< स्तोत्रसंहिता 107 >
1 १ परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे.
Þakkið Drottni, því að hann er góður og miskunn hans varir að eilífu.
2 २ परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरून त्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे,
Hafi Drottinn frelsað þig, þá segðu frá því! Segðu öðrum frá því að hann hafi frelsað þig frá óvinum þínum.
3 ३ त्याने त्यांना परक्या देशातून पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण या दिशातून एकवट केले आहे.
Hann leiddi hina útlægu heim frá ystu endimörkum jarðarinnar.
4 ४ ते रानात वैराण प्रदेशातील रस्त्याने भटकले; आणि त्यांना राहण्यास नगर सापडले नाही.
Þeir ráfuðu heimilislausir um eyðimörkina,
5 ५ ते खूप भुकेले आणि तान्हेले होते; आणि ते थकव्याने मूर्च्छित झाले.
hungraðir og þyrstir og að niðurlotum komnir.
6 ६ नंतर त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना त्यांच्या विपत्तीतून सोडवले.
„Drottinn, hjálpaðu okkur!“hrópuðu þeir, og hann svaraði bæn þeirra!
7 ७ त्याने त्यांना सरळ मार्गाने नेले यासाठी की, त्या नगरात त्यांना वस्त्ती करावी
Hann leiddi þá í öruggt skjól, til byggilegrar borgar.
8 ८ अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत.
Ó, að þetta fólk vildi nú lofa Drottin fyrir miskunn hans og öll hans dásamlegu verk,
9 ९ कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले, आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले.
því að hann svalar þyrstri sál og mettar hungraðan gæðum.
10 १० काही कैदी क्लेशाने आणि साखळ्यांनी जखडलेले असता; काळोखात आणि मरणाच्या छायेत बसले आहेत.
Hverjir eru þessir sem sitja í myrkri og skugga dauðans, þjáðir af eymd og volæði?
11 ११ त्यांनी देवाच्या वचनाविरुध्द बंड केले, आणि त्यांनी परात्पराचे शिक्षण नापसंत केले.
Þeir gerðu uppreisn gegn Drottni, fyrirlitu hann, hinn hæsta Guð.
12 १२ त्यांने त्यांचे हृदय कष्टाद्वारे नम्र केले; ते अडखळून पडले आणि त्यांना मदत करायला तेथे कोणीही नव्हता.
Þess vegna beygði hann þá með mæðu. Þeir hrösuðu og enginn gat hjálpað þeim á fætur.
13 १३ तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणले.
Þá hrópuðu þeir til Drottins í neyð sinni og hann bjargaði þeim!
14 १४ देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले, आणि त्यांची बंधणे तोडली.
Hann leiddi þá út úr myrkri og skugga dauðans og braut fjötra þeirra.
15 १५ परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टीबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
Þeir skulu lofa Drottin fyrir elsku hans og öll hans miskunnarverk!
16 १६ कारण त्याने पितळेची दारे तोडली, आणि लोखंडाचे गज तोडून टाकले.
Því að hann mölvaði hlið dýflissunnar og braut sundur rimlana.
17 १७ आपल्या बंडखोरीच्या मार्गात ते मूर्ख होते, आणि आपल्या पापामुळे ते पीडिले होते.
Sumir kölluðu yfir sig ógæfu með heimsku sinni.
18 १८ सर्व उत्तम अन्न खाण्याची इच्छा त्यांना होईना आणि ते मरणाच्या दाराजवळ ओढले गेले.
Loks bauð þeim við öllum mat. Þeir sáu ekkert framundan nema dauðann.
19 १९ तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना क्लेशातून बाहेर आणले.
Þá kölluðu þeir til Drottins í neyð sinni og hann bjargaði þeim úr angist þeirra, kom þeim á réttan veg.
20 २० त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले, आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले.
Hann sendi út orð sitt og læknaði þá, hreif þá frá dyrum dauðans.
21 २१ परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता व त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
Ó, að menn þessir vildu lofa Drottin fyrir elsku hans og öll hans dásemdarverk!
22 २२ ते त्यास आभाररुपी यज्ञ अर्पण करोत, आणि गाण्यात त्याची कृत्ये जाहीर करोत.
