< नीतिसूत्रे 21 >
1 १ राजाचे मन पाण्याच्या प्रवाहासारखे परमेश्वराच्या हातात आहे; तो त्यास वाटेल तेथे वळवतो.
王的心在耶和華手中, 好像隴溝的水隨意流轉。
2 २ प्रत्येक मनुष्याचे मार्ग त्याच्या दृष्टीने योग्य असतात, परंतु परमेश्वर अंतःकरणे तोलून पाहतो.
人所行的,在自己眼中都看為正; 惟有耶和華衡量人心。
3 ३ योग्य व न्याय करणे हे यज्ञापेक्षा परमेश्वरास अधिक मान्य आहेत.
行仁義公平 比獻祭更蒙耶和華悅納。
4 ४ घमेंडखोर दृष्टी व गर्विष्ठ मन दुर्जनांच्या शेतातील उपज हे पाप उत्पन्न करतात.
惡人發達,眼高心傲, 這乃是罪。
5 ५ परीश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते, परंतु जो घाईघाईने कृती करतो तो केवळ दरिद्री होतो.
殷勤籌劃的,足致豐裕; 行事急躁的,都必缺乏。
6 ६ लबाड जिव्हेने मिळवलेली संपत्ती ही वाफेसारखी क्षणभंगुर आहे ती मरण शोधते.
用詭詐之舌求財的,就是自己取死; 所得之財乃是吹來吹去的浮雲。
7 ७ दुष्टांचा बलात्कार त्यांना झाडून टाकील, कारण ते न्याय करण्याचे नाकारतात.
惡人的強暴必將自己掃除, 因他們不肯按公平行事。
8 ८ अपराधी मनुष्याचा मार्ग वाकडा असतो, पण जो शुद्ध आहे तो योग्य करतो.
負罪之人的路甚是彎曲; 至於清潔的人,他所行的乃是正直。
9 ९ भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहाण्यापेक्षा, धाब्याच्या कोपऱ्यात राहणे अधिक चांगले.
寧可住在房頂的角上, 不在寬闊的房屋與爭吵的婦人同住。
10 १० दुष्टाचा जीव वाईटाची हाव धरतो; त्याच्या शेजाऱ्याला तो दया दाखवत नाही.
惡人的心樂人受禍; 他眼並不憐恤鄰舍。
11 ११ जेव्हा निंदकास शासन होते तेव्हा अज्ञानी शहाणे होतात; आणि जेव्हा सुज्ञास शिक्षण मिळते तेव्हा त्याच्या ज्ञानात वाढ होते.
褻慢的人受刑罰,愚蒙的人就得智慧; 智慧人受訓誨,便得知識。
12 १२ नीतिमान दुष्टाच्या घराकडे लक्ष लावतो, तो दुष्टांचा नाश करण्यासाठी त्यांना उलथून टाकतो.
義人思想惡人的家, 知道惡人傾倒,必致滅亡。
13 १३ जो कोणी गरिबाची आरोळी ऐकत नाही, तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही.
塞耳不聽窮人哀求的, 他將來呼籲也不蒙應允。
14 १४ गुप्तपणे दिलेली देणगी राग शांत करते, आणि दडवलेली देणगी तीव्र कोप दूर करते.
暗中送的禮物挽回怒氣; 懷中搋的賄賂止息暴怒。
15 १५ योग्य न्यायाने नीतिमानाला आनंद होतो. पण तोच दुष्कर्म करणाऱ्यांवर फार मोठी भीती आणतो.
秉公行義使義人喜樂, 使作孽的人敗壞。
16 १६ जो कोणी ज्ञानाच्या मार्गापासून भटकतो, त्यास मरण पावलेल्यांच्या मंडळीत विसावा मिळेल.
迷離通達道路的, 必住在陰魂的會中。
17 १७ ज्याला ख्यालीखुशाली प्रिय आहे तो दरिद्री होतो; ज्याला द्राक्षरस आणि तेल प्रिय आहे तो श्रीमंत होणार नाही.
愛宴樂的,必致窮乏; 好酒,愛膏油的,必不富足。
18 १८ जो कोणी चांगले करतो त्याची खंडणी दुर्जन आहे, आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो.
惡人作了義人的贖價; 奸詐人代替正直人。
19 १९ भांडखोर आणि खूप तक्रार करून अशांती निर्माण करणाऱ्या पत्नीबरोबर राहाण्यापेक्षा वाळवंटात राहाणे अधिक चांगले.
寧可住在曠野, 不與爭吵使氣的婦人同住。
20 २० सुज्ञाच्या घरात मोलवान खजिना आणि तेल आहेत, पण मूर्ख मनुष्य ते वाया घालवतो.
智慧人家中積蓄寶物膏油; 愚昧人隨得來隨吞下。
21 २१ जो कोणी नीतिमत्ता आणि दया करतो, त्यास आयुष्य, उन्नती आणि मान मिळेल.
追求公義仁慈的, 就尋得生命、公義,和尊榮。
22 २२ सुज्ञ मनुष्य बलवानांच्या नगराविरूद्ध चढतो, आणि तो त्यांच्या संरक्षणाचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो.
智慧人爬上勇士的城牆, 傾覆他所倚靠的堅壘。
23 २३ जो कोणी आपले तोंड व जीभ सांभाळतो, तो संकटापासून आपला जीव वाचवतो.
謹守口與舌的, 就保守自己免受災難。
24 २४ गर्विष्ठ व घमेंडखोर मनुष्यास उद्दाम असे नाव आहे. तो गर्वाने उद्धट कृती करतो.
心驕氣傲的人名叫褻慢; 他行事狂妄,都出於驕傲。
25 २५ आळशाची वासना त्यास मारून टाकते; त्याचे हात काम करण्यास नकार देतात.
懶惰人的心願將他殺害, 因為他手不肯做工。
26 २६ तो सर्व दिवस हाव आणि अधिक हाव धरतो, परंतु नीतिमान देतो आणि मागे धरून ठेवत नाही.
有終日貪得無饜的; 義人施捨而不吝惜。
27 २७ दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते, तर मग तो यज्ञ दुष्ट हेतूने आणतो ते किती अधिक वीट असे आहे.
惡人的祭物是可憎的; 何況他存惡意來獻呢?
28 २८ खोटा साक्षीदार नाश पावेल, पण जो कोणी ऐकतो त्याप्रमाणे सर्व वेळ तसे बोलतो.
作假見證的必滅亡; 惟有聽真情而言的,其言長存。
29 २९ दुष्ट मनुष्य आपले मुख धीट करतो, पण सरळ मनुष्य आपल्या मार्गाचा नीट विचार करतो.
惡人臉無羞恥; 正直人行事堅定。
30 ३० परमेश्वराविरूद्ध शहाणपण, बुद्धि किंवा युक्ती ही मुळीच उभी राहू शकत नाहीत.
沒有人能以智慧、聰明、 謀略敵擋耶和華。
31 ३१ लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात, पण तारण परमेश्वराकडून आहे.
馬是為打仗之日預備的; 得勝乃在乎耶和華。