< नीतिसूत्रे 8 >

1 ज्ञान हाक मारित नाही काय? सुज्ञपणा तिचा आवाज उंचावत नाही का?
Bilgelik çağırıyor, Akıl sesini yükseltiyor.
2 रस्त्याच्याबाजूला टेकडीच्या माथ्यावर, ज्ञान तिला चौकाकडे उभे करते.
Yol kenarındaki tepelerin başında, Yolların birleştiği yerde duruyor o.
3 ते शहराच्या प्रवेशव्दाराजवळ, शहराच्या वेशीजवळ, ती मोठ्याने हाक मारते.
Kentin girişinde, kapıların yanında, Sesini yükseltiyor:
4 “लोकांनो, मी तुम्हास बोलावत आहे. आणि मानवजातीच्या मुलांसाठी आवाज उंचावते.
“Ey insanlar, size sesleniyorum, Çağrım insan soyunadır!
5 अहो भोळ्यांनो, तुम्ही समंजसपणा समजून घ्या आणि तुम्ही कोणी ज्ञानाचा द्वेष करता, त्या तुम्ही सुबुद्ध हृदयाचे व्हा.
Ey bön kişiler, ihtiyatlı olmayı öğrenin; Sağduyulu olmayı öğrenin, ey akılsızlar!
6 ऐका आणि मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे, आणि जेव्हा माझे ओठ उघडतील तेव्हा जे योग्य आहे ते मी सांगेन,
Söylediğim yetkin sözleri dinleyin, Ağzımı doğruları söylemek için açarım.
7 कारण माझे मुख खरे आहे तेच बोलते, आणि माझ्या ओठांना वाईटाचा वीट आहे.
Ağzım gerçeği duyurur, Çünkü dudaklarım kötülükten iğrenir.
8 माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यामध्ये काही वेडेवाकडे किंवा फसवेगिरी नाही.
Ağzımdan çıkan her söz doğrudur, Yoktur eğri ya da sapık olanı.
9 ज्या कोणाला समज आहे त्यास माझी सर्व वचने सरळ आहेत; ज्या कोणाला ज्ञान प्राप्त झाले आहे त्यास माझी वचने योग्य आहेत.
Apaçıktır hepsi anlayana, Bilgiye erişen, doğruluğunu bilir onların.
10 १० रुपे घेऊ नका तर माझ्या शिक्षणाचा स्वीकार करा, आणि शुध्द सोने न घेता ज्ञान घ्या.
Gümüş yerine terbiyeyi, Saf altın yerine bilgiyi edinin.
11 ११ कारण मी, ज्ञान, मौल्यवान खड्यांपेक्षा उत्तम आहे; त्याची आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही वस्तूशी माझी तुलना होऊ शकत नाही.
Çünkü bilgelik mücevherden değerlidir, Dilediğin hiçbir şey onunla kıyaslanamaz.
12 १२ मी, ज्ञान, चातुर्याबरोबर राहते, आणि विद्या व विवेक ही मी प्राप्त करून घेतली आहे.
Ben bilgelik olarak ihtiyatı kendime konut edindim. Bilgi ve sağgörü bendedir.
13 १३ परमेश्वराचे भय म्हणजे वाईटाचा द्वेष करणे आहे; मी गर्व, अभिमान, वाईट मार्ग व कुटिल वाणी यांचा मी द्वेष करते.
RAB'den korkmak kötülükten nefret etmek demektir. Kibirden, küstahlıktan, Kötü yoldan, sapık ağızdan nefret ederim.
14 १४ चांगला सल्ला आणि सुज्ञान ही माझी आहेत; मला ज्ञान आहे आणि सामर्थ्य ही माझी आहेत.
Öğüt ve sağlam karar bana özgüdür. Akıl ve güç kaynağı benim.
15 १५ माझ्याद्वारे राजे सरदारसुद्धा राज्य करतात आणि सर्व अधिकारी न्यायाने कारभार चालवतात.
Krallar sayemde egemenlik sürer, Hükümdarlar adil kurallar koyar.
16 १६ माझ्याद्वारे राजपुत्र आणि सरदार व सर्व कोणी न्यायाधीश अधिकार चालवतात.
Önderler, adaletle yöneten soylular Sayemde yönetirler.
17 १७ माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; आणि जे मला परिश्रमाने शोधतात, त्यांना मी सापडते.
Beni sevenleri ben de severim, Gayretle arayan beni bulur.
18 १८ धन व सन्मान, टिकणारी संपत्ती व सदाचरण ही माझ्याजवळ आहे.
