< नीतिसूत्रे 27 >

1 उद्याविषयी बढाई मारू नकोस, कारण एक दिवस काय घेऊन येईल हे तुला माहित नाही.
درباره فردای خود با غرور صحبت نکن، زیرا نمی‌دانی چه پیش خواهد آمد.
2 तुझ्या स्वतःच्या मुखाने नव्हे तर दुसऱ्याने तुझी स्तुती करावी, तुझ्याच ओठांनी नव्हे तर परक्याने तुझी स्तुती करावी,
هرگز از خودت تعریف نکن؛ بگذار دیگران از تو تعریف کنند.
3 दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वजनाने भारी असते, पण मुर्खाला डिवचणे या दोन्हीपेक्षा भारी असते.
حمل بار سنگ و ماسه سخت است، اما تحمل ناراحتیهایی که شخص نادان ایجاد می‌کند، از آن هم سختتر است.
4 क्रोधाचा क्रूरपणा आणि कोपाचा पूर पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल?
حسادت خطرناک‌تر و بی‌رحمتر از خشم و غضب است.
5 गुप्त प्रेमापेक्षा उघड निषेध चांगला आहे.
سرزنش آشکار از محبت پنهان بهتر است.
6 मित्राने केलेले घाव विश्वासू आहेत, पण शत्रू तुमची विपुलतेने चुंबणे घेतो.
زخم دوست بهتر از بوسهٔ دشمن است.
7 जो कोणी पूर्ण तृप्त आहे त्यास मधाच्या पोळाचा कंटाळा येतो, भुकेल्याला प्रत्येक कडू गोष्ट गोड आहे.
شکم سیر حتی از عسل کراهت دارد، اما برای شکم گرسنه هر چیز تلخی شیرین است.
8 जसा पक्षी आपल्या घरट्यापासून भटकतो, तसा मनुष्य जेथे कोठे राहतो तेथून चुकून भलतीकडे जातो.
کسی که از خانه‌اش دور می‌شود همچون پرنده‌ای است که از آشیانه‌اش آواره شده باشد.
9 सुगंधी द्रव्य आणि सुवास हृदय आनंदीत करतात. पण मित्राचा गोडपण त्याच्या सल्ल्यापेक्षा उत्तम आहे.
مشورت صمیمانهٔ یک دوست همچون عطری خوشبو، دلپذیر است.
10 १० स्वतःच्या आणि आपल्या वडिलांच्या मित्रांना सोडू नकोस; आणि आपल्या संकटाच्या दिवशी भावाच्या घरी जाऊ नको. दूरवरच्या आपल्या भावाकडे जाण्यापेक्षा जवळचा शेजारी चांगला आहे.
دوست خود و دوست پدرت را هرگز ترک نکن، و وقتی در تنگی هستی سراغ برادرت نرو؛ همسایهٔ نزدیک بهتر از برادر دور می‌تواند به تو کمک کند.
11 ११ माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे मन आनंदीत कर, नंतर जो कोणी माझ्यावर टीका करेल त्यास मी उत्तर देईन.
پسرم، حکمت بیاموز و دل مرا شاد کن تا بتوانم جواب کسانی را که مرا سرزنش می‌کنند، بدهم.
12 १२ शहाणा मनुष्य संकटाला पाहतो आणि स्वतःला लपवतो, पण भोळेपुढे जातात आणि त्यांना त्याची किंमत द्यावी लागते.
عاقل خطر را پیش‌بینی می‌کند و از آن اجتناب می‌نماید، ولی جاهل به سوی آن می‌رود و خود را گرفتار می‌کند.
13 १३ जो परक्याच्या कर्जासाठी पैसे ठेवून जामीन झाला आहे त्याचे वस्त्र ठेवून घे; पण जेव्हा तो व्यभिचारी स्त्रीसाठी जामीन होतो त्यास तारणादाखल ठेव.
از کسی که نزد تو ضامن شخص غریبی می‌شود، گرو بگیر.
14 १४ जो कोणी पहाटेस उठून आपल्या शेजाऱ्याला मोठ्या आवाजात आशीर्वाद देतो, तो त्यास शाप असा गणला जाईल.
