< नीतिसूत्रे 5 >

1 माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव; माझ्या सुज्ञानाकडे काळजीपूर्वक आपला कान लाव.
Synu můj, pozoruj moudrosti mé, k opatrnosti mé nakloň ucha svého,
2 म्हणून तू दूरदर्शीपणाविषयी शिक्षण घे, आणि तुझे ओठ तुझ्या विद्येचे रक्षण करतील.
Abys ostříhal prozřetelnosti, a rtové tvoji šetřili umění.
3 कारण व्यभिचारिणी स्त्रीच्या ओठातून मध टिपकतो, आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असते,
Nebo rtové cizí ženy strdí tekou, a měkčejší nad olej ústa její.
4 पण शेवटी ती दवण्यासारखी कडू आहे, आणि दुधारी तलवारी सारखी धारदार होते.
Poslední pak věci její hořké jsou jako pelyněk, ostré jako meč na obě straně ostrý.
5 तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात. (Sheol h7585)
Nohy její sstupují k smrti, krokové její hrob uchvacují. (Sheol h7585)
6 म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही. तिची पावले भटकतात, ती कोठे जाते हे तिला समजत नाही.
Stezku života snad bys zvážiti chtěl? Vrtkéť jsou cesty její, neseznáš.
7 आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; माझ्या तोंडची वचने ऐकण्यापासून दूर जाऊ नका.
Protož, synové, poslechněte mne, a neodstupujte od řečí úst mých.
8 तू आपला मार्ग तिच्यापासून दूर राख, आणि तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नको.
Vzdal od ní cestu svou, a nepřibližuj se ke dveřím domu jejího,
9 गेलास तर तुझी अब्रू इतरांच्या हाती जाईल, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे क्रूरजनाच्या हाती जातील;
Abys snad nedal jiným slávy své, a let svých ukrutnému,
10 १० तुझ्या संपत्तीने परके मेजवाणी करतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल.
Aby se nenasytili cizí úsilím tvým, a práce tvá nezůstala v domě cizím.
11 ११ जेव्हा तुझा देह व शरीर सर्वकाही नष्ट होईल, तेव्हा तुझ्या आयुष्याच्या शेवटी तू शोक करशील.
I řval bys naposledy, když bys zhubil tělo své a čerstvost svou,
12 १२ तू म्हणशील “मी शिस्तीचा कसा द्वेष केला, आणि माझ्या अंतःकरणाने शासन कसे तुच्छ मानले!
A řekl bys: Jak jsem nenáviděl cvičení, a domlouváním pohrdalo srdce mé,
13 १३ मी माझ्या शिक्षकांच्या आज्ञा पाळल्या नाहीत, किंवा मला शिकवणाऱ्याकडे कान दिला नाही.
A neposlouchal jsem hlasu vyučujících mne, a k učitelům svým nenaklonil jsem ucha svého!
14 १४ मंडळी व सभा यांच्यादेखत मी बहुतेक पुर्णपणे नाश पावलो होतो.”
O málo, že jsem nevlezl ve všecko zlé u prostřed shromáždění a zástupu.
15 १५ तू आपल्याच टाकितले पाणी पी, तुझ्या स्वतःच्या विहिरितले वाहते पाणी पी.
Pí vodu z čisterny své, a prameny z prostředku vrchoviště svého.
16 १६ तुझे झरे बाहेर सर्वत्र वाहून जावे काय, आणि तुझ्या पाण्याचा प्रवाह सार्वजनिक चौकात वाहावा कां?
Nechť se rozlévají studnice tvé ven, a potůčkové vod na ulice.
17 १७ ते केवळ तुझ्यासाठीच असावेत, आणि तुझ्याबरोबर परक्यांसाठी नसावेत.
Měj je sám sobě, a ne cizí s tebou.
18 १८ तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो, आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसह तू संतुष्ट रहा.
Budiž požehnaný pramen tvůj, a vesel se z manželky mladosti své.
19 १९ कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा.
Laně milostné a srny utěšené; prsy její ať tě opojují všelikého času, v milování jejím kochej se ustavičně.
20 २० माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे; तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे?
Nebo proč bys se kochal, synu můj, v cizí, a objímal život postranní,
21 २१ मनुष्य काय करतो हे परमेश्वर सर्वकाही पाहतो, तो त्याच्या सर्व वाटांकडे लक्ष देतो.
Poněvadž před očima Hospodinovýma jsou cesty člověka, a on všecky stezky jeho váží?
22 २२ दुष्ट मनुष्यास त्याची स्वतःचीच दुष्कर्मे धरतात, त्याची पापे दोरीप्रमाणे त्यास घट्ट पकडतील.
Nepravosti vlastní jímají bezbožníka takového, a v provazích hříchu svého uvázne.
23 २३ शिक्षणाची उणीव असल्या कारणाने तो मरेल; तो आपल्या महान मूर्खपणामुळे बहकून जाईल.
Takovýť umře, proto že nepřijímal cvičení, a ve množství bláznovství svého blouditi bude.

< नीतिसूत्रे 5 >