< नीतिसूत्रे 30 >

1 याकेचा मुलगा आगूर याची वचने म्हणजे देववाणी आहेत. त्या पुरुषाने इथीएलाला, इथीएलाने उकालाला सांगितले,
Paroles d’Agour, fils de Yakéh. Déclaration solennelle. Ce personnage disait: "J’Ai peiné, ô Dieu, j’ai peiné, ô Dieu, et je m’y suis épuisé.
2 खचित मी खूप क्रूर आहे मनुष्य नाही; मला मानवजातीप्रमाणे समजदार बुद्धी नाही.
Car je suis le plus borné des mortels, l’intelligence humaine me fait défaut.
3 मी ज्ञान शिकलो नाही, आणि जो पवित्र त्याचे ज्ञान मला नाही.
Je n’ai pas étudié la sagesse, de façon à concevoir une notion exacte du Très-Saint.
4 आकाशापर्यंत चढून कोण गेला आहे आणि खाली उतरला आहे? कोणी वाऱ्याला आपल्या ओंजळीत एकवटून घेतला आहे? कोणी आपल्या कपड्यात जलाशय बांधून ठेवला आहे? पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत? त्याचे नाव काय किंवा त्याच्या मुलाचे नाव काय? खात्रीने ते तुला माहित आहे काय?
Qui est monté au Ciel et en est redescendu? Qui a recueilli le vent dans le creux de sa main? Qui a enserré les eaux dans le pan de son manteau? Qui a établi toutes les limites de la terre? Quel est son nom, quel est le nom de son fils? Dis-le si tu le sais."
5 देवाचा प्रत्येक शब्द पारखलेला आहे, जे त्याच्या आश्रयास येतात त्यांची तो ढाल आहे.
Toute parole émanée de Dieu est parfaite: il est un bouclier pour ceux qui s’abritent en lui.
6 त्याच्या वचनात काही भर घालू नको, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील.
Ne te permets aucune addition à ses dires, il te réprouverait et tu serais convaincu de mensonge.
7 मी तुझ्याजवळ दोन गोष्टी मागतो, मी मरण्यापूर्वी त्या मला देण्याचे नाकारू नको.
Je te demande deux choses; ne me les refuse pas avant que je meure!
8 पोकळ गर्व आणि लबाड्या माझ्यापासून दूर कर; मला खूप श्रीमंत किंवा खूप गरीब करू नकोस. मला आवश्यक तेवढेच अन्न दे.
Eloigne de moi la fausseté et la parole mensongère, ne me donne ni pauvreté ni richesse; accorde-moi la part de nourriture qui m’est indispensable;
9 माझी जर अतीतृप्ती झाली तर मी तुला नाकारीन आणि परमेश्वर कोण आहे? असे म्हणेन; मी जर दरिद्री राहिलो तर मी कदाचित् चोरी करेन. आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करेन.
car, vivant dans l’abondance, je pourrais te renier en disant: "Qui est l’Eternel?" ou bien, poussé par la misère, je pourrais voler et offenser le nom de mon Dieu.
10 १० सेवकाची निंदानालस्ती त्याच्या धन्याजवळ करू नको, करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील.
Ne dénigre pas l’esclave auprès de son maître: il te maudirait, et ta faute serait punie.
11 ११ आपल्या पित्याला शाप देणारा, आणि आपल्या आईला आशीर्वाद देत नाही अशी एक पिढी आहे,
Ah! la génération où l’on maudit son père, où l’on n’a pas de bénédiction pour sa mère!
12 १२ त्यांच्या दृष्टीने आपणाला शुद्ध समजणारी, पण त्यांनी स्वतःची घाण धुतलेली नाही अशी एक पिढी आहे.
La génération qui se prétend pure et qui ne s’est pas lavée Je ses souillures!
13 १३ ज्यांचे डोळे कितीतरी गर्विष्ठ आहेत, आणि ज्यांच्या पापण्या वर चढलेल्या आहेत अशी एक पिढी आहे.
La génération aux yeux démesurément hautains et au regard altier!
14 १४ गरीबांना पृथ्वीतून व गरजवंताना मनुष्यामधून खाऊन टाकायला, जिचे दात तलवारीसारखे व जिच्या दाढा सुऱ्यांसारख्या आहेत अशी एक पिढी आहे.
La génération dont les dents sont comme des glaives et les mâchoires comme des couteaux, servant à dévorer les pauvres de la terre et les indigents parmi les hommes!
15 १५ जळवेच्या दोन मुली आहेत, त्या दे, व दे अशा ओरडतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, चार गोष्टी, कधीही पुरे म्हणत नाही.
