर युद्धास गेला नाहीस.
הֲלֹֽא־אֱלֹהִים זְנַחְתָּנוּ וְֽלֹא־תֵצֵא אֱלֹהִים בְּצִבְאֹתֵֽינוּ׃
12 १२ आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत दे, कारण मनुष्याची मदत निष्फळ आहे.
הָבָה־לָּנוּ עֶזְרָת מִצָּר וְשָׁוְא תְּשׁוּעַת אָדָֽם׃
13 १३ देवाच्या मदतीने आम्ही विजयी होऊ; तो आपल्या शत्रूला पायाखाली तुडवील.
בֵּאלֹהִים נַעֲשֶׂה־חָיִל וְהוּא יָבוּס צָרֵֽינוּ׃

< स्तोत्रसंहिता 108 >