< स्तोत्रसंहिता 104 >
1 १ हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू अत्यंत थोर आहेस; तू तेजस्विता आणि गौरव पांघरले आहेस.
Błogosław, duszo moja! Panu. Panie, Boże mój! wielceś jest wielmożnym; chwałę i ozdobę przyoblokłeś.
2 २ जसे वस्राने तसे तू आपणाला प्रकाशाने झाकतोस; तंबूच्या पडद्याप्रमाणे तू आकाश पसरतोस.
Przyodziałeś się światłością jako szatą; rozciągnąłeś niebiosa jako oponę.
3 ३ तू आपल्या खोल्यांच्या तुळ्या जलांमध्ये ठेवतो; तू मेघांना आपले रथ करतोस; तू वाऱ्यांच्या पंखावर चालतोस.
Któryś zasklepił na wodach pałace swoje; który używasz obłoków miasto wozów; który chodzisz na skrzydłach wiatrowych;
4 ४ तू वाऱ्याला आपले दूत करतोस, अग्नीच्या ज्वालांस आपले सेवक करतोस
Który czynisz duchy posłami swymi; ty czynisz sługi swe ogniem pałającym.
5 ५ त्याने पृथ्वीचा पाया घातला आहे, आणि ती कधीही हलणार नाही.
Ugruntowałeś ziemię na słupach jej, tak, że się nie poruszy na wieki wieczne.
6 ६ तू पृथ्वीला वस्राप्रमाणे पाण्याने आच्छादिले आहेस; पाण्याने पर्वत झाकले आहेत.
Przepaścią jako szatą przyodziałeś ją był, tak, że wody stały nad górami.
7 ७ तुझ्या धमकीने पाणी मागे सरले आहे; तुझ्या गर्जनेच्या आवाजाने ती पळाली.
Na zgromienie twojerozbiegły się, a na głos pogromu twego prędko zuciekały.
8 ८ ती पर्वतावरून जाऊन खाली दरितून वाहात गेली, त्यांच्यासाठी नेमलेल्या जागी ती जाऊन राहिली.
Wstąpiły góry, zniżyły się doliny na miejsce, któreś im założył.
9 ९ तू त्यांना घालून दिलेल्या मर्यादा त्यांना ओलांडता येत नाही; ते पृथ्वीला पुन्हा झाकून टाकणार नाहीत.
Zamierzyłeś im kres, aby go nie przestępowały, ani się wracały na okrycie ziemi.
10 १० तो दऱ्यातून झरे वाहवितो; डोंगरामधून प्रवाह वाहत जातात.
Który wypuszczasz źródła po dolinach, aby płynęły między górami,
11 ११ ते रानातल्या सर्व पशूंना पाणी पुरवितात; रानगाढवे आपली तहान भागवितात.
A napój dawały wszystkiemu zwierzowi polnemu; a z nich gaszą leśne osły pragnienie swoje.
12 १२ नदीकिनारी पक्षी आपले घरटे बांधतात; ते फांद्यामध्ये बसून गातात.
Przy nich mieszka ptastwo niebieskie, a z pośród gałązek głos wydaje.
13 १३ तो आपल्या वरच्या खोल्यातून पर्वतावर पाण्याचा वर्षाव करतो. पृथ्वी त्याच्या श्रमाच्या फळाने भरली आहे.
Który pokrapiasz góry z pałaców swoich, aby się z owoców spraw twoich nasycała ziemia.
14 १४ तो गुरांढोरासाठी गवत उगवतो, आणि मनुष्यांसाठी वनस्पतीची लागवड करतो; यासाठी की, मनुष्याने जमिनितून अन्न उत्पन्न करावे.
Za twoją sprawą rośnie trawa dla bydła, a zioła na pożytek człowieczy; ty wywodzisz chleb z ziemi:
15 १५ तो मनुष्यास आनंदित करणारा द्राक्षरस, त्याचा चेहरा चमकविणारे तेल, आणि त्याचे जीवन जिवंत ठेवणारे अन्नही त्याने उत्पन्न करावी.
I wino, które uwesela serce człowiecze, od którego się lśni twarz jako od oleju; i chleb, który zatrzymuje żywot ludzki.
16 १६ परमेश्वराचे वृक्ष, जे लबानोनाचे गंधसरू त्याने लावले आहेत, ते रसभरित आहेत;
Nasycone bywają i drzewa Pańskie, i cedry Libanu, których nasadził;
17 १७ तेथे पक्षी आपली घरटी बांधतात. करकोचा देवदारूचे झाड तिचे घर करतो.
Na których ptaki gniazda swe mają, i bocian na jedlinach ma dom swój.