Alouka a deux filles: "Hab, Hab!" II est trois choses qui sont insatiables, quatre qui ne disent pas: "Assez!"
16 १६ मृत्यूची जागा, वांझ उदर, पाण्याने तहानलेली पृथ्वी आणि जो अग्नी पुरे कधी म्हणत नाही. (Sheol h7585)
c’est le. Cheol, le sein qui n’a point conçu, la terre qui n’est jamais rassasiée d’eau et le feu qui ne dit pas: "Assez!" (Sheol h7585)
17 १७ जो डोळा पित्याची चेष्टा करतो, किंवा त्याच्या आईची आज्ञा पाळणे तुच्छ मानतो, त्यांचे डोळे खोऱ्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील आणि त्यास गिधडाची पिल्ले खाऊन टाकतील.
L’Œil qui se rit d’un père et n’a que dédain pour les rides d’une mère, puisse-t-il être arraché par les corbeaux de la vallée, dévoré par les aigles!
18 १८ मला तीन गोष्टी फार आश्चर्याच्या वाटतात, चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही.
Il est trois choses qui me sont inaccessibles et quatre que je ne connais point:
19 १९ आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग; दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग, समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग, आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग,
la trace de l’aigle dans les cieux, la trace du serpent sur le rocher, la trace du navire au sein des mers et la trace de l’homme chez la jeune femme.
20 २० हा व्यभिचारी स्त्रिचा मार्ग असा आहे; ती खाऊन तोंड पुसते, आणि म्हणते मी काही चुकीचे केले नाही.
Tel est le secret de la conduite d’une femme adultère: elle satisfait ses appétits, s’essuie la bouche et dit: "Je n’ai rien fait de mal!"
21 २१ तीन गोष्टीने पृथ्वी कांपते, आणि चार गोष्टी तिला सहन होत नाहीत.
Il est trois spectacles qui font frémir la terre et quatre qu’elle ne peut tolérer:
22 २२ जेव्हा दास राजा होतो, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख;
le spectacle de l’esclave qui devient roi, le spectacle du scélérat qui vit dans l’abondance:
23 २३ विवाह झालेली त्रासदायक स्त्री; मालकिणीची वारस झालेली दासी.
le spectacle d’une femme digne d’aversion qui trouve un épouseur, et le spectacle de la servante qui supplante sa maîtresse.
24 २४ पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत; पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत.
Il existe sur terre quatre êtres tout petits, et qui sont sages par excellence:
25 २५ मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात, पण तरीही त्या उन्हाळ्यात आपले अन्न साठवतात.
les fourmis, peuple sans force, font en été leurs provisions;
26 २६ ससे हे सशक्त प्राणी नाहीत, पण ते खडकात आपले घर करतात.
les gerboises, peuple sans puissance, établissent leur demeure dans les rochers;
27 २७ टोळांना राजा नसतो, पण तरीही ते सर्व टोळीटोळीने बाहेर जातात.
les sauterelles n’ont pas de roi et elles se mettent toutes en campagne par bandes;
28 २८ पाल आपण हातानी पकडू शकतो, तरी ती राजाच्या महालात सापडते.
l’araignée, tu peux l’attraper avec la main, et elle se tient dans le palais des rois!
29 २९ जे आपल्या चालण्यात डौलदार असतात असे तीन प्राणी आहेत, चौघांची आपली चालण्याची ढब सुरेख आहे,
Il y a trois êtres qui s’avancent d’un pas imposant et quatre qui ont une noble démarche:
30 ३० सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे तो कोणापासूनही मागे फिरत नाही.
le lion, le plus fort des animaux, qui ne recule devant rien;
31 ३१ गर्वाने चालणारा कोंबडा, बोकड; आणि ज्याचे सैन्य त्याच्याजवळ आहे असा राजा.
le lévrier aux reins cambrés, ou le bouc, et le roi à la tête de son armée.
32 ३२ जर तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केले किंवा दुष्टता योजिली तर आपला हात आपल्या मुखावर ठेव.
Que tu aies agi follement en cherchant à t’élever ou après de sages réflexions, mets-toi la main sur la bouche:
33 ३३ कारण जसे दूध घुसळण्याने लोणी निघते, आणि नाक पिळण्याने रक्त निघते, तसे राग चेतवल्याने भांडणे निर्माण होतात.
Car la compression du lait produit le beurre, la compression du nez fait jaillir le sang, et la pression de la colère fait éclater les disputes!

< नीतिसूत्रे 30 >