< स्तोत्रसंहिता 106 >
1 १ परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्यास धन्यवाद द्या. कारण त्याची कराराची विश्वसनीयता सर्वकाळ टिकून राहते.
主をほめたたえよ。主に感謝せよ、主は恵みふかく、そのいつくしみはとこしえに絶えることがない。
2 २ परमेश्वराच्या पराक्रमाची कृत्ये कोण कथन करू शकेल? किंवा त्याची सर्व स्तुत्य कृत्ये कोण पूर्ण जाहीर करील?
だれが主の大能のみわざを語り、その誉をことごとく言いあらわすことができようか。
3 ३ जे काही योग्य आहे ते करतात आणि ज्याची कृत्ये न्याय्य आहेत ते आशीर्वादित आहेत.
公正を守る人々、常に正義を行う人はさいわいである。
4 ४ हे परमेश्वरा, तू जेव्हा आपल्या लोकांवर कृपा दाखवतोस तेव्हा माझी आठवण कर; तू त्यांना जेव्हा तारशील मला मदत कर.
主よ、あなたがその民を恵まれるとき、わたしを覚えてください。あなたが彼らを救われるとき、わたしを助けてください。
5 ५ मग मी तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष पाहिन, परमेश्वरा, तुझ्या राष्ट्रांच्या आनंदाने मी हर्ष करीन, आणि तुझ्या वतनाबरोबर उत्सव करीन.
そうすれば、わたしはあなたの選ばれた者の繁栄を見、あなたの国民の喜びをよろこび、あなたの嗣業と共に誇ることができるでしょう。
6 ६ आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले; आम्ही चूक केली आणि आम्ही दुष्कृत्ये केली.
われらは先祖たちと同じく罪を犯した。われらは不義をなし、悪しきことを行った。
7 ७ आमच्या वडिलांनी मिसर देशात तुझ्या आश्चर्यकारक कृत्याचे महत्व ओळखले नाही; त्यांनी तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले; तर समुद्राजवळ, लाल समुद्राजवळ त्यांनी बंडखोरी केली.
われらの先祖たちはエジプトにいたとき、あなたのくすしきみわざに心を留めず、あなたのいつくしみの豊かなのを思わず、紅海で、いと高き神にそむいた。
8 ८ तरीसुद्धा, आपल्या नावाकरिता त्याने त्यांचे तारण केले, यासाठी की, त्याने आपले सामर्थ्य उघड करावे.
けれども主はその大能を知らせようと、み名のために彼らを救われた。
9 ९ त्याने लाल समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला. मग त्याने त्यांना मैदानातून चालावे तसे खोल पाण्याच्या जागेतून नेले.
主は紅海をしかって、それをかわかし、彼らを導いて荒野を行くように、淵を通らせられた。
10 १० त्यांचा द्वेष करणाऱ्याच्या हातातून त्याने त्यास वाचवले, आणि त्यांना त्यांच्या शत्रूंच्या शक्तीपासून सोडवले.
こうして主は彼らをあだの手から救い、敵の力からあがなわれた。
11 ११ परंतु त्यांच्या शत्रूंना पाण्याने झाकून टाकले. त्यापैकी एकही जण वाचला नाही.
水が彼らのあだをおおったので、そのうち、ひとりも生き残った者はなかった。
12 १२ नंतर त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्याची स्तुती गाइली.
このとき彼らはそのみ言葉を信じ、その誉を歌った。
13 १३ परंतु ते लवकरच त्याने जे केले ते विसरले; त्यांनी त्याच्या सूचनेची वाट पाहिली नाही.
しかし彼らはまもなくそのみわざを忘れ、その勧めを待たず、
14 १४ रानात त्यांची अतृप्त हाव अनावर झाली, आणि त्यांनी देवाला आव्हान दिले.
野でわがままな欲望を起し、荒野で神を試みた。
15 १५ त्याने त्यांना त्यांच्या विनंतीप्रमाणे दिले, पण त्याने रोग पाठवला तो त्यांचे शरीर नष्ट करू लागला.