18 १८ रानबकऱ्या उंच पर्वतावर राहतात; खडक सशांचे आश्रयस्थान आहे.
Góry wysokie dzikim kozom, a skały są ucieczką królikom.
19 १९ त्याने ऋतुमान समजण्यासाठी चंद्र नेमला आहे; सूर्याला त्याची मावळण्याची वेळ कळते.
Uczynił miesiąc dla pewnych czasów, a słońce zna zachód swój.
20 २० तू रात्रीला काळोख करतोस, तेव्हा जंगलातील सर्व जनावरे बाहेर येतात.
Przywodzisz ciemność, i bywa noc, w którą wychodzą wszystkie zwierzęta leśne.
21 २१ तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करतात, आणि देवाकडे आपले अन्न मागतात.
Lwięta ryczą do łupu, i szukają od Boga pokarmu swego.
22 २२ जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हा ते परत जातात, आणि आपल्या गुहेत झोपतात.
Lecz gdy słońce wznijdzie, zaś się zgromadzają, i w jamach swoich kładą się.
23 २३ दरम्यान लोक आपल्या कामासाठी बाहेर जातात, आणि ते संध्याकाळपर्यंत कष्ट करतात.
Tedy wychodzi człowiek do roboty swojej, i do pracy swojej aż do wieczora.
24 २४ हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती अधिक आणि किती विविध प्रकारची आहेत! ती सर्व तुझ्या ज्ञानाने केली आहेत; पृथ्वी तुझ्या समृद्धीने भरली आहे.
O jakoż wielkie są sprawy twoje, Panie! te wszystkie mądrześ uczynił, a napełniona jest ziemia bogactwem twojem.
25 २५ त्यावर हा समुद्र, खोल आणि अफाट आहे, त्यामध्ये लहान व मोठे असंख्य प्राणी गजबजले आहेत.
W morzu zaś wielkiem i bardzo szerokiem, tam są płazy, którym nie masz liczby, i zwierzęta małe i wielkie.
26 २६ तेथे त्यामध्ये जहाजे प्रवास करतात आणि त्यामध्ये खेळण्यासाठी जो लिव्याथान तू निर्माण केला तोही तेथे आहे.
Po niem okręty przechodzą, i wieloryb, któregoś ty stworzył, aby w niem igrał.
27 २७ योग्य वेळी तू त्यांना त्यांचे अन्न द्यावे म्हणून ते सर्व तुझ्याकडे पाहतात.
Wszystko to na cię oczekuje, abyś im dał pokarm czasu swego.
28 २८ जेव्हा तू त्यांना देतोस, ते जमा करतात; जेव्हा तू आपला हात उघडतोस तेव्हा त्यांची उत्तम पदार्थांनी तृप्ती होते.
Gdy im dajesz, zbierają; gdy otwierasz rękę twoję, nasycone bywają dobremi rzeczami.
29 २९ जेव्हा तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकुळ होतात; जर तू त्यांचा श्वास काढून घेतला, तर ते मरतात आणि परत मातीस मिळतात.
Lecz gdy ukrywasz oblicze twoje, trwożą sobą; gdy odbierasz ducha ich, giną, i w proch się swój obracają.
30 ३० जेव्हा तू आपला आत्मा पाठवतोस, तेव्हा ते उत्पन्न होतात, आणि तू भूप्रदेश पुन्हा नवीन करतोस.
Gdy wysyłasz ducha twego, stworzone bywają, i odnawiasz oblicze ziemi.
31 ३१ परमेश्वराचे वैभव सर्वकाळ राहो; परमेश्वरास आपल्या निर्मितीत आनंद होवो.
Niechajże będzie chwała Pańska na wieki; niech się rozweseli Pan w sprawach swoich.
32 ३२ तो पृथ्वीवर खाली बघतो आणि ती थरथर कापते; तो पर्वताला स्पर्श करतो आणि ते धुमसतात.
On gdy wejrzy na ziemię, zadrży; dotknie się gór, a zakurzą się.
33 ३३ मी माझ्या आयुष्यभर परमेश्वरास गाणे गाईन. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे मी गुणगान करीन.
Będę śpiewał Panu za żywota mego; będę śpiewał Bogu memu, póki mię staje.
34 ३४ माझे विचार त्यास गोड वाटो; परमेश्वराजवळ मला आनंद होईल.
O nim będzie wdzięczna mowa moja, a ja się rozweselę w Panu.
35 ३५ पृथ्वीवरून पापी नष्ट होवोत, आणि दुष्ट आणखी न उरोत. हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराची स्तुती करा.
Oby byli wytraceni grzesznicy z ziemi, a niezbożnych aby już nie było! Błogosław, duszo moja! Panu. Halleluja.