< नीतिसूत्रे 19 >
1 १ ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे.
Ber bedo jachan ma wuodhe ok nyal cha, moloyo ngʼat mofuwo ma lewe timo richo.
2 २ ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही, आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो.
Ok ber bedo gi gombo maonge gi ngʼeyo, kata bedo ka irikni kae to ibayo yo.
3 ३ मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो, आणि त्याचे मन परमेश्वराविरूद्ध संतापते.
Fuwo mar ngʼato owuon ketho ngimane; to bende chunye bedo mager gi Jehova Nyasaye.
4 ४ संपत्ती खूप मित्रांची भर घालते, पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात.
Mwandu kelo osiepe mangʼeny, to osiep ngʼat ma jachan ringe.
5 ५ खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही.
Janeno ma ja-miriambo ok notony ma ok okum, to ngʼatno malando miriambo ok nobed thuolo.
6 ६ उदार मनुष्यापासून पुष्कळ लोक मदतीसाठी विचारणा करतात; आणि जो कोणी दान देतो त्याचा प्रत्येकजण मित्र आहे.
Ji mangʼeny temo mondo oyud pwoch kuom ruoth, to ngʼato ka ngʼato bedo osiep ngʼat machiwo mich.
7 ७ गरीब मनुष्याचे सर्व बंधू त्याचा द्वेष करतात, तर मग त्याचे मित्र त्याच्यापासून किती तरी दूर जाणार! तो बोलत त्यांच्या पाठोपाठ जातो पण ते निघून जातात.
Ngʼat ma jachan wedene duto kwede, osiepene to noringe maromo nadi! Kata bed notemo sayogi onge kama doyudgie.
8 ८ जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो, जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल.
Ngʼatno moyudo rieko ohero chunye owuon, to ngʼat mohero winjo wach dhi maber.
9 ९ खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल.
Janeno ma ja-miriambo ok notony ma ok okume, to ngʼatno malando miriambo biro lal nono.
10 १० मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही, तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते.
Ok en gima owinjore mondo ngʼat mofuwo odagi e ber, to en gima rach machalo nadi ka misumba ema omi loch kuom yawuot ruoth!
11 ११ बुद्धीने मनुष्य रागास मंद होतो, आणि अपराधाकडे दुर्लक्ष करणे त्याची शोभा आहे.
Ngʼat mariek iye ok wangʼ piyo; oyudo duongʼ kuom weyo wach ma ok odewo ketho.
12 १२ राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे.
Gero mar ruoth chalo gi sibuor maruto, to ka omor kodi to ochalo gi tho manie wi lum.
13 १३ मूर्ख मुलगा आपल्या वडिलांना अरिष्टासारखा आहे; आणि भांडखोर पत्नी सतत गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे.
Wuowi mofuwo kelone wuon mare masira, to dhako maralep chalo gi kodh ajiki.
14 १४ घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे, पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे.
Ute kod mwandu gin girkeni miyudo kuom jonywol, to dhako mariek aa kuom Jehova Nyasaye.
15 १५ आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.
Samuoyo kelo nindo matut, to ngʼat ma ja-mifwadhi bedo gi kech.
16 १६ जो कोणी आज्ञा पाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, पण जो मनुष्य आपल्या मार्गाविषयी विचार करत नाही तो मरेल.
Ngʼatno morito chike Jehova Nyasaye kendo timo gik mopuonje biro dak amingʼa, to ngʼat mochayo chikene biro tho.
17 १७ जो कोणी गरीबावर दया करतो तो परमेश्वरास उसने देतो, आणि तो त्याने जे काही केले त्याची परतफेड करील.
Ngʼat manyiso ngʼwono ne jochan, holo mana Jehova Nyasaye, obiro gwedhe kuom gik mosetimo.
18 १८ काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर, आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको.
Kum wuodi, nikech mano e kama geno nitie; kik ibed e winjruok kuom gima nyalo kelone tho.
19 १९ रागीट मनुष्याला दंड दिला पाहिजे; जर तुम्ही त्यास सोडवले, तर तुम्हास दुसऱ्या वेळेसही सोडवावे लागेल.
Ngʼat ma ja-mirima nyaka yud kum, kendo ka ikonye, to chuno ni nyaka itim kamano kendo.
20 २० सल्ला ऐक आणि शिक्षण स्वीकार, म्हणजे तू आपल्या आयुष्याच्या शेवटी सुज्ञान होशील.
Chik iti ka ingʼadoni rieko kendo rwak puonj, to giko ni inibed mariek.
21 २१ मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात, पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील.
Dhano nigi chenro mangʼeny e chunye, to dwaro mar Jehova Nyasaye ema timore.
22 २२ प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते; आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला.
Gima dhano dwaro en hera ma ok rum, ber bedo jachan moloyo bedo ja-miriambo.
23 २३ परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे; आणि तो जीवनाकडे नेतो, आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे, आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही.
Luoro Jehova Nyasaye tero ji e ngima; eka ngʼato yweyo kodhil, ma ok omule gi chandruok.
24 २४ आळशी आपला हात ताटात घालतो, आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही.
Jasamuoyo luto lwete malal ei tawo; kendo ok onyal gole oko moduoge e dhoge!
25 २५ निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल, बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल.
Chwad jasunga mondo joma ngʼeyogi tin opuonjre; kwer ngʼat man-gi rieko, to obiro medo fwenyo tiend weche.
26 २६ जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो, तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे.
Ngʼat mamayo wuon mare kendo riembo min mare en wuowi makelo wichkuot kod dwanyruok.
27 २७ माझ्या मुला, जर तू सूचना ऐकण्याचे थांबवले तर ज्ञानाच्या वचनापासून भटकशील.
Kidagi chiko iti ne puonj in wuoda, to ibiro bayo mabor kuom weche mag ngʼeyo.
28 २८ भ्रष्ट साक्षीदार न्यायाची थट्टा करतो आणि वाईटाचे मुख अन्याय गिळून टाकते.
Janeno ma ja-jar ji ochayo adiera, to dho ngʼat ma timbene richo golo mana richo.
29 २९ निंदकासाठी धिक्कार आणि मूर्खाच्या पाठीसाठी फटके तयार आहेत.
Kum oket mana ne jo-achaya, to chwat ne ngʼe joma ofuwo.