< नीतिसूत्रे 3 >
1 १ माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस, आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव;
Me ba, mma wo werɛ mfi me nkyerɛkyerɛ, kora me mmara wɔ wo koma mu,
2 २ कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी आणि शांती ही तुला अधिक लाभतील.
na ɛbɛma wo nkwa aware, mfe bebree na ɛde yiyedi abrɛ wo.
3 ३ विश्वासाचा करार आणि प्रामाणिकपणा तुला कधीही न सोडो, त्यांना एकत्र करून आपल्या गळ्यात बांध, ते आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.
Mma adɔe ne nokware mmfi wo nkyɛn fa yan wo kɔn mu kyerɛw gu wo koma pon so.
4 ४ म्हणजे तुला देवाच्या व मनुष्याच्या दृष्टीने कृपा व सुकीर्ती ही मिळतील.
Na wubenya adom ne din pa wɔ Onyankopɔn ne nnipa anim.
5 ५ तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव. आणि तुझ्या स्वत: च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस;
Fa wo koma nyinaa to Awurade so, na mfa wo ho nto wʼankasa ntease so;
6 ६ तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव, आणि तो तुझ्या वाटा सरळ करील.
hu no wʼakwan nyinaa mu, na ɔbɛteɛ wʼakwan.
7 ७ तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा.
Nnye wo ho nni sɛ woyɛ onyansafo; suro Awurade na kyi bɔne.
8 ८ हे तुझ्या शरीराला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व असे होईल.
Ɛde ahoɔden bɛbrɛ wo nipadua, na ayɛ aduan ama wo nnompe.
9 ९ तुझ्या संपत्तीने आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वरास मान दे,
Fa wʼahonya hyɛ Awurade anuonyam, ne wo nnɔbae a edi kan nyinaa;
10 १० त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील.
na ɛno na ɛbɛma wo pata ayɛ ma abu so, na nsa foforo abu afa wʼahina so.
11 ११ माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको, आणि त्याच्या शासनाचा द्वेष करू नकोस,
Me ba, sɛ Awurade teɛ wo so a, tie no yiye, na mmu nʼanimka so,
12 १२ जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो, तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो.
Efisɛ, obiara a Awurade pɛ nʼasɛm no, ɔtwe nʼaso, sɛnea agya teɛ ɔba a ɔdɔ no no.
13 १३ ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे, त्यास ग्रहणशक्ती सुद्धा प्राप्त होते.
Nhyira nka onipa a ohu nyansa, onipa a onya ntease,
14 १४ ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे, आणि त्याचे फायदे उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत.
efisɛ, nimdeɛ so mfaso sen dwetɛ, na nea efi mu ba sen sikakɔkɔɔ.
15 १५ ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही.
Ne bo yɛ den sen bota; na worentumi mfa wʼapɛde biara ntoto no ho.
16 १६ तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत.
Nkwa tenten wɔ ne nsa nifa mu; ahonyade ne anuonyam wɔ ne nsa benkum mu.
17 १७ तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत.
Nʼakwan yɛ ahomeka, na nʼanammɔnkwan nyinaa yɛ asomdwoe.
18 १८ जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे.
Ɔyɛ nkwadua ma wɔn a woso ne mu; wɔn a wokura no mu no benya nhyira.
19 १९ परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला, परमेश्वराने ज्ञानाने आकाश स्थापिले.
Nyansa mu na Awurade yɛɛ asase fapem, na ntease mu na ɔde ɔsoro tim hɔ.
20 २० त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले, आणि ढग त्याचे दहिवर वर्षते.
Efi ne nimdeɛ mu na ɔkyekyɛɛ ebun mu, na omununkum nso tɔɔ obosu.
21 २१ माझ्या मुला, सुज्ञान आणि दूरदर्शीपणा ही सांभाळून ठेव, आणि ती दृष्टीआड होऊ देऊ नकोस.
