< नीतिसूत्रे 19 >

1 ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे.
Ohiani a ne nantew ho nni asɛm no ye sen ɔkwasea a nʼasɛm mfa kwan mu.
2 ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही, आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो.
Mmɔdemmɔ a nimdeɛ nka ho no nye, saa ara na ntɛmpɛ a ɛma obi yera kwan nso nye.
3 मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो, आणि त्याचे मन परमेश्वराविरूद्ध संतापते.
Onipa agyimisɛm sɛe nʼabrabɔ, nanso ne koma huru tia Awurade.
4 संपत्ती खूप मित्रांची भर घालते, पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात.
Ahonya frɛfrɛ nnamfonom bebree; nanso ohiani adamfo gyaw no hɔ.
5 खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही.
Adansekurumni benya nʼakatua, na nea otwa nkontompo remfa ne ho nni.
6 उदार मनुष्यापासून पुष्कळ लोक मदतीसाठी विचारणा करतात; आणि जो कोणी दान देतो त्याचा प्रत्येकजण मित्र आहे.
Nnipa pii pɛ adom fi sodifo nkyɛn, na nea ɔkyɛ ade yɛ obiara adamfo.
7 गरीब मनुष्याचे सर्व बंधू त्याचा द्वेष करतात, तर मग त्याचे मित्र त्याच्यापासून किती तरी दूर जाणार! तो बोलत त्यांच्या पाठोपाठ जातो पण ते निघून जातात.
Ohiani abusuafo nyinaa po no, na saa ara na ne nnamfonom po no! Mpo ɔhwehwɛ wɔn, pɛ sɛ ɔpa wɔn kyɛw, nanso onhu wɔn baabiara.
8 जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो, जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल.
Nea onya nyansa no dɔ ne kra; nea ɔpɛ nhumu no nya nkɔso.
9 खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल.
Adansekurumni benya asotwe, na nea otwa nkontompo no bɛyera.
10 १० मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही, तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते.
Ɛmfata sɛ ɔkwasea bedi taamu, anaasɛ akoa bedi mmapɔmma so!
11 ११ बुद्धीने मनुष्य रागास मंद होतो, आणि अपराधाकडे दुर्लक्ष करणे त्याची शोभा आहे.
Onipa nyansa ma no ntoboase; ɛyɛ anuonyam ma obi sɛ obebu nʼani gu mfomso bi so.
12 १२ राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे.
Ɔhene abufuw te sɛ gyata mmubomu, na nʼadom te sɛ sare so bosu.
13 १३ मूर्ख मुलगा आपल्या वडिलांना अरिष्टासारखा आहे; आणि भांडखोर पत्नी सतत गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे.
Ɔba kwasea yɛ nʼagya ɔsɛe, ɔyere tɔkwapɛfo te sɛ ɔdan a ne nwini to ntwa da.
14 १४ घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे, पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे.
Afi ne ahonyade yɛ agyapade a efi awofo, na ɔyere nimdefo fi Awurade.
15 १५ आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.
Akwadworɔ de nnahɔɔ ba, na ɔkɔm de ɔkwadwofo.
16 १६ जो कोणी आज्ञा पाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, पण जो मनुष्य आपल्या मार्गाविषयी विचार करत नाही तो मरेल.
Nea odi nkyerɛkyerɛ so no bɔ ne nkwa ho ban, na nea ogyaagyaa ne ho no bewu.
17 १७ जो कोणी गरीबावर दया करतो तो परमेश्वरास उसने देतो, आणि तो त्याने जे काही केले त्याची परतफेड करील.
Nea ɔyɛ adɔe ma ohiani no yɛ de fɛm Awurade, na obetua no nea ɔyɛ no so ka.
18 १८ काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर, आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको.
Teɛ wo ba, na ɛno mu na anidaso wɔ, na nyɛ wɔn a wɔde no kɔ owu mu no mu baako.
19 १९ रागीट मनुष्याला दंड दिला पाहिजे; जर तुम्ही त्यास सोडवले, तर तुम्हास दुसऱ्या वेळेसही सोडवावे लागेल.
Ɛsɛ sɛ onipa a ne koma haw no no nya so asotwe; sɛ woka ma no a, wobɛyɛ bio.
20 २० सल्ला ऐक आणि शिक्षण स्वीकार, म्हणजे तू आपल्या आयुष्याच्या शेवटी सुज्ञान होशील.
Tie afotu na gye nkyerɛkyerɛ to mu, na awiei no, wubehu nyansa.
21 २१ मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात, पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील.
Nhyehyɛe bebree wɔ onipa koma mu, nanso nea Awurade pɛ no na ɛba mu.
22 २२ प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते; आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला.
Nea onipa pɛ ne nokware dɔ; eye sɛ wobɛyɛ ohiani sen sɛ wobɛyɛ ɔtorofo.
23 २३ परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे; आणि तो जीवनाकडे नेतो, आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे, आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही.
Awurade suro kɔ nkwa mu; na onipa de abotɔyam home a ɔhaw bi nni mu.
24 २४ आळशी आपला हात ताटात घालतो, आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही.
Ɔkwadwofo de ne nsa si aduan mu, na ɛyɛ no anihaw sɛ obeyi akɔ nʼano.
25 २५ निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल, बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल.
Twa ɔfɛwdifo mmaa, na atetekwaa bɛfa adwene; ka nea ɔwɔ nhumu anim, na obenya nimdeɛ.
26 २६ जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो, तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे.
Nea ɔbɔ nʼagya korɔn na ɔpam ne na no yɛ ɔba a ɔde aniwu ne animguase ba.
27 २७ माझ्या मुला, जर तू सूचना ऐकण्याचे थांबवले तर ज्ञानाच्या वचनापासून भटकशील.
Me ba, sɛ wugyae nkyerɛkyerɛ tie a, wobɛman afi nimdeɛ nsɛm ho.
28 २८ भ्रष्ट साक्षीदार न्यायाची थट्टा करतो आणि वाईटाचे मुख अन्याय गिळून टाकते.
Adansekurumni di atɛntrenee ho fɛw; na omumɔyɛfo ano mene bɔne.
29 २९ निंदकासाठी धिक्कार आणि मूर्खाच्या पाठीसाठी फटके तयार आहेत.
Wɔasiesie asotwe ama fɛwdifo, ne mmaabɔ ama nkwaseafo akyi.

< नीतिसूत्रे 19 >