< स्तोत्रसंहिता 105 >

1 परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या.
Adjatok hálát az Örökkévalónak, szólítsátok nevét, tudassátok a népek közt cselekményeit!
2 त्यास गाणे गा, त्याची स्तुतीगीते गा; त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला;
Énekeljetek neki, zengjetek neki, gondolkodjatok el mind az ő csodatettein!
3 त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे हृदय आनंदित होवो.
Dicsekedjetek szent nevével; örüljön szíve az Örökkévaló keresőinek!
4 परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध घ्या. त्याच्या सान्निध्याचा सतत शोध घ्या.
Keressétek föl az Örökkévalót és hatalmát, arczát keressétek mindig!
5 त्याने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी, त्याचे चमत्कार, आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.
Emlékezzetek csodatetteiről, melyeket mívelt, csodajeleiről és szája ítéleteiről.
6 तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशजहो, तुम्ही त्याचे निवडलेले याकोबाचे लोकहो,
Szolgájának Ábrahámnak magzatja ti, Jákób fiai, az ő kiválasztottjai!
7 तो परमेश्वर आपला देव आहे. त्याचे सर्व निर्णय पृथ्वीवर आहेत.
Ő az Örökkévaló, a mi Istenünk, az egész földön vannak ítéletei.
8 तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो.
Örökké megemlékezett szövetségéről, az igéről, melyet megparancsolt ezer nemzedékre,
9 त्याने हा करार अब्राहामाबरोबर केला. आणि त्याने इसहाकाशी शपथ वाहिली याची आठवण केली.
melyet kötött Ábrahámmal, és Izsáknak tett esküjéről;
10 १० ही त्याने याकोबासाठी नियम, आणि इस्राएलासाठी सर्वकाळासाठी करार असा कायम केला.
megállapította Jákóbnak törvényül, Izraélnek örök szövetségül;
11 ११ तो म्हणाला, “मी तुला कनान देश तुझा वतनभाग असा म्हणून देईन.”
mondván: neked adom Kanaán országát, birtoktok osztályául!
12 १२ हे तो त्यांना म्हणाला तेव्हा ते संख्येने केवळ थोडके होते, होय फार थोडे, आणि देशात परके होते.
Midőn csekély számúak voltak, csak kevesen és benne tartózkodók:
13 १३ ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, आणि एका राज्यातून दुसऱ्यात गेले.
akkor jártak nemzettől nemzethez, egyik királyságból más néphez.
14 १४ त्याने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्यासाठी त्याने राजाला शिक्षा दिली.
Nem engedte embernek, hogy zsarolja őket, s megfenyített miattuk királyokat:
15 १५ तो म्हणाला, माझ्या अभिषिक्ताला स्पर्श करू नका, आणि माझ्या संदेष्ट्यांची हानी करू नका.
ne nyúljatok fölkentjeimhez és prófétáimat ne bántsátok!
16 १६ त्याने त्या देशात दुष्काळ आणला. त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला.
Éhséget szólított az országra, eltörte a kenyér minden pálczáját.
17 १७ त्याने त्यांच्यापुढे एक मनुष्य पाठवला; योसेफ गुलाम म्हणून विकला गेला.
Küldött előttük egy férfiút, rabszolgául adatott el József.
18 १८ त्यांचे पाय बेड्यांनी बांधले होते; त्यास लोखंडी साखळ्या घातल्या होत्या.
Békóval sanyargatták lábát, vasba jutott a lelke,
19 १९ त्याचे भाकीत खरे होण्याच्या वेळेपर्यंत, परमेश्वराच्या वचनाने त्यास योग्य असे सिद्ध केले.
az időig, hogy bekövetkezett az igéje, az Örökkévaló szava megtisztította őt.
20 २० तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले; लोकांच्या अधिपतीने त्यांना सोडून दिले.
Küldött a király s feloldozta, népek uralkodója s kiszabadította.
21 २१ त्याने त्यास आपल्या घराचा मुख्य, आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेमले,
Úrrá tette háza fölött és uralkodóvá minden vagyonán,
22 २२ अशासाठी की, त्याने आपल्या अधिपतींना नियंत्रणात ठेवावे, आणि आपल्या वडिलांस ज्ञान शिकवावे.
hogy megköthesse nagyjait kedve szerint, és bölcscsé tegye véneit.
23 २३ नंतर इस्राएल मिसरात आले, आणि याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला.
És Egyiptomba jutott Izraél, s Jákób tartózkodott Chám földjén.
24 २४ देवाने आपले लोक फारच वाढवले, आणि त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना अधिक असंख्य केले.
S megszaporította népét nagyon és számosabbá tette szorongatóinál.