Zenginlik ve onur, Kalıcı değerler ve bolluk bendedir.
19 १९ माझे फळ सोन्यापेक्षा, शुद्ध सोन्यापेक्षाही उत्तम आहे; मी जे काही उत्पन्न करतो ते शुद्ध रुप्यापेक्षा उत्तम आहे.
Meyvem altından, saf altından, Ürünüm seçme gümüşten daha iyidir.
20 २० जो योग्य मार्ग आहे त्याने मी चालते, ती वाट न्यायाकडे नेते,
Doğruluk yolunda, Adaletin izinden yürürüm.
21 २१ म्हणून जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी वडिलोपार्जित मिळकत देते. आणि त्यांची भांडारे भरते.
Böylelikle, beni sevenleri servet sahibi yapar, Hazinelerini doldururum.
22 २२ परमेश्वराने सुरवातीपासून आपल्या पुरातन कृत्यातले पहिले कृत्य असे मला निर्माण केले.
RAB yaratma işine başladığında İlk beni yarattı,
23 २३ अनादिकाली, प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली.
Dünya var olmadan önce, Ta başlangıçta, öncesizlikte yerimi aldım.
24 २४ जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते. तेव्हा माझा जन्म झाला;
Enginler yokken, Suları bol pınarlar yokken doğdum ben.
25 २५ पर्वत स्थापित झाले त्यापूर्वी, आणि टेकड्यापूर्वी, माझा जन्म झाला.
Dağlar daha oluşmadan, Tepeler belirmeden, RAB dünyayı, kırları Ve dünyadaki toprağın zerresini yaratmadan doğdum.
26 २६ परमेश्वराने पृथ्वी व शेत किंवा पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच मी जन्मले.
27 २७ जेव्हा त्याने आकाशाची स्थापना केली तेव्हा मी तिथे होते, जेव्हा त्याने जलाशयाची वर्तुळाकार सीमा आखली.
RAB gökleri yerine koyduğunda oradaydım, Engin denizleri ufukla çevirdiğinde,
28 २८ जेव्हा त्याने आकाश वर स्थापित केले तेव्हा मी होते आणि, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले.
Bulutları oluşturduğunda, Denizin kaynaklarını güçlendirdiğinde,
29 २९ जेव्हा त्याने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाण्याने त्याच्या आज्ञेच उल्लंघन करून पसरू नये, आणि जेव्हा त्याने आज्ञा केली पृथ्वीचा पाया जेथे असायला पाहिजे तेथे मी होते.
Sular buyruğundan öte geçmesinler diye Denize sınır çizdiğinde, Dünyanın temellerini pekiştirdiğinde,
30 ३० तेव्हा मी त्याच्याजवळ कुशल कारागिर होते, दिवसेंदिवस मी आनंदाने भरत होतो, मी त्याच्यासमोर सर्वदा हर्ष करीत असे.
Baş mimar olarak O'nun yanındaydım. Gün be gün sevinçle dolup taştım, Huzurunda hep coştum.
31 ३१ मी त्याच्या संपूर्ण पृथ्वीवर हर्ष करी, आणि मनुष्यजातीच्या ठायी माझा आनंद होता.
O'nun dünyası mutluluğum, İnsanları sevincimdi.
32 ३२ तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, जे माझे मार्ग अनुसरतात ते धन्य आहेत.
Çocuklarım, şimdi beni dinleyin: Yolumu izleyenlere ne mutlu!
33 ३३ माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा; दुर्लक्ष करू नका.
Uyarılarımı dinleyin ve bilge kişiler olun, Görmezlikten gelmeyin onları.
34 ३४ जो माझे ऐकतो तो सुखी होईल तो माझ्या दारांशी प्रत्येक दिवशी जागत राहतो; तो माझ्या घराच्या दाराजवळ माझ्यासाठी थांबतो.
Beni dinleyen, Her gün kapımı gözleyen, Kapımın eşiğinden ayrılmayan kişiye ne mutlu!
35 ३५ कारण ज्याला मी सापडते, त्यास जीवन सापडते, आणि त्यास परमेश्वराकडून अनुग्रह मिळतो.
Çünkü beni bulan yaşam bulur Ve RAB'bin beğenisini kazanır.
36 ३६ पण जो कोणी मला शोधण्यास अयशस्वी होतो, जिवाची हानी करून घेतो; जे सर्व कोणी माझा द्वेष करतात, त्यांना मरण प्रिय आहे.”
Beni gözardı edense kendine zarar verir, Benden nefret eden, ölümü seviyor demektir.”

< नीतिसूत्रे 8 >