Þeir þakki honum heilshugar og kunngjöri verk hans með gleði.
23 २३ काही जहाजातून समुद्र प्रवास करतात, आणि महासागरापार व्यवसाय करतात.
Og svo eru þeir sem sigla um höfin, kaupmenn sem flytja vörur milli landa.
24 २४ ते परमेश्वराची कृत्ये पाहतात, आणि त्याची अद्भुत कृत्ये समुद्रावर पाहतात.
Einnig þeir fá að reyna máttarverk Drottins.
25 २५ कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो; तेव्हा समुद्र खवळतो.
Hann kallar á storminn og lætur öldurnar rísa.
26 २६ लाटा आकाशापर्यंत वर पोहचतात, मग त्या खाली खोल तळाकडे जातात. मनुष्याचे धैर्य धोक्यामुळे गळून जाते.
Skipin sveiflast til himins og hverfa í öldudali – öllum um borð fellst hugur í neyðinni.
27 २७ ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात, आणि त्यांची बुद्धी गुंग होते.
Þeir ramba og skjögra eins og drukknir menn og vita ekki sitt rjúkandi ráð.
28 २८ तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात, आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो.
Þá hrópa þeir til Drottins í neyð sinni og hann frelsar þá.
29 २९ तो वादळ शांत करतो, आणि लाटांना स्तब्ध करतो.
Hann kyrrir bæði sjó og vind.
30 ३० समुद्र शांत झाल्यामुळे ते आनंद करतात, तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास आणतो.
Hvílík blessun að ná höfn og njóta lognsins!
31 ३१ परमेश्वरास त्याच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
Ó, að þessir menn vildu þakka Drottni miskunn hans og öll hans dásemdarverk.
32 ३२ लोकांच्या मंडळीत तो उंचविला जावो आणि वडिलांच्या सभेत त्याची स्तुती होवो.
Þeir lofi hann upphátt í söfnuðinum og í áheyrn leiðtoga Ísraels.
33 ३३ तो नद्यांना रान करतो, पाण्याच्या झऱ्यांची कोरडी भूमी करतो,
Hann þurrkar upp fljótin
34 ३४ आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो. कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे.
og gerir land óguðlegra að skorpinni saltsléttu.
35 ३५ तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो, आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो.
En hann kann líka að breyta auðninni í frjósama og vatnsríka vin.
36 ३६ तेथे भुकेल्यास वसवतो, आणि त्यामध्ये राहण्यासाठी नगर बांधतो.
Þangað leiðir hann hungraða sem setjast þar að og byggja sér borgir,
37 ३७ ते नगरे बांधतात त्यामध्ये शेते पेरतात, द्राक्षमळे लावतात, आणि विपुल पिके काढतात.
sá í akra, gróðursetja víngarða og afla afurða.
38 ३८ तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची खूप वाढ होते, तो त्यांच्या गुरांना कमी होऊ देत नाही.
Þannig blessar hann! Og þeir margfaldast stórum og fénaði þeirra fjölgar.
39 ३९ नंतर यातनामयी अरिष्ट आणि दुःख यांमुळे ते कमी होतात आणि नष्ट होतात.
Sumir missa allt í ofsókn, þjáningu og sorg,
40 ४० तो शत्रूंच्या अधिपतीवर अपमान ओततो, आणि त्यांना रस्ते नसलेल्या रानातून भटकायला लावतो.
því að Guð sendir hrokafullum skömm og lætur tignarmenn ráfa um í rústum,
41 ४१ पण तो गरजवंताना क्लेशापासून सुरक्षित ठेवतो, आणि त्यांच्या कुटुंबांची कळपासारखी काळजी घेतो.
en hann bjargar fátæklingum sem honum treysta, gefur þeim fjölda afkomenda og mikla hagsæld.
42 ४२ सरळ मनाचे हे पाहतात आणि आनंदी होतात, आणि सर्व दुष्ट आपले तोंड बंद करतात.
Þetta sjá hinir guðhræddu og þeir gleðjast, meðan óguðlegir þegja í skömm.
43 ४३ जो कोणी ज्ञानी आहे त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि परमेश्वराच्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृतीवर मनन करावे.
Þú sem ert vitur, hugleiddu þetta! Hugsaðu um miskunn og kærleika Drottins.