< स्तोत्रसंहिता 105 >
1 १ परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या.
Gloru la Eternulon, voku Lian nomon; Sciigu inter la popoloj Liajn farojn.
2 २ त्यास गाणे गा, त्याची स्तुतीगीते गा; त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला;
Kantu al Li, muziku al Li; Parolu pri ĉiuj Liaj mirakloj.
3 ३ त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे हृदय आनंदित होवो.
Laŭdu Lian sanktan nomon; Ĝoju la koro de tiuj, kiuj serĉas la Eternulon.
4 ४ परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध घ्या. त्याच्या सान्निध्याचा सतत शोध घ्या.
Turnu vin al la Eternulo kaj al Lia potenco; Serĉu ĉiam Lian vizaĝon.
5 ५ त्याने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी, त्याचे चमत्कार, आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.
Memoru Liajn miraklojn, kiujn Li faris, Liajn signomiraklojn kaj la juĝojn de Lia buŝo;
6 ६ तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशजहो, तुम्ही त्याचे निवडलेले याकोबाचे लोकहो,
Vi, semo de Abraham, Lia sklavo, Filoj de Jakob, Liaj elektitoj.
7 ७ तो परमेश्वर आपला देव आहे. त्याचे सर्व निर्णय पृथ्वीवर आहेत.
Li estas la Eternulo, nia Dio; Sur la tuta tero estas Liaj juĝoj.
8 ८ तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्वकाळ आठवतो.
Li memoras eterne Sian interligon, La vorton, kiun Li testamentis por mil generacioj,
9 ९ त्याने हा करार अब्राहामाबरोबर केला. आणि त्याने इसहाकाशी शपथ वाहिली याची आठवण केली.
Kiun Li interkonsentis kun Abraham Kaj ĵuris al Isaak.
10 १० ही त्याने याकोबासाठी नियम, आणि इस्राएलासाठी सर्वकाळासाठी करार असा कायम केला.
Li metis ĝin por Jakob kiel leĝon, Por Izrael kiel eternan interligon,
11 ११ तो म्हणाला, “मी तुला कनान देश तुझा वतनभाग असा म्हणून देईन.”
Dirante: Al vi Mi donos la landon Kanaanan Kiel vian parton heredan.
12 १२ हे तो त्यांना म्हणाला तेव्हा ते संख्येने केवळ थोडके होते, होय फार थोडे, आणि देशात परके होते.
Kiam ili estis malgrandnombraj, Malmultaj, kaj fremduloj en ĝi,
13 १३ ते एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात, आणि एका राज्यातून दुसऱ्यात गेले.
Kaj ili iradis de popolo al popolo, El unu regno al alia gento,
14 १४ त्याने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्यासाठी त्याने राजाला शिक्षा दिली.
Tiam Li al neniu permesis premi ilin, Kaj Li punis pro ili reĝojn, dirante:
15 १५ तो म्हणाला, माझ्या अभिषिक्ताला स्पर्श करू नका, आणि माझ्या संदेष्ट्यांची हानी करू नका.
Ne tuŝu Miajn sanktoleitojn, Kaj al Miaj profetoj ne faru malbonon.
16 १६ त्याने त्या देशात दुष्काळ आणला. त्याने त्यांचा भाकरीचा पुरवठा तोडून टाकला.
Kaj Li sendis malsaton en la landon, Rompis ĉion, kio portis panon.
17 १७ त्याने त्यांच्यापुढे एक मनुष्य पाठवला; योसेफ गुलाम म्हणून विकला गेला.
Li sendis antaŭ ili homon: Jozef estis vendita kiel sklavo.
18 १८ त्यांचे पाय बेड्यांनी बांधले होते; त्यास लोखंडी साखळ्या घातल्या होत्या.
Oni enpremis liajn piedojn en katenojn, Fero ŝarĝis lian korpon,
19 १९ त्याचे भाकीत खरे होण्याच्या वेळेपर्यंत, परमेश्वराच्या वचनाने त्यास योग्य असे सिद्ध केले.
Ĝis la tempo, kiam venis Lia vorto; La parolo de la Eternulo lin elprovis.
20 २० तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले; लोकांच्या अधिपतीने त्यांना सोडून दिले.
Reĝo sendis kaj malligis lin, Reganto super popoloj liberigis lin;
21 २१ त्याने त्यास आपल्या घराचा मुख्य, आपल्या सर्व मालमत्तेवर अधिकारी नेमले,
Li faris lin sinjoro super lia domo Kaj reganto super lia tuta havo,
22 २२ अशासाठी की, त्याने आपल्या अधिपतींना नियंत्रणात ठेवावे, आणि आपल्या वडिलांस ज्ञान शिकवावे.
Ke li submetu al si liajn eminentulojn Kaj saĝigu liajn maljunulojn.
23 २३ नंतर इस्राएल मिसरात आले, आणि याकोब हामाच्या देशात उपरी म्हणून राहिला.
Kaj Izrael venis en Egiptujon, Kaj Jakob enmigris en la landon de Ĥam.
24 २४ देवाने आपले लोक फारच वाढवले, आणि त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना अधिक असंख्य केले.
Kaj Li tre kreskigis Sian popolon, Kaj faris ĝin pli forta ol ĝiaj malamikoj.