اگر صبح زود با صدای بلند برای دوستت دعای خیر کرده، او را از خواب بیدار کنی، دعای تو همچون لعنت خواهد بود.
15 १५ पावसाच्या दिवसात सतत गळणारे ठिपके, भांडखोर पत्नी सारखीच आहेत.
غرغرهای زن بهانه‌گیر مثل چک‌چک آب در روز بارانی است؛
16 १६ तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वाऱ्याला ताब्यात ठेवण्यासारखे आहे, किंवा आपल्या हातात तेल पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणे.
همان‌طور که نمی‌توان از وزیدن باد جلوگیری کرد، و یا با دستهای چرب چیزی را نگه داشت، همان‌طور هم محال است بتوان از غرغر چنین زنی جلوگیری کرد.
17 १७ लोखंड लोखंडाला धारदार करते; तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा धारदार करतो.
همان‌طور که آهن، آهن را می‌تراشد، دوست نیز شخصیت دوستش را اصلاح می‌کند.
18 १८ जो कोणी अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याचे फळ खाईल. आणि तसेच जो कोणी आपल्या धन्याचे रक्षण करतो त्याचा मान होईल.
هر که درختی بپروراند از میوه‌اش نیز خواهد خورد و هر که به اربابش خدمت کند پاداش خواهد گرفت.
19 १९ जसे पाण्यात मनुष्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब जशाचे तसे दिसते, तसेच मनुष्याचे हृदय मनुष्याचे प्रतिबिंब दाखविते.
همان‌طور که انسان در آب، صورت خود را می‌بیند، در وجود دیگران نیز وجود خویش را مشاهده می‌کند.
20 २० मृतलोक आणि विनाशस्थान ही कधीही तृप्त होत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याचे डोळे कधी तृप्त होत नाही. (Sheol h7585)
همان‌طور که دنیای مردگان از بلعیدن زندگان سیر نمی‌شود، خواسته‌های انسان نیز هرگز ارضا نمی‌گردد. (Sheol h7585)
21 २१ रुप्यासाठी मूस आणि सोन्यासाठी भट्टी आहे; आणि तसे मनुष्याची स्तुतीने पारख केली जाते.
طلا و نقره را به‌وسیلۀ آتش می‌آزمایند، ولی انسان را از عکس‌العملش در برابر تعریف و تمجید دیگران می‌توان شناخت.
22 २२ जरी तू मूर्खाला कुटलेल्या धान्याबरोबर उखळात घालून मुसळाने कुटले, तरी त्याची मूर्खता त्याच्यापासून जाणार नाही.
اگر احمق را در داخل هاون هم بکوبی حماقتش از او جدا نمی‌شود.
23 २३ तू आपल्या शेरडामेंढरांना एकत्र जमून त्यांची स्थिती जाणून खात्री कर. आणि आपल्या कळपाकडे नीट लक्ष दे.
مال و دارایی زود از بین می‌رود و تاج و تخت پادشاه تا ابد برای نسل او باقی نمی‌ماند. پس تو با دقت از گله و رمه‌ات مواظبت کن،
24 २४ संपत्ती कायम टिकत नाही. मुकुट तरी सर्व पिढ्यानपिढ्या टिकेल काय?
25 २५ गवत जाते आणि पुन्हा नवीन उगवते. आणि डोंगरावरील हिरवळ कापून गुरांढोरासाठी गोळा करण्यात येते.
زیرا وقتی علوفه چیده شود و محصول جدید به بار آید و علف کوهستان جمع‌آوری شود،
26 २६ वस्त्रासाठी कोकरे आहेत, आणि बकरे शेताचे मोल आहेत.
آنگاه از پشم گوسفندانت لباس تهیه خواهی کرد، از فروش بزهایت زمین خواهی خرید
27 २७ बकरीचे दूध तुझ्या खाण्यासाठी व तुझ्या घरच्यांच्या खाण्यासाठी, आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते तुझ्याजवळ आहे.
و از شیر بقیهٔ بزها تو و خانواده و کنیزانت سیر خواهید شد.

< नीतिसूत्रे 27 >