< नीतिसूत्रे 9 >
1 १ ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले; त्यामध्ये तिने खडकाचे सात खांब कोरून तयार केले.
Visheten byggde sitt hus, och högg sju pelare;
2 २ तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशू तयार केले आहेत; तिने आपला द्राक्षरस मिसळला आहे; आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे, तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे.
Och slagtade sin boskap, skänkte sitt vin, och tillredde sitt bord;
3 ३ तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः
Och sände sina tjenarinnor ut, till att bjuda upp på stadsens palats:
4 ४ “जो अज्ञानी आहे तो इकडे येवो!” ती जे बुद्धिहीन आहेत त्यांना म्हणते.
Den fåkunnig är, han komme hit; och till de dårar sade hon:
5 ५ “या, माझे अन्न खा. आणि मी मिसळलेला द्राक्षरस प्या.
Kommer, äter af mitt bröd, och dricker af vinet, som jag skänker;
6 ६ तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा; सुज्ञानाच्या मार्गाने चला.”
Öfvergifver det galna väsendet, så fån I lefva; och går på förståndsens väg.
7 ७ जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आंमत्रण करतो, आणि जो दुर्जन मनुष्यास बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो.
Hvilken som tuktar bespottaren, han får skam igen; och den som straffar en ogudaktigan, han varder försmädad.
8 ८ निंदकाला बोल लावू नको नाहीतर तो तुझा द्वेष करेल; ज्ञान्यास बोल लाव आणि तो तुझ्यावर प्रेम करील.
Straffa bespottaren intet, att han icke hatar dig; straffa den visa, han skall älska dig.
9 ९ ज्ञानी मनुष्यास शिक्षण दिले तर तो ज्ञानात अधिक वाढत जाईल; नितीमान मनुष्यास शिक्षण दिले तर तो शिक्षणात अधिक वाढेल.
Gif dem visa, så skall han ännu visare varda; lär den rättfärdiga, så växer han till i lärdom.
10 १० परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे, आणि परमपवित्र देवाला ओळखणे हीच सुज्ञता आहे.
Vishetenes begynnelse är Herrans fruktan, och förstånd lärer hvad heligt är;
11 ११ कारण माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, आणि तुमच्या आयुष्याची वर्षे वाढतील.
Ty igenom mig skola dine dagar månge varda, och dins lifs år dig flere varda.
12 १२ जर तुम्ही ज्ञानी असलास, तर तू आपणासाठी ज्ञानी असशील, पण जर तू निंदा केली तर तूच मात्र तिचे फळ भोगशील.
Äst du vis, så äst du dig vis; äst du en bespottare, så måste du umgälla det allena.
13 १३ मूर्ख स्त्री गोंगाट करणाऱ्यासारखी आहे, ती अज्ञानी आहे आणि तिला काही कळत नाही.
Men en galen ostadig qvinna, full med sqvaller, och fåvitsk;
14 १४ ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते, ती नगरातल्या उंचस्थानी आसनावर बसते.
Sitter i sins hus dörr, på en stol, högt uppe i stadenom;
15 १५ जे लोक आपल्या वाटेने सरळ चालतात, जवळून जाणाऱ्यांना ती हाक मारून म्हणते,
Till att bjuda alla de der framom gå, och rättelliga vandra på sinom vägom:
16 १६ “जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येवो!” जो कोणी बुद्धिहीन आहे त्यास ती म्हणते.
Den der fåkunnig är, han komme hit. Och till de dårar säger hon:
17 १७ “चोरलेले पाणी गोड लागते, आणि गुप्तपणे खाल्लेली भाकर चांगली लागते.”
Stulet vatten är sött, och fördoldt bröd är lustigt.
18 १८ पण तेथे मरण पावलेले आहेत हे त्यांना समजत नाही, तिचे पाहुणे मृतलोकाच्या खोल स्थानात आहेत हे त्यास माहित नाही. (Sheol )
Men han vet icke, att der äro de döde, och hennes gäster uti djupa helvetet. (Sheol )