25 २५ आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा, आपल्या सेवकांशी निष्ठूरतेने वागावे म्हणून त्याने शत्रूचे मन वळवले.
Li malĝustigis ilian koron, Ke ili ekmalamis Lian popolon, ekruzis kontraŭ Liaj sklavoj.
26 २६ त्याने आपला सेवक मोशे आणि आपण निवडलेला अहरोन यांना पाठविले.
Li sendis Moseon, Sian sklavon, Kaj Aaronon, kiun Li elektis.
27 २७ त्यांनी मिसरच्या देशात त्यांच्यामध्ये अनेक चिन्हे, हामाच्या देशात त्याचे आश्चर्ये करून दाखवली.
Ili faris inter ili Liajn pruvosignojn Kaj miraklojn en la lando de Ĥam.
28 २८ त्याने त्या देशात काळोख केला, पण त्या लोकांनी त्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नाही.
Li sendis mallumon kaj mallumigis; Kaj ili ne atentis Liajn vortojn.
29 २९ त्याने त्यांचे पाणी पालटून रक्त केले आणि त्यांचे मासे मरण पावले.
Li ŝanĝis ilian akvon en sangon, Kaj senvivigis iliajn fiŝojn.
30 ३० त्यांचा देश बेडकांनी भरून गेला, त्यांच्या अधिपतींच्या खोलीत देखील बेडूक होते.
Ilia tero eksvarmigis ranojn, En la ĉambroj de iliaj reĝoj.
31 ३१ तो बोलला, आणि गोमाशा व उवा त्यांच्या सर्व प्रदेशात झाल्या.
Li diris, kaj venis fiinsektoj, Pedikoj en ĉiuj iliaj regionoj.
32 ३२ त्याने त्यांच्या देशात विजा आणि मेघांचा गडगडाटाने गारांचा वर्षाव व पाऊस पाठवला.
Antataŭ pluvo Li donis al ili hajlon, Flamantan fajron en ilia lando.
33 ३३ त्याने त्यांच्या द्राक्षांच्या वेली व अंजीराची झाडे यांचा नाश केला. त्याने त्यांच्या देशातले झाडे मोडून टाकली.
Li batis iliajn vinbertrunkojn kaj iliajn figarbojn, Kaj rompis la arbojn en iliaj limoj.
34 ३४ तो बोलला आणि टोळ आले. असंख्य नाकतोडे आले.
Li diris, kaj venis akridoj kaj skaraboj sennombraj
35 ३५ टोळांनी त्यांच्या देशातली सर्व हिरवळ, त्यांच्या भूमीचे सर्व पिके खाल्ले;
Kaj formanĝis la tutan herbon en ilia lando Kaj formanĝis la produktojn de ilia tero.
36 ३६ त्याने त्यांच्या देशातले प्रत्येक प्रथम जन्मलेले, त्यांच्या सामर्थ्याचे सर्व प्रथमफळ ठार मारले.
Kaj Li mortigis ĉiujn unuenaskitojn en ilia lando, La komencaĵojn de ĉiuj iliaj fortoj.
37 ३७ त्याने इस्राएलांना सोने आणि रुपे घेऊन बाहेर आणले; त्यांच्या मार्गात कोणताही वंश अडखळला नाही.
Sed ilin Li elkondukis kun arĝento kaj oro, Kaj en iliaj triboj estis neniu kadukulo.
38 ३८ ते निघून गेल्याने मिसराला आनंद झाला, कारण मिसऱ्यांना त्यांची भिती वाटत होती.
Ĝojis Egiptujo, kiam ili eliris, Ĉar atakis ĝin timo antaŭ ili.
39 ३९ त्याने आच्छादनासाठी ढग पसरला, आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्नी दिला.
Li etendis nubon, kiel kovron; Kaj fajron, por ke ĝi lumu en la nokto.
40 ४० इस्राएलांनी अन्नाची मागणी केली आणि त्याने लावे पक्षी आणले, आणि त्यांना स्वर्गातून भाकर देऊन तृप्त केले.
Ili petis, kaj Li sendis koturnojn, Kaj per pano ĉiela Li ilin satigis.
41 ४१ त्याने खडक दुभागला आणि त्यातून पाणी उसळून बाहेर आले; ते नदीप्रमाणे वाळवटांत वाहू लागले.
Li malfermis rokon, Kaj ekfluis akvo kaj ekiris kiel rivero en la dezerto.
42 ४२ कारण त्यास आपल्या पवित्र वचनाची, आपला सेवक अब्राहाम ह्याची आठवण होती.
Ĉar Li memoris Sian sanktan vorton Al Abraham, Sia sklavo.
43 ४३ त्याने आपल्या लोकांस आनंद करीत, त्याच्या निवडलेल्यांना विजयोत्सव करीत बाहेर आणले.
Kaj Li elkondukis Sian popolon en ĝojo, Siajn elektitojn kun kantado.
44 ४४ त्याने त्यांना राष्ट्रांचे देश दिले; त्यांनी लोकांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या.
Kaj Li donis al ili la landojn de popoloj, Kaj la laboron de gentoj ili heredis;
45 ४५ ह्यासाठी की, त्यांनी आपले नियम आणि आपले नियमशास्त्र पाळावे. परमेश्वराची स्तुती करा.
Por ke ili plenumu Liajn leĝojn Kaj konservu Liajn instruojn. Haleluja!