< नीतिसूत्रे 28 >
1 १ जेव्हा कोणीएक पाठलाग करत नसले तरी दुर्जन दूर पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.
2 २ देशाच्या अपराधांमुळे त्याचे पुष्कळ अधिपती होतात; पण जेव्हा समंजस आणि सुज्ञानी माणसाच्या हातून त्यांची सुस्थिती दीर्घकाळ राहते.
3 ३ जो राज्य करणारा पुरुष गरिबांना जाचतो, तो काहीहीअन्न न ठेवणाऱ्या पावसासारखा आहे.
4 ४ जे कोणी नियम मोडणारे ते दुर्जनांची स्तुती करतात, पण जे नियम पाळतात ते त्यांच्याविरुद्ध लढतात.
5 ५ दुष्ट मनुष्यांना न्याय समजत नाही, पण जे परमेश्वरास शोधतात त्यांना सर्वकाही कळते.
6 ६ श्रीमंत पुरुष असून त्याचे मार्ग वाकडे असण्यापेक्षा, गरीब पुरुष असून जो त्याच्या प्रामाणिकपणात चालतो तो उत्तम आहे.
7 ७ जो कोणी मुलगा नियमाचे पालन करतो तो हुशार असतो, पण जो खादाडाचा सोबती आहे तो आपल्या वडिलांना लाज आणतो.
8 ८ जो कोणी आपले धन खूप जास्त व्याज लावून वाढवतो त्याची संपत्ती जो कोणी गरिबांवर दया करतो त्या दुसऱ्यासाठी साठवतो.
9 ९ जर एखाद्याने आपला कान नियम ऐकण्यापासून दूर फिरवला, त्याची प्रार्थनासुद्धा वीट आणणारी होईल.
10 १० जो कोणी सरळांना बहकावून वाईट मार्गाकडे नेईल, तो आपल्या स्वतःच्या खड्ड्यात पडेल, पण जे निर्दोष आहेत त्यांना चांगले वतन मिळेल.
11 ११ श्रीमंत मनुष्य आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा असतो, पण गरीब मनुष्य ज्याला समंजसपणा आहे त्यास शोधून काढतो.
12 १२ नीतिमानांचा विजय होतो तेव्हा तेथे मोठा नावलौकिक होतो, पण जेव्हा दुर्जन उठला, म्हणजे लोक स्वतः लपून बसतात.
13 १३ एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही, पण एखाद्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल.
14 १४ जर एखादा व्यक्ती वाईट करण्यात नेहमी घाबरतो तो सुखी आहे, पण जो कोणी आपले हृदय कठोर करतो तो संकटात पडतो.
15 १५ गरीब लोकांवर राज्य करणारा दुष्ट अधिकारी, गर्जणाऱ्या सिंहासारखा किंवा हल्ला करणाऱ्या अस्वलासारखा आहे.
16 १६ जो कोणी अधिकारी ज्ञानहीन असतो तो क्रूर जुलूम करणारा आहे, पण जो अप्रामाणिकपणाचा द्वेष करतो तो दिर्घायुषी होतो.
17 १७ जर एखादा मनुष्य रक्तपाताचा अपराधी आहे तर तो शवगर्तेत आश्रय शोधेल, पण त्यास कोणीही परत आणणार नाही. आणि त्यास कोणीही मदत करणार नाही.
18 १८ जो सरळ मार्गाने चालतो तो सुरक्षित राहतो, पण ज्याचे मार्ग वाकडे आहेत तो अचानक पडतो.
19 १९ जो कोणी आपली शेती स्वतः करतो त्यास विपुल अन्न मिळते, पण जो कोणी निरर्थक गोष्टींचा पाठलाग करतो त्यास विपुल दारिद्र्य येते.
20 २० विश्वासू मनुष्यास महान आशीर्वाद मिळतात, पण जो कोणी झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो त्यास शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
21 २१ पक्षपात दाखवणे हे चांगले नाही, तरी भाकरीच्या तुकड्यासाठी मनुष्य चुकीचे करील.
22 २२ कंजूस मनुष्य श्रीमंत होण्याची घाई करतो, पण आपणावर दारिद्र्य येईल हे त्यास कळत नाही.
23 २३ जो कोणी आपल्या जिभेने खोटी स्तुती करतो; त्याऐवजी जो कोणी धिक्कारतो त्यालाच नंतर अधिक अनुग्रह मिळेल.
24 २४ जो कोणी आपल्या आई वडिलांना लुटतो आणि म्हणतो “ह्यात काही पाप नाही,” पण जो कोणी नाश करतो त्याचा तो सोबती आहे.
25 २५ लोभी मनुष्य संकटे निर्माण करतो, पण जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याची भरभराट होते.
26 २६ जो कोणी आपल्या हृदयावर भरवसा ठेवतो तो मूर्ख आहे, पण जो कोणी ज्ञानात चालतो तो धोक्यापासून दूर राहतो.
27 २७ जो कोणी गरीबाला देतो त्यास कशाचीही उणीव पडणार नाही, पण जो कोणी त्यांना पाहूनदेखील न पाहिल्यासारखे करतो त्याच्यावर खूप शाप येतील.
28 २८ जेव्हा दुष्ट उठतात, माणसे स्वतःला लपवतात, पण जेव्हा दुष्ट नष्ट होतात तेव्हा नीतिमान वाढतात.