< स्तोत्रसंहिता 103 >

1 दाविदाचे स्तोत्र. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.
Un salmo de David. Alaba, alma mía, al Señor; que todo mi ser alabe su santo nombre.
2 हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.
Alaba, alma mía, al Señor; y que no olvide mi ser las maravillosas cosas que él ha hecho por mí.
3 तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो; तो तुझे सर्व आजार बरे करतो.
Él perdona mis pecados, y cura todas mis enfermedades.
4 तो तुझे आयुष्य नाशापासून खंडून घेतो; तो तुला आपल्या विश्वासाच्या कराराने आणि करुणेच्या कृतीने मुकुट घालतो.
Me salva de la muerte; me honra con su gran amor y misericordia.
5 तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे पुन्हा नवे होते.
Llena mi vida con todo lo que es bueno; me rejuvenece, y me hace fuerte como un águila.
6 जे सर्व अन्यायाने पीडलेले आहेत; त्यांच्यासाठी परमेश्वर नितीचे आणि न्यायाची कृत्ये करतो.
El Señor hace lo que está bien, y defiende a los que son abusados.
7 त्याने मोशेला आपले मार्ग, इस्राएल वंशजांना आपल्या कृत्यांची ओळख करून दिली.
Él explicó sus caminos a moisés: le dijo al pueblo de Israel lo que iba a hacer.
8 परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे; तो सहनशील आहे; त्याच्यामध्ये महान कराराची विश्वासयोग्यता आहे.
El Señor es amable y lleno de gracia, y no rápido para la ira. Lleno de amor y justicia.
9 तो नेहमीच शिक्षा करणार नाही; तो नेहमीच रागावणार नाही.
Él no nos acusa; ni permanece para siempre airado con nosotros.
10 १० तो आम्हाशी आमच्या पापास अनुरूप असे वागला नाही किंवा आमच्या पापाला साजेसे प्रतिफळ दिले नाही.
No nos castiga por nuestros pecados, como debería hacer; no nos devuelve todas las cosas malas que hacemos, aunque lo merezcamos.
11 ११ कारण जसे पृथ्वीच्या वरती आकाश आहे, तसे त्याचे जे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया आहे.
Porque tan grande como los cielos que están sobre la tierra es su amor con los que le honran.
12 १२ जसे पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे, तसे त्याने आमच्या पापाचे दोष आम्हापासून काढून टाकले आहेत.
Tan lejos como el este está del oeste es como el Señor ha echado fuera nuestros pecados.
13 १३ जसा पिता आपल्या मुलांवर करुणा करतो, तसा परमेश्वर आपला सन्मान करतात त्यावर करुणा करतो.
Como un padre amoroso, el Señor es amable y compasivo con quienes le siguen.
14 १४ कारण आम्ही कसे अस्तित्वात आलो हे तो जाणतो, आम्ही धुळ आहोत हे त्यास माहित आहे.
Porque él sabe cómo fuimos hechos; él recuerda que somos solo polvo.
15 १५ मनुष्याच्या आयुष्याचे दिवस गवताप्रमाणे आहेत; शेतातील फुलासारखा तो फुलतो.
La vida de los seres humanos es como la grama: florecemos como plantas en un campo,
16 १६ वारा त्यावरून वाहून जातो आणि ते नाहीसे होते, आणि कोणीही सांगू शकत नाही की, ते एकदा कोठे वाढत होते.
pero entonces el viento sopla, y nos vamos, desapareciendo sin dejar rastro.
17 १७ परंतु परमेश्वराची करार विश्वसनियता त्याचा आदर करणाऱ्यावर अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत असते. त्याचा न्यायीपणाचा विस्तार त्यांच्या वंशजापर्यंत होतो.
Pero el gran amor de Dios durará para toda la eternidad con aquellos que le siguen; su bondad perdurará por todas las generaciones,
18 १८ जे त्याचा करार पाळतात आणि त्यांच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो.
con aquellos que cumplen sus convenios y sus mandamientos.
19 १९ परमेश्वराने आपले सिंहासन स्वर्गात स्थापले आहे, आणि त्याचे राज्य प्रत्येकावर सत्ता गाजवते.
El Señor ha establecido su trono en los cielos, y gobierna sobre todas las cosas.
20 २० अहो जे तुम्ही त्याचे दूत आहात, ज्या तुम्हास महान सामर्थ्य आहे आणि जे त्याचे शब्द ऐकून, त्याच्या आज्ञांचे आज्ञाधारकपणे पालन करता, ते तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
¡Alaben al Señor, ángeles, ustedes poderosos que hacen lo que él dice, escuchando lo que él les ordena!
21 २१ अहो परमेश्वराच्या, सर्व सैन्यांनो जे तुम्ही त्याचे सेवक आहात; ते तुम्ही त्याची इच्छा सिद्धीस नेता ते तुम्ही धन्यवादित आहात.
¡Alaben al Señor, ustedes ejércitos celestiales que le sirven y cumplen su voluntad!
22 २२ परमेश्वराच्या राज्यातील सर्व ठिकाणातील, त्याच्या सर्व प्राण्यांनो त्याचा धन्यवाद करा; हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर.
¡Alabe al Señor, toda cosa en su creación, todos bajo su gobierno! ¡Alaba, alma mía, al Señor!

< स्तोत्रसंहिता 103 >