< नीतिसूत्रे 18 >
1 १ जो कोणी आपणास वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो; आणि तो सर्व स्वस्थ सुज्ञतेविरूद्ध लढतो.
Særlingen søger et Paaskud, med Vold og Magt vil han Strid.
2 २ मूर्खाला समंजसपणात आनंद मिळत नाही, पण केवळ आपल्या मनात काय आहे हे प्रगट करण्यात त्यास आनंद आहे.
Taaben ynder ej Indsigt, men kun, at hans Tanker kommer for Lyset.
3 ३ जेव्हा वाईट मनुष्य येतो, त्याच्याबरोबर तिरस्कार येतो, निर्भत्सना आणि लाज त्यासह येतात.
Hvor Gudløshed kommer, kommer og Spot, Skam og Skændsel følges.
4 ४ मनुष्याच्या मुखाचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत; ज्ञानाचा झरा वाहणाऱ्या प्रवाहासारखे आहेत.
Ord i Mands Mund er dybe Vande, en rindende Bæk, en Visdomskilde.
5 ५ जे कोणी चांगले करतात त्यांचा न्याय विपरित करण्यासाठी, दुष्टाचा पक्ष धरणे चांगले नाही.
Det er ilde at give en skyldig Medhold, saa man afviser skyldfris Sag i Retten.
6 ६ मूर्खाचे ओठ त्यास भांडणात पाडतात, आणि त्याचे मुख मारास आमंत्रण देते.
Taabens Læber fører til Trætte, hans Mund raaber højt efter Hug,
7 ७ मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो, आणि त्याचे ओठ त्यास स्वतःला पाश होतात.
Taabens Mund er hans Vaade, hans Læber en Snare for hans Liv.
8 ८ गप्पागोष्टी करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत, आणि ते अगदी खोल पोटात शिरतात.
Bagtalerens Ord er som Lækkerbidskener, de synker dybt i Bugen.
9 ९ जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे तो नाश करणाऱ्याचा भाऊ आहे.
Den, der er efterladen i Gerning, er ogsaa Broder til Ødeland.
10 १० परमेश्वराचे नाव बळकट बुरुजाप्रमाणे आहे; नीतिमान त्यामध्ये धावत जातो आणि सुरक्षित राहतो.
HERRENS Navn er et stærkt Taarn, den retfærdige løber derhen og bjærges.
11 ११ श्रीमंताची संपत्ती त्याचे बळकट नगर आहे; आणि त्याच्या कल्पनेने तो उंच भींतीसारखा आहे.
Den riges Gods er hans faste Stad, og tykkes ham en knejsende Mur.
12 १२ मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, पण गौरवापूर्वी विनम्रता येते.
Mands Hovmod gaar forud for Fald, Ydmyghed forud for Ære.
13 १३ जो कोणी ऐकण्यापूर्वी उत्तर देतो, त्याचे ते करणे मूर्खपणाचे आणि लज्जास्पद असते.
Om nogen svarer, førend han hører, regnes det ham til Daarskab og Skændsel.
14 १४ आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो, पण तुटलेला आत्मा कोणाच्याने सोसवेल?
Mands Mod udholder Sygdom, men hvo kan bære en sønderbrudt Aand?
15 १५ सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते, आणि शहाणा ऐकून ते शोधून काढतो.
Den forstandiges Hjerte vinder sig Kundskab, de vises Øre attraar Kundskab.
16 १६ मनुष्याचे दान त्याच्यासाठी मार्ग उघडते, आणि महत्वाच्या मनुष्यांसमोर त्यास आणते.
Gaver aabner et Menneske Vej og fører ham hen til de store.
17 १७ जो सुरुवातीला आपली बाजू मांडतो तो बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा प्रतिस्पर्धी येऊन त्यास प्रश्र विचारतो.
Den, der taler først i en Trætte har Ret, til den anden kommer og gaar ham efter.
18 १८ चिठ्ठ्या टाकल्याने भांडणे मिटतात, आणि बलवान प्रतिस्पर्धी वेगळे होतात.
Loddet gør Ende paa Trætter og skiller de stærkeste ad.
19 १९ दुखवलेल्या भावाची समजूत घालणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण आहे. आणि भांडणे राजवाड्याच्या अडसरासारखे आहेत.
Krænket Broder er som en Fæstning, Trætter som Portslaa for Borg.
20 २० मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल, तो आपल्या ओठांच्या पीकाने तृप्त होईल.
Mands Bug mættes af Mundens Frugt, han mættes af Læbernes Grøde.
21 २१ जीवन किंवा मरण ही जीभेच्या अधिकारात आहेत; आणि ज्या कोणाला ती प्रिय आहे तो तिचे फळ खातो.
Død og Liv er i Tungens Vold, hvo der tøjler den, nyder dens Frugt.
22 २२ ज्या कोणाला पत्नी मिळते त्यास चांगली वस्तू मिळते, आणि त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.
Fandt man en Hustru, fandt man Lykken og modtog Naade fra HERREN.
23 २३ गरीब मनुष्य दयेची विनवणी करतो, पण श्रीमंत मनुष्य कठोरपणाने उत्तर देतो.
Fattigmand beder og trygler, Rigmand svarer med haarde Ord.
24 २४ जो कोणी पुष्कळ मित्र करतो तो आपल्याच नाशासाठी ते करतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या भावापेक्षाही आपणांस धरून राहतो.
Med mange Fæller kan Mand gaa til Grunde, men Ven kan overgaa Broder i Troskab.