Me ba, fa atemmu pa ne nhumu sie, na mma emfi wʼani so;
22 २२ ते तुझ्या आत्म्याला जीवन देतील. आणि ते तुझ्या गळ्याभोवती घालण्याचे कृपेचे अलंकार होईल.
ɛbɛyɛ nkwa ama wo, nnwinne a ɛma wo kɔn anuonyam wie pɛyɛ.
23 २३ नंतर तू आपल्या मार्गाने सुरक्षितपणे चालशील, आणि तुझ्या पायाला ठेच लागणार नाही;
Afei wo kwan so bɛyɛ wo dwoodwoo, na wo nan renhintiw;
24 २४ तू जेव्हा झोपशील, तेव्हा घाबरणार नाहीस; तू झोप घेशील तेव्हा तुझी झोप गोड होईल.
sɛ woda a worensuro; sɛ woda a wʼani bekum.
25 २५ जेव्हा दुष्टाकडून नाशधूस होईल त्यामुळे, किंवा अचानक येणाऱ्या दहशतीस घाबरू नकोस;
Nsuro mpofirim amanehunu anaa ɔsɛe a ɛba amumɔyɛfo so,
26 २६ कारण परमेश्वर तुझ्या बाजूस आहे, आणि तुझा पाय पाशात अडकण्यापासून सांभाळील.
efisɛ Awurade bɛwɔ wʼafa na ɔbɛkora wo nan afi afiri mu.
27 २७ ज्यांचे हित करणे योग्य असून ते जेव्हा तुझ्या अधिकारात असल्यास, ते करण्यापासून माघार घेऊ नकोस.
Mfa ade pa nkame wɔn a wɔfata, bere a tumi wɔ wo nsam.
28 २८ एखादी वस्तू तुझ्याजवळ असता; आपल्या शेजाऱ्यास असे म्हणू नको कि, “जा, आणि पुन्हा ये, आणि उद्या मी तुला देईन.”
Nka nkyerɛ wo yɔnko se: “Kɔ na bra; mede bɛma wo ɔkyena” wɔ bere a wowɔ no saa bere no.
29 २९ तुमच्या शेजाऱ्याला त्रास देण्याची योजना आखू नकोस. जो तुझ्याजवळ राहतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो.
Mpam ɔhaw mma wo yɔnko bere a ɔne wo te yiye.
30 ३० काही कारण नसताना तू एखाद्या मनुष्याशी वाद करू नकोस, जेव्हा त्याने तुझे काहीही वाईट केलेले नाही.
Mmɔ obi sobo kwa bere a ɔnyɛɛ wo bɔne biara ɛ.
31 ३१ तू हिंसाचारी मनुष्याचा हेवा करू नको किंवा त्याचे कोणतेही मार्ग निवडू नकोस.
Mma wʼani mmere basabasayɛfo, na mfa nʼakwan no mu biara,
32 ३२ कारण परमेश्वर कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो; परंतु सरळांना तो त्याच्या आत्मविश्वासात आणतो.
efisɛ Awurade kyi basabasayɛfo na ɔde ne werɛ hyɛ ɔtreneeni mu.
33 ३३ परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; परंतु तो नितीमानांच्या घराला आशीर्वाद देतो.
Awurade nnome wɔ omumɔyɛfo fi so, na ohyira ɔtreneeni fi.
34 ३४ तो थट्टा करणाऱ्याची थट्टा करतो, पण तो नम्रजनांस त्याची कृपा देतो.
Odi fɛwdifo a wɔyɛ ahantan no ho fɛw, na ɔdom ahobrɛasefo ne wɔn a wɔhyɛ wɔn so no.
35 ३५ ज्ञानी सन्मानाचे वतनदार होतील, पण मूर्ख त्यांच्या लज्जेत वर उचलले जातील.
Anyansafo benya anuonyam adi, nanso nkwaseafo de, ɔma wɔn anim gu ase.