< नीतिसूत्रे 24 >

1 दुर्जनांचा मत्सर करू नकोस, आणखी त्यांच्याबरोबर मैत्रीची इच्छा धरू नकोस.
Be not thou envious of wicked men, neither crave to be with them;
2 कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते, आणि त्यांचे ओठ क्लेश देण्याच्या गोष्टी बोलतात.
For, violence, their heart muttereth, and, mischief, their lips do speak.
3 सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; आणि समजूतदारपणाने ते स्थिर राहते.
In wisdom, is a house builded, and, in understanding, is it established;
4 ज्ञानाच्या योगे त्याच्या सर्व खोल्या मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने भरल्या जातात.
And, in knowledge, chambers are filled, with all acquisitions, costly and fair.
5 शूर मनुष्य बलवान असतो, परंतु जो कोणी बलवान आहे त्यापेक्षा ज्ञानी मनुष्य उत्तम आहे.
A wise man, is mighty, and, a man of knowledge, becometh alert in vigour.
6 कारण शहाणपणाचे मार्गदर्शन घेऊन तू युध्द चालू करू शकतो; आणि पुष्कळ सल्लागारबरोबर असल्याने विजय मिळतो.
Surely, with concerted measures, shalt thou make for thyself war, and, success, lieth in the greatness of the counsellor.
7 मूर्खासाठी ज्ञान अति उंच आहे; वेशीत तो आपले तोंड उघडतो.
Unattainable to a foolish man, are the dictates of wisdom, in the gate, he openeth not his mouth.
8 जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजितो, लोक त्यास योजनेचा गुरू म्हणतात.
He that deviseth to do mischief, him, shall men call, a master of plots.
9 मूर्खाची योजना पाप असते, निंदकाचा मनुष्यांना तिटकारा येतो.
The purpose of folly, is sin, and, an abomination to mankind, is a buffoon.
10 १० जर तुम्ही संकटाच्या दिवशी तुमचा भित्रेपणा दाखवला तर, मग तुझी शक्ती थोडीच आहे.
Thou hast been slothful in the day of straitness, Strait, is thy strength.
11 ११ ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर घेऊन जात असतील तर त्यांना वाचव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा होईल तितका प्रयत्न कर.
Deliver thou such as are being led forth to death, and, them who are tottering to slaughter, oh that thou wouldst hold back!
12 १२ जर तू म्हणशील, “तेथे! आम्हांस ह्याबद्दल काहीच माहित नव्हते.” तर तू काय म्हणतो हे जो कोणी हृदये तोलून पाहतो त्यास हे समजणार नाही का? आणि जो कोणी तुझ्या जिवाचे रक्षण करतो त्यास माहित नाही का? आणि देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही कां?
Though thou say, Lo! we knew not this, Shall not, he that proveth hearts, himself, discern? And, he that formeth thy soul, himself, know? and bring back to a son of earth according to his deed?
13 १३ माझ्या मुला, मध खा, कारण तो चांगला आहे, कारण मधाच्या पोळ्यातून टिपकणारा मध तुझ्या जिभेला गोड आहे.
My son, eat thou honey, because it is good, —and droppings from the comb [because they are] sweet to thy palate:
14 १४ त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जिवासाठी आहे; जर तुला ते प्राप्त झाले, तर तेथे भविष्य आहे, आणि तुझी आशा कधीही तोडली जाणार नाही.
Thus, take knowledge of wisdom, for thine own soul; If thou find it, then there is a future, and, thine expectation, shall not be cut off.
15 १५ अरे दुष्टा, नीतिमानाच्या घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस. त्याच्या घराचा नाश करू नको!
Do not lie in wait, thou lawless man, against the home of the righteous, —neither destroy thou his place of rest;
16 १६ कारण जर कोणी मनुष्य चांगले करतो तो सात वेळा पडला तरी, तो पुन्हा उठतो, पण दुर्जनांचा संकटात विध्वंस होईल.
