< स्तोत्रसंहिता 102 >
1 १ परमेश्वराजवळ प्रार्थना हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
Молитва нищаго, егда уныет и пред Господем пролиет моление свое. Господи, услыши молитву мою, и вопль мой к Тебе да приидет.
2 २ मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. जेव्हा मी तुला हाक मारतो, मला त्वरेने उत्तर दे.
Не отврати лица Твоего от мене: в оньже аще день скорблю, приклони ко мне ухо Твое: в оньже аще день призову Тя, скоро услыши мя.
3 ३ कारण माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे, आणि माझी हाडे अग्नीसारखी जळून गेली आहेत.
Яко изчезоша яко дым дние мои, и кости моя яко сушило сосхошася.
4 ४ माझे हृदय चिरडून गेले आहे आणि मी गवताप्रमाणे कोमेजून गेलो आहे. मी जेवण खाण्यास असमर्थ आहे.
Уязвлен бых яко трава, и изсше сердце мое, яко забых снести хлеб мой.
5 ५ माझ्या सततच्या कण्हण्यामुळे, मी फार क्षीण झालो आहे.
От гласа воздыхания моего прильпе кость моя плоти моей.
6 ६ मी अरण्यातल्या घुबडाप्रमाणे झालो आहे. मी ओसाड ठिकाणातल्या गरुडाप्रमाणे झालो आहे.
Уподобихся неясыти пустынней, бых яко нощный вран на нырищи.
7 ७ मी जागरण करीत आहे; धाब्यावर एकटे राहणाऱ्या एकाकी पक्ष्याप्रमाणे मी आहे.
Бдех и бых яко птица особящаяся на зде.
8 ८ माझे शत्रू सर्व दिवस मला टोमणे मारतात; ते माझी चेष्टा करतात माझे नाव वापरून शाप देतात.
Весь день поношаху ми врази мои, и хвалящии мя мною кленяхуся.
9 ९ मी राख भाकरीप्रमाणे खाल्ली आहे, आणि माझ्या पाण्यात माझे अश्रू मिसळले आहेत.
Зане пепел яко хлеб ядях и питие мое с плачем растворях,
10 १० कारण तुझ्या भयंकर क्रोधामुळे, तू मला वर उचलून घेऊन खाली फेकून दिलेस.
от лица гнева Твоего и ярости Твоея: яко вознес низвергл мя еси.
11 ११ माझे दिवस उतरत्या सावलीप्रमाणे झाले आहेत, आणि गवतासारखा मी कोमेजून गेलो आहे.
Дние мои яко сень уклонишася, и аз яко сено изсхох.
12 १२ पण हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस, आणि तुझी कीर्ती सर्व पिढ्यांसाठी सर्वकाळ राहील.
Ты же, Господи, во век пребываеши, и память Твоя в род и род.
13 १३ तू उठून उभा राहशील आणि सियोनेवर दया करशील. तिच्यावर दया करण्याची वेळ आता आली आहे; नेमलेला वेळ आला आहे.
Ты воскрес ущедриши Сиона: яко время ущедрити его, яко прииде время.
14 १४ कारण तुझे सेवक तिच्या दगडांची आवड धरतात, आणि तिच्या नासधूसाची धूळ पाहून त्यांना कळवळा येतो.
Яко благоволиша раби Твои камение его, и персть его ущедрят.
15 १५ हे परमेश्वरा, राष्ट्रे तुझ्या नावाचा आदर करतील, आणि पृथ्वीवरील सर्व राजे तुझ्या वैभवाचा सन्मान करतील.
И убоятся языцы имене Господня, и вси царие земстии славы Твоея:
16 १६ परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल, आणि तो आपल्या गौरवाने प्रगट होईल.
яко созиждет Господь Сиона и явится во славе Своей.
17 १७ आणखी तो अनाथाच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल. तो त्यांची प्रार्थना नाकारणार नाही.
Призре на молитву смиренных и не уничижи моления их.
18 १८ पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल, आणि अजून ज्या लोकांचा जन्म झाला नाही ते परमेश्वराची स्तुती करतील.
Да напишется сие в род ин, и людие зиждемии восхвалят Господа:
19 १९ कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानातून खाली पाहीले आहे. परमेश्वराने स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहीले,
яко приниче с высоты святыя Своея, Господь с небесе на землю призре,
20 २० तो बंदिवानाचे कण्हणे ऐकेल, ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठरवली होती त्यास सोडविले.
услышати воздыхание окованных, разрешити сыны умерщвленных:
21 २१ नंतर सियोनेतील लोक परमेश्वराचे नाव सांगतील, आणि यरूशलेमेत त्याची स्तुती करतील.
возвестити в Сионе имя Господне и хвалу Его во Иерусалиме,
22 २२ जेव्हा परमेश्वराची एकत्र सेवा करण्यासाठी सगळी राष्ट्रे एकत्र येतील.
внегда собратися людем вкупе и царем, еже работати Господеви.
23 २३ त्याने माझी शक्ती जीवनाच्या मध्येच काढून घेतली. त्याने माझे दिवस कमी केले.
Отвеща Ему на пути крепости Его: умаление дний моих возвести ми:
24 २४ मी म्हणालो, “हे माझ्या देवा, माझ्या जीवनाच्या मध्येच मला काढून घेऊ नकोस; तू येथे सर्व पिढ्यानपिढ्यातून आहेस.
не возведи мене во преполовение дний моих: в роде родов лета Твоя.
25 २५ तू प्राचीन काळी पृथ्वीचा पाया घातला; आकाश तुझ्या हातचे कार्य आहे.
В началех Ты, Господи, землю основал еси, и дела руку Твоею суть небеса.
26 २६ ते नाहीसे होईल, पण तू राहशील; ते सर्व कापडाप्रमाणे जीर्ण होतील; कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील आणि ते नाहीसे होतील.
Та погибнут, Ты же пребываеши: и вся яко риза обетшают, и яко одежду свиеши я, и изменятся.
27 २७ पण तू सारखाच आहे, आणि तुझ्या वर्षांना अंत नाही.
Ты же тойжде еси, и лета Твоя не оскудеют.
28 २८ तुझ्या सेवकांची मुले इथे कायम राहतील, आणि त्यांचे वंशज तुझ्या उपस्थितीत इथे राहतील.”
Сынове раб Твоих вселятся, и семя их во век исправится.