< स्तोत्रसंहिता 101 >

1 दाविदाचे स्तोत्र मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन; हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन;
大卫的诗。 我要歌唱慈爱和公平; 耶和华啊,我要向你歌颂!
2 मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन. अहा, तू माझ्याकडे कधी येशील? मी माझ्या घरात सचोटीने चालेन.
我要用智慧行完全的道。 你几时到我这里来呢? 我要存完全的心行在我家中。
3 मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही; अनाचाराचा मी द्वेष करतो; तो मला बिलगणार नाही.
邪僻的事,我都不摆在我眼前; 悖逆人所做的事,我甚恨恶, 不容沾在我身上。
4 हेकेखोर लोक मला सोडतील; मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही.
弯曲的心思,我必远离; 一切的恶人,我不认识。
5 आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन. जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही.
在暗中谗谤他邻居的,我必将他灭绝; 眼目高傲、心里骄纵的,我必不容他。
6 देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल.
我眼要看国中的诚实人,叫他们与我同住; 行为完全的,他要伺候我。
7 कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत; लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही.
行诡诈的,必不得住在我家里; 说谎话的,必不得立在我眼前。
8 देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन; वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन.
我每日早晨要灭绝国中所有的恶人, 好把一切作孽的从耶和华的城里剪除。

< स्तोत्रसंहिता 101 >