< स्तोत्रसंहिता 100 >
1 १ हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा.
稱謝詩。 普天下當向耶和華歡呼!
2 २ परमेश्वराची सेवा आनंदाने करा. त्याच्या सान्निध्यात आनंदाने गाणी गात या.
你們當樂意事奉耶和華, 當來向他歌唱!
3 ३ परमेश्वर हाच देव आहे हे जाणून घ्या. त्यानेच आम्हास निर्माण केले, आणि आम्ही त्याचे आहोत. आपण त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील त्याचे मेंढरे आहोत.
你們當曉得耶和華是上帝! 我們是他造的,也是屬他的; 我們是他的民,也是他草場的羊。
4 ४ त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात, आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
當稱謝進入他的門; 當讚美進入他的院。 當感謝他,稱頌他的名!
5 ५ कारण परमेश्वर चांगला आहे; त्याची दया सर्वकाळ आहे, आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे.
因為耶和華本為善。 他的慈愛存到永遠; 他的信實直到萬代。