< नीतिसूत्रे 22 >
1 १ चांगले नाव विपुल धनापेक्षा आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे.
Dobro je ime bolje od velika bogatstva, i bolja je naklonost od srebra i zlata.
2 २ गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे, त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे.
Bogataš se i siromah sreću: obojicu ih Jahve stvori.
3 ३ शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात.
Pametan čovjek vidi zlo i skrije se, a glupaci idu bezbrižno i trpe kaznu.
4 ४ परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान आणि जीवन आणते.
Nagrada je poniznosti strah Gospodnji, bogatstvo, čast i život.
5 ५ कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात; जो कोणी आपल्या जिवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो.
Trnje i zamke su na putu varalici: tko čuva život svoj, daleko je od oboga.
6 ६ मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
Upućuj dijete prema njegovu putu, pa kad i ostari, neće odstupiti od njega.
7 ७ श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो, आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे.
Bogataš vlada nad siromasima, a dužnik je sluga vjerovniku.
8 ८ जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, आणि त्याच्या क्रोधाची काठी तूटून जाईल.
Tko sije nepravdu, žanje nesreću, i šiba njegova gnjeva udarit će njega samog.
9 ९ जो उदार दृष्टीचा आहे तो आशीर्वादित होईल कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो.
Milostivo se oko blagoslivlje, jer daje od svog kruha siromahu.
10 १० निंदकाला घालवून दे म्हणजे भांडणे मिटतात, मतभेद आणि अप्रतिष्ठा संपून जातील.
Otjeraj podsmjevača i prestat će svađe i nestat će nesloga i pogrda.
11 ११ ज्याला मनाची शुद्धता आवडते, आणि ज्याची वाणी कृपामय असते; अशांचा मित्र राजा असतो.
Jahve ljubi čisto srce, i tko je ljubeznih usana, kralj mu je prijatelj.
12 १२ परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत, परंतु तो विश्वासघातक्यांची वचने उलथून टाकतो.
Pogled Jahvin čuva znanje, Jahve pomućuje riječi bezbožnika.
13 १३ आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे! मी उघड्या जागेवर ठार होईल.”
Lijenčina veli: “Lav je vani, nasred trga poginuo bih.”
14 १४ व्यभिचारी स्त्रियांचे तोंड खोल खड्डा आहे; ज्या कोणाच्याविरूद्ध परमेश्वराचा कोप भडकतो तो त्यामध्ये पडतो.
Duboka jama usta su preljubnice, i na koga se Jahve srdi, pada onamo.
15 १५ बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील.
Ludost prianja uza srce djetinje: šiba pouke otklanja je od njega.
16 १६ जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो, किंवा जो धनवानाला भेटी देतो, तोही गरीब होईल.
Tko tlači siromaha, taj mu koristi; tko daje bogatašu, samo mu šteti.
17 १७ ज्ञानाची वचने ऐकून घे आणि त्याकडे लक्ष दे, आणि आपले मन माझ्या ज्ञानाकडे लाव.
Riječi mudraca: Prigni uho svoje i čuj riječi moje i upravi svoje srce mojem znanju,
18 १८ कारण ती जर तू आपल्या अंतर्यामात ठेवशील, आणि ती सर्व तुझ्या ओठावर तयार राहतील. तर किती बरे होईल.
jer milina je ako ih čuvaš u nutrini svojoj, i kad ti budu sve spremne na usnama tvojim.
19 १९ परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून मी तुला ती वचने आज शिकवली आहेत.
Da bi uzdanje tvoje bilo u Jahvi, upućujem danas i tebe.
20 २० मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान ह्यातल्या तीस म्हणी लिहिल्या नाहीत काय?
Napisah ti trideset što savjeta što pouka
21 २१ या सत्याच्या वचनाचे विश्वासूपण तुला शिकवावे, ज्याने तुला पाठवले त्यास विश्वासाने उत्तरे द्यावीत म्हणून नाहीत काय?
da te poučim riječima istine, da uzmogneš pouzdanim riječima odgovoriti onomu tko te zapita.
22 २२ गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस.
Nemoj pljačkati siromaha zato što je siromah i ne gazi ubogoga na sudu.
23 २३ कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल, आणि ज्या कोणी त्यांना लुटले त्यांचे जिवन तो लुटेल.
Jer će Jahve parbiti parbu njihovu i otet će život onima koji ga njima otimlju.
24 २४ जो कोणी एक व्यक्ती रागाने राज्य करतो त्याची मैत्री करू नकोस, आणि जो कोणी संतापी आहे त्याच्याबरोबर जाऊ नकोस.
Ne druži se sa srditim i ne idi s čovjekom jedljivim
25 २५ तुम्ही त्याचे मार्ग शिकाल, आणि गेलात तर तुम्ही स्वतःला जाळ्यात अडकवून घ्याल.
da se ne bi privikao na staze njegove i namjestio zamku duši svojoj.
26 २६ दुसऱ्याच्या कर्जाला जे जामीन होतात, आणि हातावर हात मारणारे त्यांच्यातला तू एक होऊ नको.
Ne budi među onima koji daju ruku, koji jamče za dugove:
27 २७ जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यास काही नसले, तर त्याने तुमच्या अंगाखालून तुझे अंथरुण का काढून घ्यावे?
ako nemaš čime nadoknaditi, zašto da ti oduzmu i postelju ispod tebe?
28 २८ तुझ्या वडिलांनी जी प्राचीन सीमा घालून ठेवली आहे, तो दगड दूर करू नकोस.
Ne pomiči prastare međe koju su postavili oci tvoji.
29 २९ जो आपल्या कामात तरबेज अशा मनुष्यास तू पाहिले आहे का? तो राजासमोर उभा राहील; तो सामान्य लोकांसमोर उभा राहणार नाही.
Jesi li vidio čovjeka vična poslu svom: takav ima pristup kraljevima i ne služi prostacima.