主は彼らにその求めるものを与えられたが、彼らのうちに病気を送って、やせ衰えさせられた。
16 १६ त्यांनी छावणीत मोशे आणि परमेश्वराचा पवित्र याजक अहरोन यास चिडीस आणले.
人々が宿営のうちでモーセをねたみ、主の聖者アロンをねたんだとき、
17 १७ जमीन दुभंगली आणि तिने दाथानाला गिळून टाकले, आणि अबीरामाच्या अनुयांना झाकून टाकले.
地が開けてダタンを飲み、アビラムの仲間をおおった。
18 १८ त्यांच्यात अग्नीने पेट घेतला; अग्नीने त्या दुष्टांना खाऊन टाकले.
火はまたこの仲間のうちに燃え起り、炎は悪しき者を焼きつくした。
19 १९ त्यांनी होरेबात सोन्याचे वासरू केले. आणि त्यांनी त्या ओतीव मूर्तीची पूजा केली.
彼らはホレブで子牛を造り、鋳物の像を拝んだ。
20 २० त्यांनी गवत खाणाऱ्या बैलाच्या मूर्तीसाठी आपल्या वैभवी देवाची अदलाबदल केली.
彼らは神の栄光を草を食う牛の像と取り替えた。
21 २१ ते आपल्या तारणाऱ्या देवाला विसरले, ज्याने मिसरात महान कृत्ये केली होती.
22 २२ त्याने हामाच्या देशात आश्चर्यकारक गोष्टी केल्या आणि लाल समुद्राजवळ पराक्रमी कृत्ये केली.
彼らは、エジプトで大いなる事をなし、ハムの地でくすしきみわざをなし、紅海のほとりで恐るべき事をなされた救主なる神を忘れた。
23 २३ म्हणून तो म्हणाला, आपण त्यांचा नाश करू. जर त्याचा निवडलेला मोशे त्यास क्रोध त्यांचा नाश करण्यापासून मागे फिरायला, त्याच्यापुढे खिंडारात उभा राहिला नसता तर त्याने तसे केले असते.
それゆえ、主は彼らを滅ぼそうと言われた。しかし主のお選びになったモーセは破れ口で主のみ前に立ち、み怒りを引きかえして、滅びを免れさせた。
24 २४ नंतर त्यानीं फलदायी देश तुच्छ मानला; त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला नाही,
彼らは麗しい地を侮り、主の約束を信ぜず、
25 २५ पण आपल्या तंबूत त्यांनी कुरकुर केली, आणि परमेश्वराचा शब्द मानिला नाही.
またその天幕でつぶやき、主のみ声に聞き従わなかった。
26 २६ म्हणून त्याने त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, मी त्यांना रानात मरू देईन.
それゆえ、主はみ手をあげて、彼らに誓い、彼らを荒野で倒れさせ、
27 २७ त्यांचे वंशज राष्ट्रामध्ये विखरीन, आणि त्यांना परक्या राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.
またその子孫を、もろもろの国民のうちに追い散らし、もろもろの地に彼らをまき散らそうとされた。
28 २८ त्यांनी बआल-पौराची पूजा केली, आणि मरण पावलेल्यांना अर्पण केलेले बली त्यांनी खाल्ले.
また彼らはペオルのバアルを慕って、死んだ者にささげた、いけにえを食べた。
29 २९ त्यांनी त्यांच्या कृतीने त्यास कोपविले, आणि त्यांच्यात मरी पसरली.
彼らはそのおこないをもって主を怒らせたので、彼らのうちに疫病が起った。
30 ३० पण फिनहास मध्यस्थी उठला; आणि मरी बंद झाली.
その時ピネハスが立って仲裁にはいったので、疫病はやんだ。
31 ३१ हे त्यास नितीमत्व असे सर्व पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले.
これによってピネハスはよろず代まで、とこしえに義とされた。
32 ३२ त्यांनी मरीबा येथील जलाजवळही त्यास संताप आणला, आणि त्यांमुळे मोशेला दुःख सोसावे लागले.
