< स्तोत्रसंहिता 10 >

1 हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? संकटकाळी तू स्वत: ला का लपवतोस?
Kungani, Oh Thixo, umela khatshana? Kungani uzifihla ngezikhathi zokuhlupheka?
2 कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो, परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो.
Ngobuqholo bakhe umuntu omubi uzingela ababuthakathaka, abayengeka ngamacebo awakhayo.
3 कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो; दुष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो व परमेश्वरास तुच्छ मानतो आणि नाकारतो.
Uzikhukhumeza ngezinkanuko zenhliziyo yakhe; ubusisa abayizihwaba athuke uThixo.
4 दुष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, ह्यास्तव तो देवाला शोधत नाही. कारण देवाबद्दल त्यास काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही.
Ngenxa yokuzigqaja kwakhe omubi kamdingi uThixo; kuyo yonke imicabango yakhe akulandawo kaNkulunkulu.
5 त्याचे मार्ग उन्नतीचे असतात, परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत, तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो.
Izindlela zakhe ziyaphumelela; uyadelela njalo lemithetho yakho ikhatshana laye aneme lapho ebona izitha zakhe.
6 तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही; संपूर्ण पिढ्यांत माझ्यावर आपत्ती येणारच नाही.
Uthi, “Akulalutho olungangixukuxa; ukuthokoza ngokwami lanini, angiyikufa ngahlupheka.”
7 त्याचे मुख शाप, कपट, जुलूम, हानिकारक शब्दांनी भरलेले आहेत. त्यांची जीभ जखमी व नाश करते.
Umlomo wakhe ugcwele amanga lenhlamba lezithuko; ulimi lwakhe luqukethe uhlupho lobubi.
8 तो गावाजवळ टपून बसतो, गुप्त ठिकाणात तो निर्दोष्याला ठार मारतो; त्याचे डोळे लाचारावर टपून असतात.
Ucathama ngaphandle kwemizi; avumbuluke lapho abulale abantu abamsulwa, ahlale ecatheme ekusithekeni.
9 जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो. तो दीनाला धरायला टपून बसतो. तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो.
Uyacathama njengesilwane ekusithekeni; ucathamela labo abangelamandla; uyabadumela abahudulele emambuleni akhe.
10 १० त्याचे बळी पडणारे ठेचले आणि झोडले जातात. ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात.
Ababambileyo uyabachoboza baphangalale; uyabawisa ngamandla akhe.
11 ११ तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे, त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही.
Uzitshela athi, “UNkulunkulu usekhohliwe; uyabugubuzela ubuso bakhe angabe esabona.”
12 १२ हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव. गरीबांना विसरु नकोस.
Vuka, Thixo! Phakamisa isandla sakho, Oh Nkulunkulu. Ungabakhohlwa abazihluphekelayo.
13 १३ दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो?
Kungani umuntu omubi ethuka uNkulunkulu na? Kungani na ezitshela esithi, “Kazukungithonisisa?”
14 १४ तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु: ख पाहतो, लाचार तुला आपणास सोपवून देतो, तू अनाथांचा वाचवणारा आहे.
Kodwa wena, Oh Nkulunkulu, uyalubona uhlupho losizi; uyakunanzelela ukuze ulamule. Ongelamandla uzilahla kuwe; wena ungumsizi wezintandane.
15 १५ दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक, त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्यास जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही.
Yephula ingalo yomuntu oxhwalileyo; mthonisise ngokuganga kwakhe obekuzahlala kungaziwa.
16 १६ परमेश्वर सदासर्वकाळ राजा आहे, राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत.
UThixo ungumbusi kuze kube nini lanini; izizwe zizabhubha elizweni lakhe.
17 १७ हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे; तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे.
Uyazizwa, Oh Thixo, izifiso zabancindezelweyo; uyabaqinisa, ulalele ukukhala kwabo,
18 १८ पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे, म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये.
ulamulele izintandane labancindezelweyo, ukuze kuthi umuntu, ongowasemhlabeni, angabe esesabeka futhi.

< स्तोत्रसंहिता 10 >