< स्तोत्रसंहिता 103 >
1 १ दाविदाचे स्तोत्र. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.
Neni i kapina Ieowa o lol i mar a jaraui!
2 २ हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.
Neni i kapina Ieowa, o der monokela a kotin wiawia mau on uk!
3 ३ तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो; तो तुझे सर्व आजार बरे करतो.
Me kotin makeki on uk dip om karoj, ap kotin kamauiala om jomau kan.
4 ४ तो तुझे आयुष्य नाशापासून खंडून घेतो; तो तुला आपल्या विश्वासाच्या कराराने आणि करुणेच्या कृतीने मुकुट घालतो.
Me kotin dore uk ala jan ni waja apwal, me kotin ninie kin uk mak o kalanan.
5 ५ तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे पुन्हा नवे होते.
Me kotin kapai uk adar ni om malar, o kotin kapulpul uk ala dueta adler.
6 ६ जे सर्व अन्यायाने पीडलेले आहेत; त्यांच्यासाठी परमेश्वर नितीचे आणि न्यायाची कृत्ये करतो.
En Ieowa a wiawia me pun, o a kotin kapunala, me mi ni kalokolok japun.
7 ७ त्याने मोशेला आपले मार्ग, इस्राएल वंशजांना आपल्या कृत्यांची ओळख करून दिली.
A kotin kajale on Mojej al en a meakaroj, o on men Ijrail a wiawia kan.
8 ८ परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे; तो सहनशील आहे; त्याच्यामध्ये महान कराराची विश्वासयोग्यता आहे.
Ieowa me dir en kalanan o mak, a kin kotin kanonama, o a kalanan me lapalap.
9 ९ तो नेहमीच शिक्षा करणार नाही; तो नेहमीच रागावणार नाही.
A jota kin kotin kaloke aramaj anjau karoj, o pil jota onion kokolata.
10 १० तो आम्हाशी आमच्या पापास अनुरूप असे वागला नाही किंवा आमच्या पापाला साजेसे प्रतिफळ दिले नाही.
A jota kotin pwain on kitail duen dip atail, o jota depuk on kitail duen atail japun kan.
11 ११ कारण जसे पृथ्वीच्या वरती आकाश आहे, तसे त्याचे जे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया आहे.
A duen ileile en lan jan jappa, iduen a mak lapalap on ir, me kin majak i.
12 १२ जसे पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे, तसे त्याने आमच्या पापाचे दोष आम्हापासून काढून टाकले आहेत.
Duen maj en lan o kapin lan ara doo pajan, iduen a kotin kadooana wei jan kitail dip atail.
13 १३ जसा पिता आपल्या मुलांवर करुणा करतो, तसा परमेश्वर आपला सन्मान करतात त्यावर करुणा करतो.
Duen jam amen pokepoko na jeri, iduen Kot kotin kupukupura irail, me lan i.
14 १४ कारण आम्ही कसे अस्तित्वात आलो हे तो जाणतो, आम्ही धुळ आहोत हे त्यास माहित आहे.
Pwe a kotin mani, da me kitail wiaui kida, a kotin mani, me kitail me pwel par.
15 १५ मनुष्याच्या आयुष्याचे दिवस गवताप्रमाणे आहेत; शेतातील फुलासारखा तो फुलतो.
Aramaj amen kin rajon ra, a kin majal pajan dueta wan tuka nan jap o.
16 १६ वारा त्यावरून वाहून जातो आणि ते नाहीसे होते, आणि कोणीही सांगू शकत नाही की, ते एकदा कोठे वाढत होते.
Ma kijinian pan leler, a joer mia, o a jolar aja deu a.
17 १७ परंतु परमेश्वराची करार विश्वसनियता त्याचा आदर करणाऱ्यावर अनादिकालापासून अनंतकाळापर्यंत असते. त्याचा न्यायीपणाचा विस्तार त्यांच्या वंशजापर्यंत होतो.
A kalanan en Ieowa pan duedueta kokolata on ir, me lan i, o a melel on jeri en jeri kan,
18 १८ जे त्याचा करार पाळतात आणि त्यांच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो.
On ir, me kin kolekol a inau, o madamadaua duen a majan kan, pwen kapwaiada.
19 १९ परमेश्वराने आपले सिंहासन स्वर्गात स्थापले आहे, आणि त्याचे राज्य प्रत्येकावर सत्ता गाजवते.
Ieowa kotin kauada mol a nanlan, o a kotin kaunda meakan karoj.
20 २० अहो जे तुम्ही त्याचे दूत आहात, ज्या तुम्हास महान सामर्थ्य आहे आणि जे त्याचे शब्द ऐकून, त्याच्या आज्ञांचे आज्ञाधारकपणे पालन करता, ते तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
Kapikapina Ieowa, komail japwilim a tounlan kan, komail me lapalap akan ni manaman, me kin kapwaiada a majan kan, o peiki on moat en a majan!
21 २१ अहो परमेश्वराच्या, सर्व सैन्यांनो जे तुम्ही त्याचे सेवक आहात; ते तुम्ही त्याची इच्छा सिद्धीस नेता ते तुम्ही धन्यवादित आहात.
Kapikapina Ieowa japwilim a pokon akan karoj, o japwilim a ladu kan, me kin kapwaiada kupur a!
22 २२ परमेश्वराच्या राज्यातील सर्व ठिकाणातील, त्याच्या सर्व प्राण्यांनो त्याचा धन्यवाद करा; हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर.
Kapikapina Ieowa japwilim a dipijou kan ni waja karoj, me a kotin kakaun, nen i kapina Ieowa!