彼らはまたメリバの水のほとりで主を怒らせたので、モーセは彼らのために災にあった。
33 ३३ त्यांनी त्याच्यात कडवटपणा आणला, आणि तो अविचाराने बोलला.
これは彼らが神の霊にそむいたとき、彼がそのくちびるで軽率なことを言ったからである。
34 ३४ परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रांचा नाश केला नाही.
彼らは主が命じられたもろもろの民を滅ぼさず、
35 ३५ पण ते अन्यजाती लोकांच्या राष्ट्रात मिसळले, व त्यांचे मार्ग शिकले.
かえってもろもろの国民とまじってそのわざにならい、
36 ३६ आणि त्यांच्या मूर्तींची पूजा केली, ते त्यांच्यासाठी सापळा बनले.
自分たちのわなとなった偶像に仕えた。
37 ३७ त्यांनी आपली मुले आणि मुली यांचा भुतांना यज्ञ केला.
彼らはそのむすこ、娘たちを悪霊にささげ、
38 ३८ त्यांनी निरपराध्यांचे रक्त पाडले, त्यांनी आपली मुले आणि मुली, ज्यांचा यज्ञ त्यांनी कनानाच्या मूर्तीस केला, त्यांचे रक्त पाडले आणि भूमी रक्ताने विटाळली गेली.
罪のない血、すなわちカナンの偶像にささげたそのむすこ、娘たちの血を流した。こうして国は血で汚された。
39 ३९ ते आपल्या कृत्यांनी अशुद्ध झाले, आणि आपल्या कृतींत अनाचारी बनले.
このように彼らはそのわざによっておのれを汚し、そのおこないによって姦淫をなした。
40 ४० त्यामुळे परमेश्वर त्याच्या लोकांवर रागावला, त्यास आपल्या स्वतःच्या वतनाचा वीट आला.
それゆえ、主の怒りがその民にむかって燃え、その嗣業を憎んで、
41 ४१ त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले, आणि ज्यांनी त्यांचा द्वेष केला त्यांनी त्यांच्यावर राज्य केले.
彼らをもろもろの国民の手にわたされた。彼らはおのれを憎む者に治められ、
42 ४२ त्यांच्या शत्रूंनी त्यांना पीडीले, आणि ते त्यांच्या अधिकाराखाली ते अधीन झाले.
その敵にしえたげられ、その力の下に征服された。
43 ४३ अनेक वेळा तो त्यांना मदत करण्यास आला, पण ते त्याच्याविरुध्द बंड करीत राहीले, आणि ते आपल्या पापाने नीच करण्यात आले.
主はしばしば彼らを助けられたが、彼らははかりごとを設けてそむき、その不義によって低くされた。
44 ४४ तथापि त्याने त्यांची मदतीसाठीची आरोळी ऐकली, तेव्हा त्याने त्यांच्या क्लेशाकडे लक्ष दिले.
それにもかかわらず、主は彼らの叫びを聞かれたとき、その悩みをかえりみ、
45 ४५ त्यांच्यासाठी त्याने आपल्या कराराची आठवण केली, आणि आपल्या अपार दयेने सौम्यता धारण केली.
その契約を彼らのために思い出し、そのいつくしみの豊かなるにより、みこころを変えられ、
46 ४६ त्याने त्यांचा पाडाव करणाऱ्या सर्वांच्या मनात त्यांच्यावर दया येईल असे केले.
彼らをとりこにした者どもによって、あわれまれるようにされた。
47 ४७ हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास तार. आम्हास राष्ट्रातून काढून एकत्र गोळा कर; म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करू.
われらの神、主よ、われらを救って、もろもろの国民のなかから集めてください。われらはあなたの聖なるみ名に感謝し、あなたの誉を誇るでしょう。
48 ४८ इस्राएलाचा देव, माझा परमेश्वर, ह्याचा अनादिकालापासून अनंतकालापर्यंत धन्यवाद होवो. सर्व लोकांनी म्हणावे, “आमेन.” परमेश्वराची स्तुती करा.
イスラエルの神、主はとこしえからとこしえまでほむべきかな。すべての民は「アァメン」ととなえよ。主をほめたたえよ。