< नीतिसूत्रे 18 >

1 जो कोणी आपणास वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो; आणि तो सर्व स्वस्थ सुज्ञतेविरूद्ध लढतो.
與眾寡合的,獨自尋求心願, 並惱恨一切真智慧。
2 मूर्खाला समंजसपणात आनंद मिळत नाही, पण केवळ आपल्या मनात काय आहे हे प्रगट करण्यात त्यास आनंद आहे.
愚昧人不喜愛明哲, 只喜愛顯露心意。
3 जेव्हा वाईट मनुष्य येतो, त्याच्याबरोबर तिरस्कार येतो, निर्भत्सना आणि लाज त्यासह येतात.
惡人來,藐視隨來; 羞恥到,辱罵同到。
4 मनुष्याच्या मुखाचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत; ज्ञानाचा झरा वाहणाऱ्या प्रवाहासारखे आहेत.
人口中的言語如同深水; 智慧的泉源好像湧流的河水。
5 जे कोणी चांगले करतात त्यांचा न्याय विपरित करण्यासाठी, दुष्टाचा पक्ष धरणे चांगले नाही.
瞻徇惡人的情面, 偏斷義人的案件,都為不善。
6 मूर्खाचे ओठ त्यास भांडणात पाडतात, आणि त्याचे मुख मारास आमंत्रण देते.
愚昧人張嘴啟爭端, 開口招鞭打。
7 मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो, आणि त्याचे ओठ त्यास स्वतःला पाश होतात.
愚昧人的口自取敗壞; 他的嘴是他生命的網羅。
8 गप्पागोष्टी करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत, आणि ते अगदी खोल पोटात शिरतात.
傳舌人的言語如同美食, 深入人的心腹。
9 जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे तो नाश करणाऱ्याचा भाऊ आहे.
做工懈怠的, 與浪費人為弟兄。
10 १० परमेश्वराचे नाव बळकट बुरुजाप्रमाणे आहे; नीतिमान त्यामध्ये धावत जातो आणि सुरक्षित राहतो.
耶和華的名是堅固臺; 義人奔入便得安穩。
11 ११ श्रीमंताची संपत्ती त्याचे बळकट नगर आहे; आणि त्याच्या कल्पनेने तो उंच भींतीसारखा आहे.
富足人的財物是他的堅城, 在他心想,猶如高牆。
12 १२ मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, पण गौरवापूर्वी विनम्रता येते.
敗壞之先,人心驕傲; 尊榮以前,必有謙卑。
13 १३ जो कोणी ऐकण्यापूर्वी उत्तर देतो, त्याचे ते करणे मूर्खपणाचे आणि लज्जास्पद असते.
未曾聽完先回答的, 便是他的愚昧和羞辱。
14 १४ आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो, पण तुटलेला आत्मा कोणाच्याने सोसवेल?
人有疾病,心能忍耐; 心靈憂傷,誰能承當呢?
15 १५ सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते, आणि शहाणा ऐकून ते शोधून काढतो.
聰明人的心得知識; 智慧人的耳求知識。
16 १६ मनुष्याचे दान त्याच्यासाठी मार्ग उघडते, आणि महत्वाच्या मनुष्यांसमोर त्यास आणते.
人的禮物為他開路, 引他到高位的人面前。
17 १७ जो सुरुवातीला आपली बाजू मांडतो तो बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा प्रतिस्पर्धी येऊन त्यास प्रश्र विचारतो.
先訴情由的,似乎有理; 但鄰舍來到,就察出實情。
18 १८ चिठ्ठ्या टाकल्याने भांडणे मिटतात, आणि बलवान प्रतिस्पर्धी वेगळे होतात.
掣籤能止息爭競, 也能解散強勝的人。
19 १९ दुखवलेल्या भावाची समजूत घालणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण आहे. आणि भांडणे राजवाड्याच्या अडसरासारखे आहेत.
弟兄結怨,勸他和好,比取堅固城還難; 這樣的爭競如同堅寨的門閂。
20 २० मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल, तो आपल्या ओठांच्या पीकाने तृप्त होईल.
人口中所結的果子,必充滿肚腹; 他嘴所出的,必使他飽足。
21 २१ जीवन किंवा मरण ही जीभेच्या अधिकारात आहेत; आणि ज्या कोणाला ती प्रिय आहे तो तिचे फळ खातो.
生死在舌頭的權下, 喜愛它的,必吃它所結的果子。
22 २२ ज्या कोणाला पत्नी मिळते त्यास चांगली वस्तू मिळते, आणि त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.
得着賢妻的,是得着好處, 也是蒙了耶和華的恩惠。
23 २३ गरीब मनुष्य दयेची विनवणी करतो, पण श्रीमंत मनुष्य कठोरपणाने उत्तर देतो.
貧窮人說哀求的話; 富足人用威嚇的話回答。
24 २४ जो कोणी पुष्कळ मित्र करतो तो आपल्याच नाशासाठी ते करतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या भावापेक्षाही आपणांस धरून राहतो.
濫交朋友的,自取敗壞; 但有一朋友比弟兄更親密。

< नीतिसूत्रे 18 >