< नीतिसूत्रे 24 >
1 १ दुर्जनांचा मत्सर करू नकोस, आणखी त्यांच्याबरोबर मैत्रीची इच्छा धरू नकोस.
Ne sekvu malbonajn homojn, Kaj ne deziru esti kun ili;
2 २ कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते, आणि त्यांचे ओठ क्लेश देण्याच्या गोष्टी बोलतात.
Ĉar ilia koro pensas pri perfortaĵo, Kaj ilia buŝo parolas malbonaĵon.
3 ३ सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; आणि समजूतदारपणाने ते स्थिर राहते.
Per saĝo konstruiĝas domo, Kaj per prudento ĝi fortikiĝas;
4 ४ ज्ञानाच्या योगे त्याच्या सर्व खोल्या मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने भरल्या जातात.
Kaj per sciado la ĉambroj pleniĝas Per ĉia havo grandvalora kaj agrabla.
5 ५ शूर मनुष्य बलवान असतो, परंतु जो कोणी बलवान आहे त्यापेक्षा ज्ञानी मनुष्य उत्तम आहे.
Homo saĝa havas forton, Kaj homo prudenta estas potenca.
6 ६ कारण शहाणपणाचे मार्गदर्शन घेऊन तू युध्द चालू करू शकतो; आणि पुष्कळ सल्लागारबरोबर असल्याने विजय मिळतो.
Kun pripenso faru militon; Kaj venko venas per multe da konsilantoj.
7 ७ मूर्खासाठी ज्ञान अति उंच आहे; वेशीत तो आपले तोंड उघडतो.
Tro alta estas la saĝo por malsaĝulo; Ĉe la pordego li ne malfermos sian buŝon.
8 ८ जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजितो, लोक त्यास योजनेचा गुरू म्हणतात.
Kiu intencas fari malbonon, Tiun oni nomas maliculo.
9 ९ मूर्खाची योजना पाप असते, निंदकाचा मनुष्यांना तिटकारा येतो.
Malico de malsaĝulo estas peko; Kaj blasfemanto estas abomenaĵo por homo.
10 १० जर तुम्ही संकटाच्या दिवशी तुमचा भित्रेपणा दाखवला तर, मग तुझी शक्ती थोडीच आहे.
Se vi montriĝis malforta en tago de mizero, Via forto estas ja malgranda.
11 ११ ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर घेऊन जात असतील तर त्यांना वाचव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा होईल तितका प्रयत्न कर.
Savu tiujn, kiujn oni prenis por mortigi, Kaj ne fortiriĝu de tiuj, kiuj estas kondamnitaj al morto.
12 १२ जर तू म्हणशील, “तेथे! आम्हांस ह्याबद्दल काहीच माहित नव्हते.” तर तू काय म्हणतो हे जो कोणी हृदये तोलून पाहतो त्यास हे समजणार नाही का? आणि जो कोणी तुझ्या जिवाचे रक्षण करतो त्यास माहित नाही का? आणि देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही कां?
Se vi diras: Ni tion ne sciis, La esploranto de koroj ja komprenas, Kaj la gardanto de via animo ja scias, Kaj Li redonas al homo laŭ liaj faroj.
13 १३ माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे, कारण मधाच्या पोळ्यातून टिपकणारा मध तुझ्या जिभेला गोड आहे.
Manĝu, mia filo, mielon, ĉar ĝi estas bona; Kaj la mieltavolo estas dolĉa por via gorĝo;
14 १४ त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जिवासाठी आहे; जर तुला ते प्राप्त झाले, तर तेथे भविष्य आहे, आणि तुझी आशा कधीही तोडली जाणार नाही.
Tia estas por via animo la sciado de saĝo, se vi ĝin trovis, Kaj ekzistas estonteco, kaj via espero ne pereos.
15 १५ अरे दुष्टा, नीतिमानाच्या घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस. त्याच्या घराचा नाश करू नको!
Ne insidu, ho malvirtulo, kontraŭ la domo de virtulo; Ne ataku lian ripozejon;
16 १६ कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी, तो पुन्हा उठतो, पण दुर्जनांचा संकटात विध्वंस होईल.
Ĉar sep fojojn virtulo falos, kaj tamen leviĝos; Sed malvirtuloj implikiĝas en la malfeliĉo.