For, seven times, may the righteous fall and yet arise, but, lawless men, shall stumble into calamity.
17 १७ तुझा शत्रू पडला असता उत्सव करू नकोस, आणि जेव्हा तो अडखळतो तेव्हा तुझे मन आनंदीत होऊ देऊ नको.
When thine enemy falleth, do not thou rejoice, and, when he stumbleth, let not thy heart exult:
18 १८ उल्लासले तर परमेश्वर ते बघेल आणि त्यास ते आवडणार नाही आणि तो आपला क्रोध त्याच्यापासून फिरवेल.
Lest Yahweh see it, and it be wicked in his eyes, and he turn away from him his anger.
19 १९ जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको, आणि दुष्टांचा मत्सर करू नको.
Burn not with vexation against evil doers, be not envious of lawless men;
20 २० कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही दुष्टांचा दिप मालवला जाईल.
For there shall be no future for the wicked, The lamp of the lawless, shall go out.
21 २१ माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग. जे त्यांच्या विरुध्द बंड करीत आहेत त्यामध्ये सामील होऊ नकोस.
Revere thou Yahweh, my son, and the king, and, with the fickle, have thou no fellowship;
22 २२ कारण त्यांच्यावर अचानक विपत्ती येईल, आणि त्यांच्या वर्षाचा नाश त्या दोघांकडून केव्हा होईल कोण जाणे?
For, suddenly, shall arise their calamity; and, the misfortune of their years, who knoweth?
23 २३ हेही शहाण्या मनुष्याचे शब्द आहेत. न्यायात पक्षपात करणे चांगले नाही.
These things also, concern the wise, To take note of faces in judgment, is not good.
24 २४ जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस; तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील.
He that saith to the lawless man, Righteous, thou art, peoples shall denounce him, populations shall curse him;
25 २५ पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल, आणि त्यांच्यावर उत्तम आशीर्वाद येईल.
But, to reprovers, one should be pleasant, and, upon them, should come an excellent blessing:
26 २६ जो कोणी प्रामाणिकपणे उत्तर देतो तो ओठांचे चुंबन देतो.
Lips, should one kiss with one who answereth in right words.
27 २७ तू आपले बाहेरचे काम आधी कर, आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर, आणि मग आपले घर बांध.
Prepare, in the open, thy work, and make ready, in the field, for thyself, Afterwards, shalt thou build thy house.
28 २८ निष्कारण आपल्या शेजाऱ्याविरूद्ध साक्ष देऊ नको, आणि आपल्या वाणीने फसवू नको.
Do not become a needless witness against thy neighbour, so mightest thou open too wide thy lips:
29 २९ “त्याने जसे मला केले तसे मी त्यास करीन. मी त्यास त्याच्या करण्याप्रमाणे भरून देईन.” असे म्हणू नको.
Do not say—According to what he hath done to me, so, will I do to him, I will repay every one according to his work.
30 ३० मी आळशी मनुष्याच्या शेताजवळून, मी बुद्धिहीन मनुष्याच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो.
By the field of the sluggard, I passed, and by the vineyard of a man lacking sense;
31 ३१ तेव्हा त्या सर्वांवर काटेरी झाडे वाढली होती, त्याची जमीन खाजकुइरीने झाकली होती, आणि त्याची दगडी भिंत मोडून पडली होती.
And lo! there had come up all over it—thorns, there had covered the face thereof—thistles, and, the stone fence thereof, had been thrown down.
32 ३२ मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो.
So I observed it, for myself, I applied my heart, I looked—I accepted correction:
33 ३३ “थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.”
A little sleep, a little slumber, a little folding of the hands to rest:
34 ३४ आणि दारिद्र्य लुटारूसारखे, आणि तुझी गरज तुझ्यावर हत्यारबंद सैन्यासारखी येईल.
So shall come in, as a highwayman, thy poverty, and, thy want, as one armed with a shield.

< नीतिसूत्रे 24 >