< स्तोत्रसंहिता 101 >
1 १ दाविदाचे स्तोत्र मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन; हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन;
達味的詩歌。
2 २ मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन. अहा, तू माझ्याकडे कधी येशील? मी माझ्या घरात सचोटीने चालेन.
我要歌頌仁愛與公正,上主,我還要向您吟詠。
3 ३ मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही; अनाचाराचा मी द्वेष करतो; तो मला बिलगणार नाही.
我要走齊全的路,您何時來我這裏?我要在我的家中,以純潔的心度日。
4 ४ हेकेखोर लोक मला सोडतील; मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही.
我決不把邪僻的事情放置在我的眼前;我痛恨為非作歹的人,不讓他與我相聯。
5 ५ आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे निंदानालस्ती करणाऱ्याचा मी नाश करीन. जो कोणी गर्विष्ठ चालीरीतीचा आणि उर्मट वागणूकीचा आहे त्याचे मी सहन करणार नाही.
敗壞的心,我要達離;邪惡我不認識。
6 ६ देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल.
暗中設計毀謗同僚的人,我要消滅他;高視闊步,心高氣傲的人,我不容忍他。
7 ७ कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत; लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही.
我眼注視國內忠誠的人,讓他們與我同住,在齊全道路行走的人才可作我的忠僕。7. 詭詐欺騙的人,不得住在我的宮內,說謊不實的人,不得在我眼前存在。
8 ८ देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन; वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन.
我每日清早要滅絕在國所有罪人,我要由上主的城內剷除所有作惡的人。