17 १७ तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस, आणि जेव्हा तो अडखळतो तेव्हा तुझे मन आनंदीत होऊ देऊ नको.
Kiam falas via malamiko, ne ĝoju, Kaj ĉe lia malfeliĉo via koro ne plezuriĝu;
18 १८ उल्लासले तर परमेश्वर ते बघेल आणि त्यास ते आवडणार नाही आणि तो आपला क्रोध त्याच्यापासून फिरवेल.
Ĉar eble la Eternulo vidos, kaj tio ne plaĉos al Li, Kaj Li returnos de li Sian koleron.
19 १९ जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको, आणि दुष्टांचा मत्सर करू नको.
Ne koleru kontraŭ malbonfarantoj, Kaj ne enviu la malvirtulojn;
20 २० कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही दुष्टांचा दिप मालवला जाईल.
Ĉar la malbonulo ne havos estontecon; La lumilo de malvirtuloj estingiĝos.
21 २१ माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग. जे त्यांच्या विरुध्द बंड करीत आहेत त्यामध्ये सामील होऊ नकोस.
Timu, mia filo, la Eternulon kaj la reĝon; Kun ribeluloj ne komunikiĝu.
22 २२ कारण त्यांच्यावर अचानक विपत्ती येईल, आणि त्यांच्या वर्षाचा नाश त्या दोघांकडून केव्हा होईल कोण जाणे?
Ĉar subite venos ilia pereo; Kaj kiu scias, kiam venos la puno de ambaŭ?
23 २३ हेही शहाण्या मनुष्याचे शब्द आहेत. न्यायात पक्षपात करणे चांगले नाही.
Ankaŭ ĉi tio estas vortoj de saĝuloj: Konsideri personojn ĉe juĝado estas ne bone.
24 २४ जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस; तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील.
Kiu diras al malvirtulo: Vi estas virtulo, Tiun malbenos popoloj, tiun malamos gentoj.
25 २५ पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल, आणि त्यांच्यावर उत्तम आशीर्वाद येईल.
Sed kiuj faras riproĉojn, tiuj plaĉas, Kaj sur ilin venos bona beno.
26 २६ जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो तो ओठांचे चुंबन देतो.
Kiu respondas ĝustajn vortojn, Tiu kisas per la lipoj.
27 २७ तू आपले बाहेरचे काम आधी कर, आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर, आणि मग आपले घर बांध.
Plenumu vian laboron ekstere, Pretigu ĉion sur via kampo; Kaj poste aranĝu vian domon.
28 २८ निष्कारण आपल्या शेजाऱ्याविरूद्ध साक्ष देऊ नको, आणि आपल्या वाणीने फसवू नको.
Ne atestu sen kaŭzo kontraŭ via proksimulo; Ĉu vi trompus per via buŝo?
29 २९ “त्याने जसे मला केले तसे मी त्यास करीन. मी त्यास त्याच्या करण्याप्रमाणे भरून देईन.” असे म्हणू नको.
Ne diru: Kiel li agis kontraŭ mi, tiel mi agos kontraŭ li; Mi redonos al la homo laŭ lia faro.
30 ३० मी आळशी मनुष्याच्या शेताजवळून, मी बुद्धिहीन मनुष्याच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो.
Mi pasis tra kampo de homo maldiligenta Kaj tra vinberĝardeno de sensaĝulo;
31 ३१ तेव्हा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती, त्याची जमीन खाजकुइरीने झाकली होती, आणि त्याची दगडी भिंत मोडून पडली होती.
Kaj jen ĉie elkreskis urtiko, Ĉio estas kovrita de dornoj, Kaj la ŝtona muro estas detruita.
32 ३२ मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो.
Kaj kiam mi vidis, mi prenis ĝin en mian koron, Mi rigardis, kaj ricevis instruon:
33 ३३ “थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.”
Iom da dormo, iom da dormeto, Iom da kunmeto de la manoj por kuŝado;
34 ३४ आणि दारिद्र्य लुटारूसारखे, आणि तुझी गरज तुझ्यावर हत्यारबंद सैन्यासारखी येईल.
Kaj venos via malriĉeco kiel rabisto, Kaj via senhaveco kiel viro armita.