< नीतिसूत्रे 22 >

1 चांगले नाव विपुल धनापेक्षा आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे.
نیکنامی برتر از ثروت هنگفت است و محبوبیت گرانبهاتر از طلا و نقره.
2 गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे, त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे.
دارا و ندار یک وجه مشترک دارند: هر دوی آنها را خداوند آفریده است.
3 शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात.
شخص زیرک خطر را پیش‌بینی می‌کند و از آن اجتناب می‌نماید ولی آدم جاهل به سوی آن می‌رود و خود را گرفتار می‌سازد.
4 परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान आणि जीवन आणते.
ثمرهٔ تواضع و خداترسی، ثروت و احترام و عمر طولانی است.
5 कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात; जो कोणी आपल्या जिवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो.
راه اشخاص فاسد از خارها و دامها پوشیده است، پس اگر جان خود را دوست داری از رفتن به راه آنها خودداری کن.
6 मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
بچه را در راهی که باید برود تربیت کن و او تا آخر عمر از آن منحرف نخواهد شد.
7 श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो, आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे.
فقیر اسیر ثروتمند است و قرض گیرنده غلام قرض دهنده.
8 जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, आणि त्याच्या क्रोधाची काठी तूटून जाईल.
هر که ظلم بکارد مصیبت درو خواهد کرد و قدرتش در هم خواهد شکست.
9 जो उदार दृष्टीचा आहे तो आशीर्वादित होईल कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो.
شخص سخاوتمندی که غذای خود را با فقرا تقسیم می‌کند، برکت خواهد یافت.
10 १० निंदकाला घालवून दे म्हणजे भांडणे मिटतात, मतभेद आणि अप्रतिष्ठा संपून जातील.
مسخره کننده را بیرون بینداز تا نزاع و مجادله و فحاشی خاتمه یابد.
11 ११ ज्याला मनाची शुद्धता आवडते, आणि ज्याची वाणी कृपामय असते; अशांचा मित्र राजा असतो.
اگر کسی پاکی قلب را دوست بدارد و سخنانش دلنشین باشد، حتی پادشاه نیز دوست او خواهد شد.
12 १२ परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत, परंतु तो विश्वासघातक्यांची वचने उलथून टाकतो.
خداوند آدمهای درستکار را محفوظ نگه می‌دارد، اما نقشه‌های بدکاران را باطل می‌کند.
13 १३ आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे! मी उघड्या जागेवर ठार होईल.”
آدم تنبل در خانه می‌ماند و می‌گوید: «اگر بیرون بروم شیر مرا می‌خورد.»
14 १४ व्यभिचारी स्त्रियांचे तोंड खोल खड्डा आहे; ज्या कोणाच्याविरूद्ध परमेश्वराचा कोप भडकतो तो त्यामध्ये पडतो.
سخنان زن بدکار مانند یک دام خطرناک است و هر که مورد غضب خداوند باشد در آن می‌افتد.
15 १५ बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील.
حماقت در وجود کودک نهفته است، ولی چوب تأدیب آن را از او بیرون می‌کند.
16 १६ जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो, किंवा जो धनवानाला भेटी देतो, तोही गरीब होईल.
کسی که به خاطر نفع خودش به فقرا ظلم کند و به ثروتمندان هدیه دهد، عاقبت گرفتار فقر خواهد شد.
17 १७ ज्ञानाची वचने ऐकून घे आणि त्याकडे लक्ष दे, आणि आपले मन माझ्या ज्ञानाकडे लाव.
به این سخنان مردان حکیم که به تو یاد می‌دهم گوش فرا ده و با تمام وجود از آنها پیروی کن؛
18 १८ कारण ती जर तू आपल्या अंतर्यामात ठेवशील, आणि ती सर्व तुझ्या ओठावर तयार राहतील. तर किती बरे होईल.
زیرا حفظ کردن آنها در دل و قرار دادن آنها بر زبان، کار پسندیده‌ای است.
19 १९ परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून मी तुला ती वचने आज शिकवली आहेत.
این سخنان را امروز به تو تعلیم می‌دهم تا اعتماد تو بر خداوند باشد.
20 २० मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान ह्यातल्या तीस म्हणी लिहिल्या नाहीत काय?
این کلمات گزیده را که مملو از حکمت و اندرز است، برای تو نوشته‌ام
21 २१ या सत्याच्या वचनाचे विश्वासूपण तुला शिकवावे, ज्याने तुला पाठवले त्यास विश्वासाने उत्तरे द्यावीत म्हणून नाहीत काय?
تا حقیقت را آنچنان که هست به تو یاد دهم و تو نیز آن را به کسانی که از تو سؤال می‌کنند، بیاموزی.
22 २२ गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस.
اموال شخص فقیر را که حامی ندارند، غارت نکن و حق بیچارگان را در دادگاه پایمال ننما؛
23 २३ कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल, आणि ज्या कोणी त्यांना लुटले त्यांचे जिवन तो लुटेल.
زیرا خداوند به داد ایشان خواهد رسید و کسانی را که به ایشان ظلم کرده‌اند به سزای اعمالشان خواهد رسانید.
24 २४ जो कोणी एक व्यक्ती रागाने राज्य करतो त्याची मैत्री करू नकोस, आणि जो कोणी संतापी आहे त्याच्याबरोबर जाऊ नकोस.
با اشخاص تندخو که زود خشمگین می‌شوند معاشرت نکن،
25 २५ तुम्ही त्याचे मार्ग शिकाल, आणि गेलात तर तुम्ही स्वतःला जाळ्यात अडकवून घ्याल.
مبادا مثل آنها شوی و زندگی خود را تباه کنی.
26 २६ दुसऱ्याच्या कर्जाला जे जामीन होतात, आणि हातावर हात मारणारे त्यांच्यातला तू एक होऊ नको.
ضامن دیگری نشو و تعهد نکن که او قرض خود را پس خواهد داد،
27 २७ जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यास काही नसले, तर त्याने तुमच्या अंगाखालून तुझे अंथरुण का काढून घ्यावे?
زیرا اگر مجبور به پرداخت قرض او شوی و نتوانی آن را بپردازی، رختخوابت را از زیرت بیرون می‌کشند.
28 २८ तुझ्या वडिलांनी जी प्राचीन सीमा घालून ठेवली आहे, तो दगड दूर करू नकोस.
حدود ملک خود را که اجدادت از قدیم آن را تعیین کرده‌اند، به نفع خود تغییر نده.
29 २९ जो आपल्या कामात तरबेज अशा मनुष्यास तू पाहिले आहे का? तो राजासमोर उभा राहील; तो सामान्य लोकांसमोर उभा राहणार नाही.
اگر کسی در کار خود ماهر باشد، بدان که جزو افراد گمنام نخواهد ماند، بلکه به دربار پادشاهان راه خواهد یافت.

< नीतिसूत्रे 22 >