< नीतिसूत्रे 31 >

1 ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः
利慕伊勒王的言语,是他母亲教训他的真言。
2 ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? ऐक, माझ्या नवसाच्या मुला?
我的儿啊,我腹中生的儿啊, 我许愿得的儿啊!我当怎样教训你呢?
3 तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको.
不要将你的精力给妇女; 也不要有败坏君王的行为。
4 हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही.
利慕伊勒啊,君王喝酒,君王喝酒不相宜; 王子说浓酒在那里也不相宜;
5 ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील, नंतर ते गरीबांचा न्याय उलटा करतील.
恐怕喝了就忘记律例, 颠倒一切困苦人的是非。
6 जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे. आणि खिन्न जिवाला द्राक्षरस दे.
可以把浓酒给将亡的人喝, 把清酒给苦心的人喝,
7 त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे आणि त्याने आपले सर्व क्लेश विसरावे.
让他喝了,就忘记他的贫穷, 不再记念他的苦楚。
8 जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड.
你当为哑巴开口, 为一切孤独的伸冤。
9 तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर, आणि ते गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर.
你当开口按公义判断, 为困苦和穷乏的辨屈。
10 १० हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे.
才德的妇人谁能得着呢? 她的价值远胜过珍珠。
11 ११ तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, तो कधीही गरीब होणार नाही.
她丈夫心里倚靠她, 必不缺少利益;
12 १२ ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करते आणि अनिष्ट करत नाही.
她一生使丈夫有益无损。
13 १३ ती लोकर आणि ताग निवडते, आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते.
她寻找羊绒和麻, 甘心用手做工。
14 १४ ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे, ती आपले अन्न दुरून आणते.
她好像商船从远方运粮来,
15 १५ रात्र गेली नाही तोच ती उठून, आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते.
未到黎明她就起来, 把食物分给家中的人, 将当做的工分派婢女。
16 १६ ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते.
她想得田地就买来; 用手所得之利栽种葡萄园。
17 १७ ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, आणि आपले बाहू बळकट करते.
她以能力束腰, 使膀臂有力。
18 १८ आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते; सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही.
她觉得所经营的有利; 她的灯终夜不灭。
19 १९ ती आपला हात चातीला लावते, आणि ती गुंडाळलेला दोरा धरते.
她手拿捻线竿, 手把纺线车。
20 २० ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते; ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते.
她张手周济困苦人, 伸手帮补穷乏人。
21 २१ आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते.
她不因下雪为家里的人担心, 因为全家都穿着朱红衣服。
22 २२ ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते.
她为自己制作绣花毯子; 她的衣服是细麻和紫色布做的。
23 २३ तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात.
她丈夫在城门口与本地的长老同坐, 为众人所认识。
24 २४ ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते.
她做细麻布衣裳出卖, 又将腰带卖与商家。
25 २५ बल व आदर तिचे वस्त्र आहेत, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते.
能力和威仪是她的衣服; 她想到日后的景况就喜笑。
26 २६ तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे.
她开口就发智慧; 她舌上有仁慈的法则。
27 २७ ती कधीही आळशी नसते; ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते, आणि आळसाची भाकर खात नाही.
她观察家务, 并不吃闲饭。
28 २८ तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो,
她的儿女起来称她有福; 她的丈夫也称赞她,
29 २९ “पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.”
说:才德的女子很多, 惟独你超过一切。
30 ३० लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते.
艳丽是虚假的,美容是虚浮的; 惟敬畏耶和华的妇女必得称赞。
31 ३१ तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.
愿她享受操作所得的; 愿她的工作在城门口荣耀她。

< नीतिसूत्रे 31 >