25 २५ आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा, आपल्या सेवकांशी निष्ठूरतेने वागावे म्हणून त्याने शत्रूचे मन वळवले.
Átváltoztatta szívöket, hogy meggyűlöljék népét, hogy fondorkodjanak szolgái ellen.
26 २६ त्याने आपला सेवक मोशे आणि आपण निवडलेला अहरोन यांना पाठविले.
Küldte Mózest, az ő szolgáját, Áront, akit kiválasztott;
27 २७ त्यांनी मिसरच्या देशात त्यांच्यामध्ये अनेक चिन्हे, हामाच्या देशात त्याचे आश्चर्ये करून दाखवली.
elvégezték köztük jeleinek dolgait meg csodákat Chám földjén.
28 २८ त्याने त्या देशात काळोख केला, पण त्या लोकांनी त्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही.
Küldött sötétséget és sötét lett, s nem engedetlenkedtek igéje iránt.
29 २९ त्याने त्यांचे पाणी पालटून रक्त केले आणि त्यांचे मासे मरण पावले.
Átváltoztatta vizeiket vérré s megölte halukat.
30 ३० त्यांचा देश बेडकांनी भरून गेला, त्यांच्या अधिपतींच्या खोलीत देखील बेडूक होते.
Hemzsegett országuk békáktól, királyaik szobáiban.
31 ३१ तो बोलला, आणि गोमाशा व उवा त्यांच्या सर्व प्रदेशात झाल्या.
Szólt és jött gyülevész vad, férgek egész határukba.
32 ३२ त्याने त्यांच्या देशात विजा आणि मेघांचा गडगडाटाने गारांचा वर्षाव व पाऊस पाठवला.
Jégesőt adott nekik esőjük gyanánt, lobogó tüzet országukban;
33 ३३ त्याने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे यांचा नाश केला. त्याने त्यांच्या देशातले झाडे मोडून टाकली.
elverte szőlőjüket és fügefájukat és összetörte határuk fáit.
34 ३४ तो बोलला आणि टोळ आले. असंख्य नाकतोडे आले.
Szólt és jött sáska, nyaló sáska szám nélkül,
35 ३५ टोळांनी त्यांच्या देशातली सर्व हिरवळ, त्यांच्या भूमीचे सर्व पिके खाल्ले;
s megemésztett minden füvet országukban, s megemésztette földjük gyümölcsét.
36 ३६ त्याने त्यांच्या देशातले प्रत्येक प्रथम जन्मलेले, त्यांच्या सामर्थ्याचे सर्व प्रथमफळ ठार मारले.
Megölt minden elsőszülöttet országukban, zsengéjét minden tehetségöknek.
37 ३७ त्याने इस्राएलांना सोने आणि रुपे घेऊन बाहेर आणले; त्यांच्या मार्गात कोणताही वंश अडखळला नाही.
Erre kivonultatta őket ezüsttel és aranynyal, és törzsei közt nem volt gyöngélkedő.
38 ३८ ते निघून गेल्याने मिसराला आनंद झाला, कारण मिसऱ्यांना त्यांची भिती वाटत होती.
Örült Egyiptom kivonultukon, mert rájuk esett rettegésük.
39 ३९ त्याने आच्छादनासाठी ढग पसरला, आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्नी दिला.
Kiterített felhőt takarónak, meg tüzet, hogy világítson éjjel.
40 ४० इस्राएलांनी अन्नाची मागणी केली आणि त्याने लावे पक्षी आणले, आणि त्यांना स्वर्गातून भाकर देऊन तृप्त केले.
Kértek s hozott fürjet és égnek kenyérevel jóllakatta őket.
41 ४१ त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले; ते नदीप्रमाणे वाळवटांत वाहू लागले.
Sziklát nyitott és vizek folytak, jártak a sivatagban folyamként.
42 ४२ कारण त्यास आपल्या पवित्र वचनाची, आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती.
Mert megemlékezett szent igéjéről Ábrahámhoz, az ő szolgájához.
43 ४३ त्याने आपल्या लोकांस आनंद करीत, त्याच्या निवडलेल्यांना विजयोत्सव करीत बाहेर आणले.
És kivezette népét vígságban, ujjongásban kiválasztottjait;
44 ४४ त्याने त्यांना राष्ट्रांचे देश दिले; त्यांनी लोकांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या.
adta nekik nemzetek országait, hogy elfoglalják népek fáradalmát:
45 ४५ ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम आणि आपले नियमशास्त्र पाळावे. परमेश्वराची स्तुती करा.
avégett, hogy megőrizzék törvényeit és megtartsák a tanait. Hallelúja!

< स्तोत्रसंहिता 105 >