< स्तोत्रसंहिता 10 >
1 १ हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? संकटकाळी तू स्वत: ला का लपवतोस?
Porque estás ao longe, Senhor? Porque te escondes nos tempos de angústia?
2 २ कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो, परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो.
Os ímpios na sua arrogância perseguem furiosamente o miserável; sejam apanhados nas ciladas que maquinaram.
3 ३ कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो; दुष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो व परमेश्वरास तुच्छ मानतो आणि नाकारतो.
Porque o ímpio glória-se do desejo da sua alma; bendiz ao avarento, e blasfema do Senhor.
4 ४ दुष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, ह्यास्तव तो देवाला शोधत नाही. कारण देवाबद्दल त्यास काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही.
Pela altivez do seu rosto o ímpio não busca a Deus: todas as suas cogitações são que não há Deus
5 ५ त्याचे मार्ग उन्नतीचे असतात, परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत, तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो.
Os seus caminhos atormentam sempre: os teus juízos estão longe da vista dele em grande altura, e despreza aos seus inimigos.
6 ६ तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही; संपूर्ण पिढ्यांत माझ्यावर आपत्ती येणारच नाही.
Diz em seu coração: Não serei comovido, porque nunca me verei na adversidade.
7 ७ त्याचे मुख शाप, कपट, जुलूम, हानिकारक शब्दांनी भरलेले आहेत. त्यांची जीभ जखमी व नाश करते.
A sua boca está cheia de imprecações, de enganos e de astúcia; debaixo da sua língua há moléstia e maldade.
8 ८ तो गावाजवळ टपून बसतो, गुप्त ठिकाणात तो निर्दोष्याला ठार मारतो; त्याचे डोळे लाचारावर टपून असतात.
Põe-se nas emboscadas das aldeias; nos lugares ocultos mata ao inocente; os seus olhos estão ocultamente fitos contra o pobre.
9 ९ जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो. तो दीनाला धरायला टपून बसतो. तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो.
Arma ciladas no esconderijo, como o leão no seu covil; arma ciladas para roubar ao miserável; rouba ao miserável, trazendo-o na sua rede.
10 १० त्याचे बळी पडणारे ठेचले आणि झोडले जातात. ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात.
Encolhe-se, abaixa-se, para que os pobres caiam em suas fortes garras.
11 ११ तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे, त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही.
Diz em seu coração: Deus esqueceu-se, cobriu o seu rosto, e nunca o verá.
12 १२ हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव. गरीबांना विसरु नकोस.
Levanta-te, Senhor: oh! Deus, levanta a tua mão; não te esqueças dos miseráveis.
13 १३ दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो?
Porque blasfema o ímpio de Deus? dizendo no seu coração: Tu não o esquadrinharás?
14 १४ तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु: ख पाहतो, लाचार तुला आपणास सोपवून देतो, तू अनाथांचा वाचवणारा आहे.
Tu o viste, porque atentas para o trabalho e enfado, para o entregar em tuas mãos; a ti o pobre se encomenda, tu és o auxílio do órfão.
15 १५ दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक, त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्यास जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही.
Quebra o braço do ímpio e malvado; busca a sua impiedade, até que nenhuma encontres.
16 १६ परमेश्वर सदासर्वकाळ राजा आहे, राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत.
O Senhor é Rei eterno; da sua terra perecerão os gentios.
17 १७ हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे; तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे.
Senhor, tu ouviste os desejos dos mansos; confortarás os seus corações; os teus ouvidos estarão abertos para eles;
18 १८ पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे, म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये.
Para fazer justiça ao órfão e ao oprimido, afim de que o homem da terra não prosiga mais em usar da violência.